विनोद जाधव एक संग्राहक

Monday 26 July 2021

खंडो बल्लाळ चिटणीस यांचे वंशज

 


खंडो बल्लाळ चिटणीस यांचे वंशज

पोस्तसांभार ::आशिष माळी
त्यांच्या वंशातील कुटुंब काही लोक महाराष्ट्र मध्ये आहेत काही गुजरात मध्ये आहेत (वडोद ).
आनंदराव तुकदेव हे त्यांच्याच पिढीताली पानिपत च्या युद्धात गमावला. या चिटणिशी कुटुंबांचे या महाराष्ट्र वर उपकार आहेत ते कधीच फिटणार नाही . यांच्या वंशजांनी चिटणीस आडनाव पण घेतले आणि काही जणांनी चित्रे आडनाव पण घेतले त्या शिवाय त्यांच्या काही वंशजांनी नारोळीकार कर्णिक बिनीवाले अशी आडनावे पण आहेत. त्यांचे एक वंशज रमेशचंद्र चिटणीस हे २००६ मध्ये मृत्यू पावले .
खंडोबा बल्लाळ यांच्या भावाचे निळोबा चिटणीस यांचे एक वंशज जीवनराव चिटणीस हे विनापत्य १९०९ मध्ये मरण पावले.बाकीच्यांची इत्यंभूत माहिती नाही.
चिटणिसी वतन खंडोबाकडे आलें होतें; परंतु ते चालविण्यास जीं गांवें दिली होतीं, तीं त्याच्याकडे शेवटपर्यंत चालली नाहींत. संभाजीराजे नंतर राजाराममहाराज जिंजी जाऊन पडल्यामुळें पैसा कोठूनहि मिळेनासा झाला. त्यामुळें खंडोबा नेहमी कर्जबाजारी राहून त्याच्या घरीं नेहमीं सावकारी धरणीं बसलेलीं असत. खंडोबाचा भाऊ निळोबा हाच घरचा कारभार पाहत असे. परंतु तो भयंकर उधळ्या असे. म्हणून खंडोबानें त्याच्याजवळ खर्चाबद्दल बोलणें सोडून दिलें होतें. खंडोबाची प्राप्ति म्हणजे पूर्वी येसूबाईकडून मिळालेला व नंतर राजारामाकडून मिळालेला ऐवज हीच होती. त्याच्या पहिल्या बायकोचें नांव म्हाळसाबाई असून तिला बहिरवजी नांवाचा पुत्र व पुतळाबाई नांवाची कन्या होती. ही बायको चंदीस गेल्यानंतर एक वर्षाच्या आंत वारली म्हणून दुसरें लग्न केलें. तिचेंहि नांव म्हाळसाबाई असेंच होतें. ती किंचित कुरूप होती. म्हणून राजाराम महाराजांनी तिसरें लग्न करून दिलें. तिचें नांव तुळजाबाई असें होतें. दुसर्या म्हाळसाबाईला जिवाजी, बापूजी, गोविंदराव व सदाशिव हे चार पुत्र व बायजाबाई ही कन्या होती. तुळजाबाईस एक पुत्र व सात कन्या अशीं आठ अपत्यें झाली. मुलाचें नांव भैरवजी व मुलींचीं संतु, आमा, अनु, सुंदरा, तुकाबाई, राणी व येसू अशीं होतीं.
जिंजी न निघतांना खंडोबा निघाला होता. गणोजी शिर्क्याने त्याचा कबिला पोहोंचता करावयाचा. परंतु निळो बल्लाळानें जर खंडोबाचा सर्वच कबिला येथून गेला तर आमची वाट काय म्हणून हट्ट धरला. तेव्हां म्हाळसाबाई व तिचीं मुलें काय ती गणोजीनें पोहोंचविलीं. नंतर किल्लेदाराची सरसबाई हिला मूल नव्हतें म्हणून पुतळाबाईची तीन वर्षांची एक कन्या ठेवून घेऊन तिची सुटका केली. खंडोबानंतर जिवाजी खंडेरावास चिटणिसीदिली.
संदर्भ

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...