कांचन बारीची लढाई -
२ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर १६७० या तीन दिवसात सुरतेची दुसर्यांदा धुळधाण उडवून प्रचंड लुट घेऊन महाराजांनी बागलाणाकडे कुच केली. ही बातमी कळताच दाऊदखान हा मोगली सरदार फौजेनीशी बर्हाणपूराहून महाराजांच्या पाठलागावर निघाला. १६ ऑक्टोबर १६७० रोजी दाऊदखान चांदवडजवळ पोहोचला. स्वराज्यात जाण्यासाठी सातमाळ डोंगररांग ओलांडणे आवश्यक होते व तेथेच दाऊदखान आडवा येण्याची शक्यता गृहीत धरुन महाराजांनी रात्रीच आपल्या १५००० फौजेची २ भागात विभागणी केली व पायदळाचे पाच हजार हशम, लुटीची घोडी व सामान मार्गी लावून स्वत: १०००० फौज घेऊन लुटीच्या पिछाडीस राहीले.
१७ ऑक्टोबरला सकाळीच युध्दाला कांचन - मंचन (कांचनबारीत) च्या परिसरात तोंड फुटले सहा - तास चाललेल्या या तुंबळ युध्दात खुद्द महाराजांसह, प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव, भिकाजी दत्तो यांनी भाग घेतला. मोगलांवर चारही बाजूंनी हल्ला करुन ३००० मोगली सैनिक कापून काढले; मोगली सेनेचा दारुण पराभव झाला.
या युध्दाचे वैशिष्टे म्हणजे गनिमी काव्याचा वापर न करता मोठ्या फौजेनिशी (१५०००) मैदानात महाराजांच्या नेतृत्वाखाली समोरासमोर लढले गेलेले व जिंकलेले युध्द होते. या युध्दाचा परिणाम एवढा मोठा झाला की, दिंडोरीचा मुघल सुभेदार सिद्दी हिलाल महाराजांना येऊन मिळाला व महाराजांनी या भागातील जवळजवळ सर्व किल्ले पुढील काळात ताब्यात घेतले.
माहिती संकलन - trekshitiz.com
Photography - Goraksha Ghawate
No comments:
Post a Comment