विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 7 July 2021

#_सुलतानजी_निंबाळकर_यांची_समाधी:













 #_सुलतानजी_निंबाळकर_यांची_समाधी:

खर्डा गावाच्या (ता.जामखेड जि.नगर) उत्तर बाजूला सुलतानजी निंबाळकर ( सुलतान हे नाव नसून ती निजामाने दिलेली पदवी आहे.) यांची अतिशय देखणी समाधी आहे. ती समाधी दगडावरील कोरीव कामासाठी विशेष प्रसिद्ध आहे. सुलतानजी निंबाळकर यांचे निजामशाहीसोबत सलोख्याचे संबंध होतेच त्याचबरोबर मराठा साम्राज्यासोबतही चांगले संबंध होते. १७४८ साली त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृतीत या कोरीव समाधीचे निर्माण त्यांचे वंशजांनी केल्याचे सांगण्यात येते.
सुलतानजी निंबाळकर यांनी खर्ड्याचा किल्ला तर बंधालाच त्याचबरोबर त्यांचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम म्हणजे बीड शहराच्या पूर्वेला असणारे खंडोबा मंदिर. हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर अतिशय भव्य असून, मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी व्हरांडा काढलेला आहे. आतल्या बाजूला खंडोबाची भव्य मूर्ती आहे. या मंदिरासमोर अष्टकोणी आकारातील गगनचुंबी दोन दीपमाळा असून, त्यांची उंची ७० फूट इतकी आहे. दुरून सहज नजर टाकली की, या दीपमाळा लक्ष वेधून घेतात.
खर्डा या ठिकाणी १७९५ मध्ये मराठे आणि निजाम यांच्यात इतिहास प्रसिद्ध अशी लढाई झाली. दोन्ही बाजूंचे मिळून २ लाखांची फौज या परिसरात लढली. मराठ्यांच्या भीतीने निजामाने खर्ड्याच्या किल्ल्यात आश्रय घेतल्यामुळे तो वाचला. पुढे १९४७-४८ च्या स्वातंत्र्य संग्रामात याच किल्ल्याच्या आश्रयाने आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी रझाकारांना सळो की पळो करून सोडले होते. आजही किल्ल्याची तटभिंत अगदी सुस्थितीत आहे. याच सुलतानजींनी खर्डा गावात महादेवाचे मंदिर आणि त्यासमोर बांधलेला अतिशय देखणा असा आखीव रेखीव दगडाने बांधलेला बारव पाहण्यासारखा आहे. तर तेथून जवळच असणाऱ्या पखरुड शिवारात पश्चिम बाजूला निसर्गरम्य अशा बालाघाटाच्या डोंगर रांगेत अतिशय देखणे बेलेश्वराचे मंदिर याच सुलतानजी निंबाळकर यांनी बांधलेले आहे.
✍️ संदिपान नामदेवराव कोकाटे
रा. निपाणी ता. भूम
मो. ९४२१४४५१५९

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...