विनोद जाधव एक संग्राहक

Monday 26 July 2021

तंजावर_नरेश_व्यंकोजीराजे_भोसले

 

#व्यंकोजी_राजे_यांच्या_कडे #बंगळुरू_(banglore)_कर्नाटक_ची_जहागिरीची_जबाबदारी_सोपवली#
व्यंकोजी राजे यांनी आपली जहागिरी संभाळली तसेच विस्तार हि केला.
#1675 मध्ये आदिलशहाचा सरदार म्हणून स्वपराक्रमाने तंजावर जिंकले_.
#1676 ला स्वतंत्र तंजावरचे अधिपती झाले आपली राजधानी बंगळूर वरून तंजावर ला नेली.
व्यंकोजी राजे यांनी आपल्या पराक्रमाने जहागिरी सांभाळली आणि नायक राजाप्रमाणे स्वतंत्र सत्ता स्थापन केली.
#छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळी तंजावर येथे व्यंकोजी राजे यांची भेट घेतली होती.
व्यंकोजी राजेंनी तंजावरच्या आपल्या राज्यात त्यांनी कला साहित्य वाड्मय रचनेला प्रोत्साहन दिले आजही तंजावर मध्ये तंजावर ची मराठी(दक्षिणी मराठी) बोलली जाते.
#दक्षिणेत मराठी सत्ता स्थापन करून दक्षिणेत मराठी संस्कृती ज्यांनी पोहचवली वाढवली आणि आपल्या शौर्याचा पराक्रमाचा ठसा ज्यांनी द्रविड भुमीत(दक्षिण भारत) उमटवला असा महान राजास मानाचा मुजरा.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...