विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 28 July 2021

शिवकालीन इतिहासातील राजे लखम सावंत भाग ३

 

शिवकालीन इतिहासातील
राजे लखम सावंत
पोस्तसांभार :एकनाथ वाघ




भाग ३
दरम्यान शिवाजी महाराज पुन्हा कोकणच्या स्वारीवर आले. त्यांनी रांगणा उर्फ प्रसिध्द गड हा किल्ला ताब्यात घेतला. तो परत मिळवण्यासाठी विजापूरहून बहलोल खान नावाचा सरदार मदतीला आला. त्याच्या सैन्यासह लखम सावंत यांनी रांगणा गडावर हल्ला केला; मात्र शिवाजी महाराजांची तयारी चांगली होती. त्यामुळे यात सावंत यांना यश आले नाही. यानंतर कुडाळ प्रांताच्या देशमुखीची वस्त्रे शिवाजी महाराजांनी कृष्ण सावंत यांना दिली. हे कृष्ण सावंत मुळचे तिरवडे येथील असल्याचे सांगितले जाते. ते काहीकाळ सावंतवाडीकर सावंत भोसले यांच्याकडे सरदारकीला होते. या घराण्यातील राम सावंत, रवळ सावंत हे बंडात सहभागी झाल्यामुळे त्यांच्याकडून सरदारकी काढून घेतली गेली. याच घराण्यातील कृष्ण सावंत यांच्याकडे सरदेशमुखीची वस्त्रे आली. ही वस्त्रे परत मिळवण्यासाठी लखम सावंत यांनी बादशहाची मदत मागितली. बादशहाने वझीर महम्मद एकखलासखान याला कोकणचा सुभेदार व श्रीपतराव मजलसी यांना कारभारी नेमून मदतीला पाठवले. यानंतर त्यांच्या मदतीने लखम सावंत आणि शिवाजी महाराज यांची कुडाळ येथे मोठी लढाई झाली. यात लखम सावंत यांनी शौर्याची पराकाष्टा केली. यामुळे शिवाजी महाराजांना पराभव पत्करून मागे फिरावे लागले. या पराक्रमामुळे बादशहाने सावंत यांना चौकुळ गाव मोकळा करून दिला. पुढे सावंत यांनी बाकीचा मुलखही ताब्यात घेतला. इतके होवूनही कृष्ण सावंत त्यांच्या हाती लागले नाही. शेवटी लखम सावंत यांनीच त्यांना कैद करून ठार केले. १६६५ मध्ये बादशहाच्या ताबेदारीत त्यांनी देशमुखीची सत्ता कायमची स्थापन केली. लखम सावंत यांचे १६७५ मध्ये निधन झाले. लखम सावंत यांच्या शौर्याचे शिवाजी महाराजांनीही कौतुक केल्याचे संदर्भ मिळतात.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...