कृष्णाजी अनंत सभासद शिवरायांचे चरित्र लिहीत असतो.. सुरतेच्या स्वारीनंतर केलेली कांचनबारीची लढाई तो स्वतःच्या नजरेसमोर उभी करतो.. अंगात असणाऱ्या पूर्ण ताकदीनिशी लेखणी उचलतो.. आणि कांचनबारीच्या युद्धाची सुरुवात करताना जोशात कागदावर अक्षरे उमटू लागतात..
"राजा खासा घोड्यावर बसून बख्तर घुगी घालून, हाती पटे चढवून मालमत्ता घोडी, पाईचे लोक पुढे रवाना करून, आपण दहा हजार स्वारांनिशी सडे सडे राउत उभे राहीले.."
दोन्ही हातात शस्त्र घेऊन आपला नेता, आपला सेनापती, आपला राजा समोर उभा आहे.. शत्रूला तोंड देण्यासाठी एकटाच समर्थ आहे..
हे दृश्य पाहून त्या दहा हजार सैन्यामध्ये काय ऊर्जा सामावली असेल?
शिवराय 'महाबली' भासतात ते इथे..
असे अनेक प्रसंग शिवचरित्रात असतील.. पण कांचनबारीच्या युद्धात अंगावर कवच घालून शत्रूची खांडोळी करणाऱ्या, अंगावरील कपड्यापासून ते हातातल्या तलवारीपर्यंत सगळं काही शत्रूच्या रक्ताने माखलेला, पौरुषाने भरलेल्या छत्रपतीला नजरेसमोर उभा केल्यास असीम ऊर्जेच्या लहरी उत्पन्न होतात..
म्हणूनच डच, फ्रेंच, पोर्तुगीज आणि इंग्रजांना शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण होते. त्यांच्यात या 'मराठा छत्रपती' ला भेटण्याची जणू स्पर्धाच लागली होती..
यातूनच घडला एक इतिहास..
जो कायम उपेक्षित राहिला.. अंधारात राहिला....
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
-केतन पुरी
No comments:
Post a Comment