विनोद जाधव एक संग्राहक

Monday 26 July 2021

मुक्ताबाई आणि यशवंतराव फणसे

 


मुक्ताबाई आणि यशवंतराव फणसे.

अहिल्याबाईंनी स्वतःच्याच मुलीचा आंतरजातीय विवाह लावला होता.
अहिल्याबाईंचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला. त्यांना मालोजीराव आणि मुक्ताबाई ही दोन अपत्ये होती.
पती खंडेरावांच्या मृत्यूनंतर (१७५४) बारा वर्षांनी सासरे मल्हाराव होळकरांचा मृत्यू झाला (१७६६). त्यानंतर एकाच वर्षांनी राज्यकारभार पाहणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा देखील मृत्यू त्यांना पाहावा लागला (१७६७). मुलाच्या मृत्यूपश्च्यात अहिल्याबाई स्वतः राज्यकारभार पाहू लागल्या.
होळकरांच्या जहागिरी क्षेत्रात चोर आणि डाकुंनी हैदोस घातला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अहिल्याबाईंनी घोषणा केली कि "जो कोणी या दरोडेखोर डाकूंचा बंदोबस्त करेल त्या शूर व्यक्तीला वतनदारी देऊन त्याचा विवाह राजकन्या मुक्ताबाईंसोबत लावला जाईल. यावेळी जातपात बघितली जाणार नाही."
अहिल्याबाईंच्या घोषणेला साद देत यशवंत फणसे या युवकाने सैन्य हाताशी धरून दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. यशवंत फणसे आदिवासी समाजातले. होळकरांच्या सैन्यात सैनिक म्हणून काम करत. घोषणेप्रमाणे अहिल्याबाईंनी रूढी परंपरा मोडत आपल्या मुलीचा विवाह यशवंत फणसे यांच्यासोबत लावून दिला.
आंतरजातीय विवाहांची प्रथा पुढील पिढीत देखील चालू राहिली. त्यांचे वंशज यशवंतराव होळकर (धनगर) यांचा विवाह कोल्हापूरच्या शाहू महाराजांची चुलत बहीण चंद्रप्रभा बाई घाटगे (मराठा) यांच्याशी झाला होता.
छायाचित्र सौजन्य : किल्ले लासलगाव : Ahilyabai Holkar Fort

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...