स्वराज्याची पहिली महिला सरसेनापती रणरागीणी रणझुंजार रणमर्दिनी शौर्यविद्यूलता सरसेनापती ऊमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे
शोर्यशाली खंडेरावांच्या पश्चात गुजरातेतल आपल बळ कमी पडतय याचा फायदा घेत जोरावर खान धुमाकुळ घालतोय प्रजा त्रस्त झाली आहे ...तर मग स्वता आम्ही चालून जाऊ ...माझ्या पराक्रमी धन्याच्या नावान लावलेलं कुंकू गेल असल तरी त्यांच्या महान किर्तीचा स्पर्श अजून माझ्या भाळी आहे ....कुलस्वामिनी चे नाव घेऊन जातीन फौजेनीशी तुटून पडते ...आणि त्या ऊन्मत्त खानाला फरफटत आणते विजयी मराठी तक्तासमोर...!!
मोहिमेचा विडा उचलून ऊमाबाई तडफेन निघाल्या झुंजार रणमर्द घेऊन त्वेशान गुजरातकडे कोसळत्या विजेसारख्या निघाल्या ...
आपल्याच धुंदीत असलेला खान अहमदाबादच्या भद्रकोट किल्यात बेफिकीर होता एक स्री आपल्यावर चालून येत आहे हे कळताच खान चकित झाला..
" एक औरत आ रही है हमसें जंग लढने.. रसोई बनाने वाला हाथ आया है शेर का शिकार करने.. नही हम कतेही बरदाश्त नही कर सकते ये गुस्ताखी.....!! कागज कलम लो और ऊस औरत को हमारा पैगाम भेजो लिखो....
बाई तु एक सामान्य विदवा पदरी दोन पोर घर संसारख आमच्याशी झुंज घेशील तर धुळीला मिळशील आल्या पावली परत जा ...नही तो अपने पांव आओगी और कुत्ते की मौत मरोंगी
ऊमाबाईंना हा खलिता मिळताच ऊमाबाई कडाडल्या
अस....?? मग लिहा त्या गिधाडाला म्हणावं आता असा कागदावर भेटू नकोस आग ऊसळलेल्या रणांगणावरच भेट या सरसेनापती ऊमाबाई दाभाडेला....
ऊमाबाईंनी लगोलग खाशा सरदारांचा दरबार बोलवला
मनात जिगर आणि कमरेला शस्त्र बांधून एक एक मातब्बर मराठी सरदार दरबारात आले..दोन चौरंगावर दोन तबक शेल्याने झाकून ठेवली होती.. हातात समशेर घेऊन ऊमाबाईंनी दरबारात प्रवेश केला.
आज निकराचा प्रसंग स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावण्याची वेळ स्वता:साठी जगणं आणि देशासाठी मरण यातला निर्णय घेण्याचा वक्त मस्तवाल खानाचा बिमोड करण्याची मोहीम तर मर्दुमकीची यातल्या एका तबकात तळपत्या समशेरी आहेत आणि या दुसर्या तबकात आहे हळदी कुंकू आणि बांगड्या दिल्लीत पायाशी बसून लाचारी हुजरेगिरी करून वतनाचे कागद मिळवायचे आणि त्या जोरावर रयतेवर जुलूम करायचे भ्रष्टाचार मनमानी करायची आणि हे सगळ करता यावं म्हणून ती पद वतन टिकवण्यासाठी तत्व आणि स्वराज्यनिष्ठा सोडून फंड फितूरी आणि दगलबाजी करीत स्वाभिमान गहाण टाकायचा हि अस्सल लढवय्यांची रीत नाही...अस्सल मर्द म्हणून पुढे सरसवणार्यांनी मुठीत समशेरी धराव्यात आणि कच खाऊन माघारी फिरणार्यांनी हातात बांगड्या भराव्यात आता निर्णय तुमच्या हाती .ऊमाबाईंनी वीरांच्या ऊरात पराक्रमाची मशाल चेतवली छत्रपती शिवरायांचा आणि हिंदवी स्वराज्याचा बुलंद जयजयकार करीत मराठी अग्नीलोळ धरारत निघाले....
ऊमाबाईंनी फ़ौजेच्या दोन तुकड्या केल्या किल्याच्या बाहेर एक तुकडी झुंजत होती दुसरी मागच्या दरवाज्याशी झगडत होती.. हत्तीवर बसुन चिलखत घालून दुष्मणावर अचूक नेम साधत रणमर्दिनी ऊमाबाई बाणांचा वर्षाव करीत होत्या तुंबळ यूद्ध भडकले मुंडकी ऊडत होती दोन्हींही बाजूंची प्रेत पडत होती भराभर हुकूम देत ऊमाबाईंनी त्या प्रेतांच्याच राशी रचल्या होत्या ...तटाचा दरवाजा उघडला ऊमाबाईंची फौज महापुरासारखी आत घुसली तुफानी कापाकापी चालू झाली बिजली सारखी समशेर चालवीत लढणार्या उमाबाईंच्या समोर खान सामोरा आला प्रचंड त्वेषान ऊमाबाई खानावर तटून पडल्या दोघांत प्रचंड युद्ध पेटले ....आणि ऊमाबाईंच्या एका वज्र प्रहारात खानाच शस्त्र उडाले मर्दानी ऊमाबाईंनी त्याला जेरबंद केल...
खानाची मिजाज गुर्मी आणि निशान ऊतरल मराठ्यांचा स्वाभिमान अस्मिता आणि भगवा गडावर फडकला
मराठमोळ्या लेकीसुनांवर हात टाकणारा रयत नाडणारा आणि स्वराज्य लुटणारा मस्तवाल खानाच्या मुसक्या आवळून त्याला राज गादीच्या पायाशी फरफटत नेलं.....
No comments:
Post a Comment