विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 21 July 2021

ग्वाल्हेर-गोहदची यशस्वी मोहीम

 २१ जुलै इ.स.१७८३.

पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात (१७७७-१७८२) इंग्रजांनी ग्वाल्हेरचा किल्ला गोहदकर जाट राण्यांच्या हातात सुपूर्द केला होता. परंतु, नंतर गोहदकर जाट ग्वाल्हेर पुन्हा शिंद्यांकडे द्यायला राजी नव्हता. शेवटी फेब्रुवारी १७८३ मध्ये महादजी शिंद्यांनी स्वतः जाऊन ग्वाल्हेरला वेढा घातला. जवळच असणारे प्रसिद्ध ‘पन्ना' शहरही मराठी फौजांनी काबीज केले. गोहदकर जाटाची राणी आणि काही सावकार या किल्ल्यात होते. महादजींच्या प्रचंड फौजेला घाबरून किल्लेदाराने हत्यार ठेवायची तयारी दर्शवली. परंतु, गोहदकर राणीला हे समजताच ती खवळलीच. तिने आपल्याच किल्लेदाराला तोफेच्या तोंडी दिले. शेवटी पाच महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर महादजींना त्यांची 'ग्वाल्हेरी' परत मिळाली (दि.२१ जुलै १७८३). यानंतर महादजींनी गोहदच्या किल्ल्यालाही वेढा घातला आणि दि.२६ फेब्रुवारीला १७८४ रोजी गोहदचाही पाडाव झाला. आधीच इंग्रजांविरुद्धचा प्रचंड विजय अन् आता

ग्वाल्हेर-गोहदची यशस्वी मोहीम यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांच्या वर्चस्वावर पुन्हा एकदा निर्विवाद शिक्कामोर्तब झाले. दिल्लीकर मोगलांनाही आता पुन्हा एकदा मराठ्यांची 'भीती' वाटू लागली होती.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...