विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 1 July 2021

।। 16 व्या शतकातील शिवकालीन मराठा शूर सरदार कदमबांडे.।। भाग २

 






।। 16 व्या शतकातील शिवकालीन मराठा शूर सरदार कदमबांडे.।।

भाग २
सरदार कृष्णराव कदमबांडे हे िदवसंेिदवस पर्बळ होत होते. मोगलांनी निजामशाही नष्ट करुन त्यांचा या भागावर एकछञी अमंल चालू झाला. या काळात संघर्ष थांबला होता. एक िस्थरपणा आला होता. मोगलांनी दौलताबाद राजधानी करुन तेथुन अ.नगर, जुन्नरचा कारभार पाहू लागले. खंडणी रुपात कर भरुन अळकुटी जहािगरीतील कारभार कदमबांडे पाहत होते. मोगलांची मजीॆ संपादन केल्यानंतर मोगलांचे या भागाकडे दुर्लष झाले. स्वतंञ राजाप्माणे ते कारभार करू लागले. स्वत्.चे मोठे सैन्य त्याच्या पदरी होते. यात घोडदळ, पायदळ, 5 हजारांची फौंज त्यांच्याकडे होती.. याच काळात मोगलांनी खुलदाबाद शहर खूप सुंदर वसवले होते. ते कामगार बोलावून अऴकुटीत 4 एकर जागेमध्ये भव्य राजवाडा बांधला. मुख्य प्रवेशद्वार, चार भव्य बुरूजे, सर्व बाजूंनी भक्कम तटबंदी, किल्यात दुमजली इमारत, प्रवेशद्वाराजवळ राजदरबार व सरकारी कामकाजासाठी लांबलचक सागवानी कलाकुसरीचा दरबार तयार केला. एका लहान भुईकोट िकल्ल्याची निर्मिती झाली. नदीच्या पलीकडे चिंचेच्या बागेत लष्करासाठी छावणी िनिश्चत केली. तिथे विहीर खोदली. भटारखाना तयार केला. हेमाडपंती शिवमंदिराचे काम झाले. जुन्या एका दुर्लिषत कबरीचाही जीणोंध्दार केला. त्यांनतर त्यांनी संपूर्ण गावाला मजबुत अशी तटबंदी करुन गावकुस बांधली. या गावकुसाला 2 प्रचंड वेशी व मोठाले आठ बुरूंजे बांधली.. सरदार कदमबांडे यांचे पदिर बिवरे हे बा्ह्मण कुटूंब लेखिनक म्हणून कामाला होते.. थोडक्यात अऴकुटी जहािगरीचे कुलकर्णीपद त्यांच्याकडे होते. बिवरे मोठे धार्मीक होते. त्यांनी कदमबांडेतर्फे निदकाठी महादेवाचे सुंदर हेमाडपंथी मंदिर बांधले. वाटसरू तसेच गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी बारव बांधली. शेजारी भवानीमातेचे टुमदार मंदिर बांधले. सरदार कदमबांडे सिहष्णु वृत्तीचे होते. त्यांच्या सैन्यात हिंदू व मुिस्लम असे दोन्ही प्रकारचे सैन्य होते. त्यानी भुईकोट िकल्ल्याच्या बांधणी नंतर एका बाजूला मसिजत बांधली. अऴकुटी शहराची वस्ती वाढत होती. प्रचंड लष्कराला लागणारे िकराणा, कपडे यासाठी त्यांनी व्यापाराला प्रोर्त्साहन दिले. मोठ्या बाजारपेठा वसिवल्या. विणकरांना प्रोर्त्साहन िदले. त्यामुळे कोष्टी व मोमीन समाज मोठ्या संखे्यने येथे स्थाियक झाले. सै्थर्य व व्यापारास पोषक अशी बाजारपेठ असल्यामुळे मोठ्या संख्येने व्यापारी येथे स्थाियक झाले. त्याकाळी अळकुटी शहराची मोठी भरभराट झाली होती. अऴकुटीचा डंका चारही िदशेला होत होता. बाजारपेठ गजबजली होती. व्यापार्याना संरक्षण िमळत होते. याकाळात कदमबांडेचा मोठा राजदरबार भरायचा. येथे न्याय निवाडे व्हायचे , सरकारी कामकाज चालायचे. सरदार कदमबांडे यांची छञपती कुटूबांविषयी मोठी निष्ठा होती. हा प्रदेश जुन्नर-पारनेर-अ.नगर-खुलादाबाद पूर्णपणे मोगलाच्या ताब्यात असल्यामुळे कदमबांडे यांना उघडपणे छञपतीच्या गोटात जाता येत नव्हते.
छञपती िशवाजी महाराजांनी इ.स.1657 ते 1670 दरम्यान हा भाग िजंकण्याचा जोरदार प्यत्न केला. परंतु ते अयशस्वी ठरले. त्यांनी जुन्नर-पारनेर-अ.नगर लुटले. मोठी चामड्याची बाजारपेठ असलेले निघोज लुटले. परंतु त्यांनी अऴकुटीला धक्का लावला नाही. या भागात असताना त्यांनी एका प्राचीन पाडुंरंग मंदिरात दर्शन घेतले. बहुधा ते रांधे येथील स्वयंभू िवठ्ठल-रखुमाईचे मंिदर असावे. छञपतींना शेवटपर्यंत हा भाग स्वराज्यात सामील करता आला नाही.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...