साडे तीनशे वर्षापूर्वी झाली इचलकरंजी संस्थानची स्थापना …..
पोस्तसांभार : संजय खूळ
इचलकरंजीच्या पाऊलखुणा ……
सुमारे साडे तीनशे वर्षापूर्वी एक छोटीशी वाडी होती. भोवताली सुजलाम सुफलाम शेती होती. याचवेळी संस्थान स्थापना करून या संस्थानचे मुख्य केंद्र इचलकरंजी करण्यात आले आणि इचलकरंजी संस्थांनाची स्थापना झाली. आज वस्त्रोद्योग क्षेत्रात जगभर लौकिक असलेल्या या शहराचा तितकाच गौरवशाली आहे.साडे तीनशे वर्षात झालेली विविध स्थित्यंतरे आणि शहराचा ज्वाज्वल इतिहास नव्या पिढीपुढे आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. या संस्थानच्या अनेक पाऊलखुणाची ओळख
सन 1890 च्या सुमारास इचलकरंजी हे एक लहानसे संस्था होते. संस्थानाचे क्षेत्र 241 चौरस मैल असून लोकसंख्या गेल्या खानेसुमारी नुसार 4336 आहे संस्थानाची उत्पन्न 50 हजार रुपये आहे इचलकंजी हे कोल्हापूरचे पूर्वेस 18 मैल असून राजधानीचे शहर आहे. गावची लोकसंख्या 11000 आहे शहराला म्युन्सी पार्टी असून व्यापार बरा चालतो. हा गाव मद्रास सर्जन मराठा रेल्वेच्या मिरज कोल्हापूर लाईन वरील हातकणंगले स्टेशन पासून सहा मैल वर आहे व गावातून हातकंनगले स्टेशनला मोटर सर्विस आहे. सुमारे सव्वासे वर्षापूर्वी या संस्थानाची अशी स्थिति होती. ….या नंतर या गावाच्या प्रगतिला सुरुवात झाली या शहराने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव लौकिक केले. मात्र त्यापूर्वी या संस्थानाने अनेक हाल अपेष्ठा सोसल्या. या संस्थेच्या स्थापनेचा वृत्तांत थोडा मनोरंजक आहे. सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी नारो महादेव जोशी यांनी आपले धनी धनाजी व संताजी यांचे वडील म्हाळोजी घोरपडे यांच्या साठी अनेक लढाया केल्या. या लढाईतून, नारोपंतांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना इचलकरंजी गाव वतन देण्यात आले आणि त्याच वेळी इचलकरंजी संस्थानाची स्थापना झाली. त्यामुळेच इचलकरंजी संस्थानाचे मूळ जनक ठरले.
सावंतवाडी, आंबोली, आजरे, ( आजरा) अशा मार्गाने वाटचाल करीत ही मायलेकरे बहिरेवाडी या गावात आले. संताजी राव घोरपडे यांचे वडील म्हाळोजीराव यांचा बहिरेवाडीत तळ होता. या निराधार माय लेकरांना पाहून त्यांना त्यांची दया आली. त्यांनी गंगाबाई आणि नारोपंत यांना कापशीस आणले व त्यांच्या पालनपोषणाची तरतूद केली. नारोपंत हुशार होते. ज्या वयात खेळायचे असते त्या वयात त्यांची उठ बस घोड्यांच्या पागेत होऊ लागली. शिपाईगिरीच्या व शस्त्र कौशल्याच्या गोष्टी ऐकणे, शिपाई लोकांकडून स्वारी, शिकारी मधील नाना प्रकाराचे अनुभव ऐकणे, बागेत कारभार कामे कशी चालतात ती पाहण्यात ते गुंगून जात. त्यांची हुशारी आणि धाडसीपणा म्हाळोजीराव यांच्या नजरेत भरला. त्यांनी नारोपंतांना लिहिणे, वाचणे, घोड्यावर बसणे, निशान मारणे इत्यादी गोष्टी शिकवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर नारोपंत सर्व विद्याप्रवीण बनले. हुशार कारकून, शूर शिपाई अशी पात्रता संपादन केली. त्याचबरोबर त्यांची स्वामीनिष्ठाही नजरेत भरली. येथून त्यांची प्रगती सुरू झाली आणि घोरपडे यांचे लाडके बनले. मुलाप्रमाणे मान देणाऱ्या घोरपडे यांना नारोपंत यांनी वडीलस्थानी मानले आणि स्वतःचे आडनाव घोरपडे ठेवले. घोरपडे घराण्याच्या चढत्या पडत्या काळातही त्यांचे वैभव व प्रतिष्ठा सावरण्याचे काम नारोपंतांनी अत्यंत हिंमतीने पार पाडले. नारोपंत यांचे मूळ आडनाव घोरपडे नव्हते. म्हाळोजी घोरपडे नारोपंत यांना आपल्या मुला समान मानत. त्यामुळे नरोपंत यांचे आडनाव घोरपडे असे होऊन ते इचलकरंजीकर घोरपडे म्हणून प्रसिद्ध झाले. कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये त्यांचे जोशी आडनाव आहे. त्यांची वरवडेकर व संगमेश्वर कर अशी दोन कुळे फार प्रसिद्ध होती. वरवडेकरांचा विस्तार फारच मोठा होत गेला. वरवडे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील, तेथील जोशीपैकी एक घराणे सोळाव्या शतकात वरवडे सोडून सावंतवाडी संस्थानातील म्हापण गावात येऊन राहिले. याच घराण्यातील विश्वनाथपंथ यांना नारोपंत व महादजीपंत अशी दोन मुले होती. त्यापैकी नारोपंत वंशज हुपरीकर या नावाने प्रसिद्ध होते. पेशवाईत मोठे सावकार होते आणि महत्त्वाची कामे करणारे होते. दुसरा मुलगा महादजीपंत व पत्नी गंगाबाई यांना सण 1663 मध्ये पुत्र झाला. त्याचे नाव त्यांनी नारोपंत ठेवले. महादजीपंत म्हापणच्या कुलकर्णी यांचे काम करून उदरनिर्वाह करीत असत. कुलकर्णी यांच्याकडे गहाणदार किंवा गुमास्ता या दोन्हीपैकी कोणत्यातरी संबंधाने त्यांच्याकडे काम आले होते. त्यावर त्यांच्या कसाबसा उदरनिर्वाह होत असे. महादजीपंतांच्या निधनानंतर नारोपंत व त्यांच्या आई गंगाबाई यांचा उदरनिर्वाह कसा चालायचा असा प्रश्न उपस्थित झाला. नारोपंत त्यावेळी सहा वर्षाचे होते. भाऊबंदकीतील लोकांनी त्यांची मिळकत बळकावली आणि गंगाबाई आणि मुलगा नारोपंत अन्नाला महागले. त्याचवेळी अन्नाला महाग ठरलेल्या गंगाबाईनी उपजीविकेचे साधन शोधण्यासाठी नारोपंत ना घेऊन कोकण सोडले. सावंतवाडी, आंबोली, आजरे, ( आजरा) अशा मार्गाने वाटचाल करीत ही मायलेकरे बहिरेवाडी या गावात आले. संताजी राव घोरपडे यांचे वडील म्हाळोजीराव यांचा बहिरेवाडीत तळ होता. या निराधार माय लेकरांना पाहून त्यांना त्यांची दया आली. त्यांनी गंगाबाई आणि नारोपंत यांना कापशीस आणले व त्यांच्या पालनपोषणाची तरतूद केली. नारोपंत हुशार होते. ज्या वयात खेळायचे असते त्या वयात त्यांची उठ बस घोड्यांच्या पागेत होऊ लागली. शिपाईगिरीच्या व शस्त्र कौशल्याच्या गोष्टी ऐकणे, शिपाई लोकांकडून स्वारी, शिकारी मधील नाना प्रकाराचे अनुभव ऐकणे, बागेत कारभार कामे कशी चालतात ती पाहण्यात ते गुंगून जात. त्यांची हुशारी आणि धाडसीपणा म्हाळोजीराव यांच्या नजरेत भरला. त्यांनी नारोपंतांना लिहिणे, वाचणे, घोड्यावर बसणे, निशान मारणे इत्यादी गोष्टी शिकवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर नारोपंत सर्व विद्याप्रवीण बनले. हुशार कारकून, शूर शिपाई अशी पात्रता संपादन केली. त्याचबरोबर त्यांची स्वामीनिष्ठाही नजरेत भरली. येथून त्यांची प्रगती सुरू झाली आणि घोरपडे यांचे लाडके बनले. मुलाप्रमाणे मान देणाऱ्या घोरपडे यांना नारोपंत यांनी वडीलस्थानी मानले आणि स्वतःचे आडनाव घोरपडे ठेवले. घोरपडे घराण्याच्या चढत्या पडत्या काळातही त्यांचे वैभव व प्रतिष्ठा सावरण्याचे काम नारोपंतांनी अत्यंत हिंमतीने पार पाडले.
No comments:
Post a Comment