छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण पत्नींपैकी महाराणी सईबाई साहेब या महाराजांच्या अतिशय निकट आणि ज्यांना महाराजांचं स्फूर्तीस्थान समजल्या गेलं अश्या !
निंबाळकर घराण्यातील माधोजीराव निंबाळकर यांची कन्या सईबाई साहेब वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी महाराजांच्या पत्नी बनून भोसले घराण्यात आल्या.
सईबाई साहेब यांचा आणि शिवरायांचा विवाह पुणे येथे १६ मे १६४१ (तारखेत संभ्रम आहे १६४१/१६४०)साली मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
त्या वेळी महाराज अवघे ११ वर्षांचे होते.
बालवयात विवाह झाल्याने आपसूकच दोघांच्यात घट्ट
ऋणानुबंध निर्माण झाले.
सोबत खेळणे…गप्पा…गोष्टी…यामुळे महाराजांचा सईबाई साहेब यांवर अधिकच स्नेह होता.
सावळ्या गव्हाळी रंगाच्या सईबाई साहेब देखण्या, करारी,
रुबाबदार, तलवार चालविण्यात पारंगत, महाराजांना
शोभणाऱ्या अश्याच होत्या.
माँसाहेब जिजाऊ आऊसाहेब यांचा लाडक्या आणि सर्वाधिक मायेच्या सईबाई साहेब संभाजी महाराजांच्या मातोश्री होत्या.
धर्मवीर संभाजी महाराजांच्या आई…
संभाजी महाराजांपूर्वी सईबाई साहेब यांना तीन मुली होत्या.
सईबाई साहेब या छत्रपती शिवरायांच्या सामर्थ्यवान पत्नी होत्यां…
असं म्हणतात.
अखेरचे श्वास घेतांना महाराजांच्या मुखातून ”सई” हा
शेवटचा शब्द निघाला होता.
महाराणी सईबाई साहेब यांनी वयाच्या २४ व्या वर्षी १४ मे १६५७ साली संभाजीराजांना जन्म दिला.
संभाजीराजे लहान वयातच मातृप्रेमाला मुकले पण जिजाऊंनी त्यांना कधी ती कमतरता भासू दिली नाही.
छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील एक महत्वाचे स्थान असलेली व्यक्ती म्हणजे महाराणी सईबाई साहेब कदाचित त्यांची कमी भरून
काढणे सुद्धा शक्य नव्हते हे तितकेच सत्य.
|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवराय....||
No comments:
Post a Comment