*सरसेनापती उमाबाई दाभाडे*
दाभाडे यांचे घराणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठ्यांच्या सैन्यात होते. मराठ्यांच्या राज्याची सीमा महाराष्ट्राच्या बाहेर वाढविण्याचे कार्य पहिले बाजीराव पेशवे करीत होते, तेव्हा खंडेराव दाभाडे गुजराथच्या दिशेने चढाया करीत होते. पुण्याजवळचे तळेगाव दाभाडे हे त्यांचे वतनाचे गाव असून तेथेच दाभाडे कुटुंब राहत होते. १७३१ मध्ये डभोईच्या लढाईत खंडेराव दाभाडे यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे मुलगे यशवंतराव व बळूराव हे लहान वयाचे होते. पतीच्या निधनाचे दुःख असले तरी मुलगे लहान असल्याने वतनाची जबाबदारी उमाबाईंनी अंगावर घेतली व समर्थपणे सांभाळली. केवळ दफ्तरी कामकाजच त्यांनी बघितले नाही तर सेनेचे अधिपत्य म्हणजे नेतृत्व केले. अहमदाबादच्या लढाईत स्वतः हत्यारबंद होऊन हत्तीवर बसून त्या लढाईत सहभागी झाल्या; मोठा पराक्रम केला. त्यांचा पराक्रम, वीरवृत्ती, स्त्री असूनही अंगी असणारे शौर्य बघून छत्रपती शाहू महाराज अतिशय प्रसन्न झाले व त्यांनी सेनापतीपद व सेना सरखेल हे विशेष अधिकार त्यांना दिले. दाभाड्यांची सरदारकी उमाबाई स्वतः चालवीत असत. छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर परिस्थिती बरीच बदलून गेली. सातारच्या गादीवर आलेले छत्रपती रामराजे केवळ नामधारीच होते. सरदारमंडळी प्रबळ होऊन आपली सत्ता वाढविण्याव्या प्रयत्नांत होते. उमाबाई एक स्त्री आहेत. त्यांचे काय चालणार, त्यांचे अधिकार कमी करून त्यांचा मुलूख कमी करण्याचा प्रयत्न अनेकजण करीत होते. उमाबाई आपला मुलूख कमी करून करून देण्यास तयार नव्हत्या. नानासाहेब पेशवे सर्व कारभार बघत होते. उमाबाईंनी स्वतः त्यांच्याबरोबर बोलणी करण्याचे ठरविले. त्या एकट्याच त्यांच्या बाजूने वाटाघाटी करण्यास बसत. त्यावरूनच त्या किती धोरणी व हुशार होत्या हे दिसते. आपला मुलुख तोडून देण्याऐवजी आपल्याकडून पैसे द्यावेत, असा विचार उमाबाई ठामपणे मांडत होत्या. उमाबाई जबरदस्त ताकदीच्य
No comments:
Post a Comment