विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 27 July 2021

विठ्ठल शिवदेव विंचूरकर (१६७५-१७६७) भाग २

 

मराठाशाहीतील एक शूर सेनापति व मुत्सद्दी.
विठ्ठल शिवदेव विंचूरकर (१६७५-१७६७)
पोस्तसांभार :: एकनाथ वाघ



भाग २
श्रीमंत बाजीराव पेशवे यांची ईतिहासात सर्वात जास्त लढाया जिंकणारे सेनानी म्हणून प्रसिद्धी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 1729 साली आघाडीचे सरदार म्हणून विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी बंगश यांचे विरूध्द धुरा सांभाळली.
बाजीराव पेशवे यांचे धाकले बंधू आणि अचाट शौर्याचे सेनानी चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली दयाबहाद्दूर यांचे विरूध्दचे युध्दात सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी मोठे शौर्य गाजवले.
1731 मधे सयाजी गुजर यांची घनघोर युद्धात सरदार विंचूरकर यांनी दाणादाण उडवली.
उत्तर हिंदूस्तानात 1734 ते 1738 या काळात सर्व युद्धांमधे विजय मिळवण्यात सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांचा मोठा वाटा होता.
त्यानंतर त्यांची नेमणूक वसई येथील युध्दांत करण्यात आली. तेथे ते 1738-- 1739 मधे कार्यरत होते.
नानासाहेब पेशवे यांचे हाताखाली सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी 1741 ते 1743 दरम्यान चढाया आणि युध्दे केली. पेशव्यांनी त्यांच्या मर्दुमकीवर खुष होऊन या काळाच्या दरम्यान त्यांना " अकरा महालांचा फौज सरंजाम " बहाल केला. त्याचबरोबर त्यांना " रानसे " आणि "मंडकी" ही दोन गांवे त्यांच्या खाजगी खर्चासाठी इनामात बहाल केली.
त्याच काळात पेंढारी लोकांची विंचूर आणि आजूबाजूच्या परिसरात लुटालुट आणि दहशत सुरू होती. पेंढारी लोकांना वठणीवर आणण्यासाठी पेशव्यांनी सरदार विंचूरकर यांची निवड केली आणि त्याप्रमाणे सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी त्यांचा निप्पात करून रयतेला त्यांच्या जाचातून सोडवले. पेशव्यांनी अतिशय खूष होऊन सरदार विंचूरकर यांना विंचूर आणि त्याच्या लगतचा मोठा परिसर तसेच मध्य प्रदेश मधील काही भाग सरंजाम म्हणून नावे करून दिली. त्यामुळे सरदार विठ्ठल शिवदेव यांचे आडनाव विंचूरकर असे पडले!
1753 साली श्रीरंगपट्टनम, सुरत, अहमदाबाद आणि कुंभेरी येथील मोठ्या युध्दांमधे सरदार विंचूरकर यांनी आघाडीवरून मोठा पराक्रम करून मराठी साम्राज्यासाठी विजयश्री खेचून आणली!
ग्वाल्हेर येथे 1754 च्या जाट राजाच्या विरूध्द सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी एकहाती विजय मिळवला.
सावनूर येथे 1755-1756 या काळात सरदार विंचूरकर तळ ठोकून होते आणि तिथेही त्यांनी विजय मिळवला.
दिल्लीच्या महत्वाच्या लढाईत 1756 साली नाजिब खान रोहिल्ला परास्त करून सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी यांनी त्याला कैद केले. दुर्दैवाने नंतर त्यांना सोडण्यात आले. त्यांच्या या शौर्या करिता विठ्ठल शिवदेव पेशव्यांचे एन्हॉय म्हणून दिल्लीत असतांना बादशाह आलमगीर (२) यांचे विरोधकां पासून जीवन रक्षण केल्यामुळे त्यांना बादशाहांनी उमेद तुल मुल्क बहाद्दूर ही पदवी त्याच बरोबर जहागिरी, जड जवाहीर, स्वतःची तलवार, छत्री, पालखी, उंची पोशाख देऊन गौरव केला. त्यांना चांदवड भागातील जहागिरी दिल्या. ते शाही फर्मान आजही विंचूरकर घराण्यात संग्रहित आहे..
1761 सालात पानिपत, राक्षसभुवन, हैदरच्या विरुद्ध रत्तेहळ्ळी, हैदरअली विरुद्ध आनेवाडी येथे सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी लढाया केल्या.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...