रणमार्तंड श्री राणोजी संताजी घोरपडे...!!
पोस्तसांभार :: इंद्रजीत खोरे
परांडा किल्ला धरून फीरोजजंगचा बडा सरदार नाहरखानाची छावणी पसरली होती.चांगलं चार हजार घोडा आणि दोन-तीन हजार पाऊल लोक होता.
मराठयांचा कसला जसा सातारा भागात वाढू लागला तसं औरंगजेब पातशाहनं फिरोजजंग याला गोळकोंडा परिसरातून माघारी बोलावणं धाडलं.फिरोजजंगनं आगे खबर म्हणून नाहरखानाला आगाऊ खलिता धाडला.
त्यात नाहरनं पातशाहसाठी दोन हजार जातवान घोडा आणि दहा लाख रुपये नगद जमले होते.
बरोबर त्याच वेळी राणोजी घोरपडे हे इंदापूर-बारामतीच्या मधल्या बेचक्यात मुक्कामी होते.त्यांचा मानसुभा हा नगर मारण्याचा होता.त्यासाठी त्यांनी मोठी तयारी केली होती.पण मधेच खबरगीरानं खानाची बातमी राणोजींच्या कानी घातली.तसे राणोजी हुशार झाले.
राणोजींच्या दमतीसही मोठा माणूस मेळ होता.खास आपल्या वडिलांन प्रमाणे त्यांनीही कर्नाटकी करोलांच
पाच हजाराच पथक आपल्या पदरी ठेवलं होतं.दहा हजार घोडा होता आणि पाच-सात हाजाराचा पाऊललोक होता.
खबर काणी पडताच राणोजींनी सगळा पट आपल्या मनी मांडून आणि खेळून बघीतला.नगर भागात आपण उतरणार आहोतच तर जाता जाता या खानावर आडवा हात मारण्यास काय हरकत या विचारांच्या तंद्रीत त्यांनी दोन हजार बरकनदाच आणि दोन हजार पाऊल लोक वेळगळे काडून त्यांना जेऊर हे गाव जवळ करण्याचा हुकूम दिला.रात्रीच्या किर्रर्र अंधारात जेऊर गावच्या पूर्वेकडील माळावर राणोजी तीन हजार घोडा घेऊन दाखल झाले.सगळा जमाव एक करून मराठे चोर पावलांनी परांडा जवळ करू लागले.
मार्गशीर्ष समाप्त होऊन पौष सुरू झाला होता.पण थंडी अजून हाटली नव्हती.आपल्या छावणीच्या घेऱ्यात
खान बीनघोर होता.कारण या भागात मराठयांचा कालवा जरा कमीच होता.रात्रीच्या बेतावर ताव मारून आख्खी छावणी घोरत पडली होती.पाच-पंचवीस घोड्यांच जिलेब पथक नुकतंच फेरी पूर्ण करून आलं होतं.घोडी ठाण करून ते हशम ही झोपीच्या नदी लागले.
रात्र जशी पुढं सरकू लागली तस-तसे मराठेही झपाट्याने पुढे सरकू लागले.सीना नदी आली तस राणोजींनी घटकाभर विश्रांतीचा हुकूम दिला.इकडं दूरवर किल्ल्याच्या मावळतीची दिशा धरून मोकाट कुत्र्यांच्या
भूंकण्या अस्पष्ट आवाज येऊ लागला.पाहऱ्या वरील हशमांनी बऱ्याचदा नजर मारून ही त्यांना कसलीच हालचाल जाणवली नाही.
दमसास घेऊन हुशार झालेले मराठे ताजेतवाणे झाले.
दमतीस असणाऱ्या सरदारांना रानोजींनी कामगिऱ्या भरा-भर नेमून दिल्या. बाजी जाधव आणि विश्वासराव पालकरास बिनीच्या पथकावर नेमले.त्यांच्या दीमतीस चारशे घोडा दिला.डाव्या बाजूला नारायण देवकाते आणि
श्यामजी नाईक यांना तर उजव्या बघलेस प्रतापराव आणि जिवाजीराव हे जकताप बंधू होते.खासा राणोजी हे
आपल्या खास प्याद्यांन बरोबर मध्य भागी होते. कामगिऱ्या नेमून देताच मराठे बारुदा सारखे पेटले.
नदी पार करून सर्व दल पुढे सरसावलं.छावणी आणि किल्ला नजर टप्यात येताच राणोजींनी बरकनदाच पथक
आणि पाऊल लोक यांना अलीकडेच दबा धरून बसण्याचा हुकूम केला.
पहाट सरत आली होती.दूरवर हालचाल किल्लाच्या बुरुंजा वरील पाहऱ्याच्या हशमांनी ठिपली होती.त्यानं सर्वांना सावध करण्याच्या आत मराठ्यांकडील बिनीचा चारशे घोडा छावणीला चीकटला.बाजी जाधव आणि विश्वासराव पालकरांनी आपला हात सईल सोडून कापा-कापी चालू केली.मुगल सावरण्याच्या आतच मराठ्यांनी
पेटते बाण छावणीतील तंबून वरती सोडले तसा आगेचा भडका उडाला.नाहरखाना अजून आपल्या बीजव्यात स्वप्नांच्या दुनियेत रममाण होता.आगीचा धूर जसा उडू लागला तसा खानाचा जीव गुदमरू लागला. खान जागा झाला.तोपर्यंत त्याचा ही तंबु पेटला होता आणि बाहेर आरोळ्याचा कालवा होऊ लागला.तसा खान आपली ढाल तलवार घेऊन बाहेर पळाला.
त्याला मराठयांनी हल्ला केलाय म्हणून सांगण्यात आले
तसा तो हबकला.या परिसरात दूर-दूर पर्यंत कुण्या मराठा सरदार आपल्या जमावा निशी नव्हता.आणि हे मराठे असे अचानक कुठून उगवले ह्या विचारानं तो हैराण झाला.त्यांनी कसंबस आपलं लष्कर गोळा केलं तोपर्यंत
मराठ्यांनी दोन-तीनशे मुगल उडवले होते.मुगल हुशार होताच मराठे माघारी वळाले.तसे मुगल पेटले त्यांनी मराठ्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.ठरलेल्या ठिकाणी येताच मराठे पुन्हा उलटले.मराठ्यांच्या या चालीने मुगल बुचकळ्यात पडले.बघत बघत मराठ्यांची
संख्या वाढू लागली तसा खान हादरला.चारही बाजूंनी मराठयांनी मुगलांना घेरले.तोपर्यंत मराठयांच्या एका तुकडीनं खानाची पुरी छावणी गारद केली.किल्ला जवळच होता.पण मराठयांचा आवेश बघून किल्लेदार फक्त तटावरून बघत होता.किल्ल्याचे दार उघडण्याची त्याची हिमत झाली नाही.
आता पुरतं उजाडलं होतं.मराठे नेटानं भांडत होते. निर्णायक डाव म्हणून राणोजींनी आपली तुकडी सरळ मुघलांच्या मध्य भागी घुसवली.त्यामुळे मोगलांना पाचर मारल्या सारकी झाली.रानोजींनी सरळ सरळ खानाला अंगावर घेतला मोठा झगडा सुरू झाला.घोड्याच्या खोगीराच्या रिकीबीत पाय रवून ते उभ्या उभ्याच खानावर एकामागून एक घाव घालू लागले.त्यांच्या माऱ्या मुळे खानाला बचावात्मक पवित्र घेऊन मागे सारकावे लागले तरी पण झटापटीत खानाला तीन-चार वरमी घाव बसले त्यामुळे खान चांगलाच मागे हटला.तरीही रणोजींनी आपला भाला जोरदारपणे खानाच्या दिशेनं फेकला.
खानाची उजवी मांडी फाडत भला आरपार झाला.खान मोठ्यानं ओरडत घोड्यावरून खाली कोसळला.खान पडताच मोगलांचा धीर खचला.पण तितक्या खबर मिळाली की फिरोजजंगच दहा हजारच घोडदळ हे कुमके साठी येत आहे म्हणून.
तात्काळ रानोजींनी मिळालेली लुट नदी पार करून मार्गी लावण्याचा हुकूम केला.आता जास्त काळ थांबण्यात अर्थ नव्हता.कुमक आल्यास मोगलांनच पारडं निश्चितच जड होणार होतं.म्हणून थोड्या वेळानं राणोजींनी माघारीचा हुकूम केला.मराठ्यांचा पाठलाग करण्याच अवसान मोगलांन मध्ये उरलं नव्हतं.मुघलांचे हजार-दीड हजार हशम मराठ्यांनी पाडले होते.तसे मराठ्यांच ही नुकसान झालं होतं.दोनशे घोडी,सोळा भैल गाड्या भरून अन्नधान्य आणि इतर लुट घेऊन मराठे पसार झाले.
( २६ जानेवारी १७०२)
लेखन समाप्त.
( इंद्रजीत खोरे )
झालेली लेखन सेवा ही राणोजी घोरपडे आणि जे मावळे श्रींच्या राज्या साठी लढले त्यांच्या चरणी अर्पण करतो.
संदर्भ :- मोगली दरबाराची बातमी पत्र खंड २
टीप:- लढाई आणि लढाईचे ठिकाण हे बरोबर आहेत मात्र इतर गोष्टी ह्या काल्पनिक आहेत याची नोंद घ्यावी.
राणोजी घोरपडे यांचं कार्यकर्तुत्व सर्वांना समजाव हा या शब्द रचणे मागील हेतू होता.
No comments:
Post a Comment