#शेतकरी_हा_राज्याचा_अन्नदाता_आहे, असा विचार #छत्रपती_शिवाजी_महाराजांनी_रयतेला_दिला.
छत्रपतींच्या सैन्यात सर्वाधिक शेतकर्यांची मुले होती, हे जाणूनच शेतकर्यांचे हित जपणे हे ते आद्यकर्तव्य मानत.
शेतकर्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शिवरायांनी सर्वाधिक उत्पन्न काढणार्या शेतकर्यांना
#पुरस्कार_देऊन_गौरवित_असत.अल्पभूधारक व कमी उत्पन्न असणार्या शेतकर्यांना शिवकाळात मोफत बी-बीयाणेपुरविली जायची. याशिवाय शेतीमालाला योग्य किंमत देऊन शेतसाराही किफायतशीर प्रमाणात आकारला जात असे. पडिक जमिनीची मशागत करणार्या शेतकर्यांना राज्याकडून अर्थपुरवठा केला जात असे दलालांची प्रथा तर छत्रपतींनी पुर्णत: नष्ट केली होती. बहुजन समाजातील लायक व्यक्तिंना महसूल अधिकारी म्हणून नेमण्याची पद्धत छत्रपति शिवरायांच्या कारकिर्दीतच सुरु झाली.
#दुष्काळाच्या_काळात_शिवकाळात_शेतकऱ्यांना_शेतसारा_माफ_करुन_त्यांच्या_गुरांसाठी_मोफत_चारा_पुरविलाजातअसे. शेतकर्यांच्या भाजीच्या देठालाही हात लाऊ नये, मोबदला दिल्यशिवाय फळे घेऊ नका, झाडे तोडू नका, असे कडक फर्मान छत्रपतींनी महसूल अधिकार्यांना काढले होते.
#शेतकऱ्यांची_आर्थिक_स्थिती_सुधारली_तर_देशाला_संपन्नता_येईल, असे मत महाराजेंचं होतं.
No comments:
Post a Comment