विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 27 July 2021

विठ्ठल शिवदेव विंचूरकर (१६७५-१७६७) भाग ३

 

मराठाशाहीतील एक शूर सेनापति व मुत्सद्दी.
विठ्ठल शिवदेव विंचूरकर (१६७५-१७६७)
पोस्तसांभार :: एकनाथ वाघ





भाग ३
1764 साली परत एकदा हैदरअलीशी बिदनूर येथे सरदार विंचूरकर यांनी टक्कर दिली.
गोहादेत येथे जाटांच्या विरोधात 1765 साली सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर हे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढले.
सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी यांना आयुष्यात खूप मानमरातब मिळाले.
नासिक जिल्ह्यात 45 गावे अहमदनगरमधे 9 गावे, आणि काही गावे पूणे जिल्यात पेशव्यांनी त्यांच्या नावे करून दिली. उत्तर हिंदूस्तानातील स्वार्यांच्या दरम्यान सरदार विंचूरकरांना सोळा लाख पंचेचाळीस हजार रूपयांची दौलत कमावली. सरदार विंचूरकर यांचे वाडे आजही विंचूर, नाशिक, पुणे, ग्वाल्हेर येथे ईतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत!
सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी आयुष्यात इतक्या लढाया केल्या पण असे असुनही त्यांनी आपल्या शौर्याने आणि कर्तबगारीने मिळवलेल्या संपत्तीपैकी मोठा विनियोग लोककार्यासाठी केला. त्यांनी अनेक ठिकाणी देऊळे बांधली.
पाणी साठवण्यासाठी जलाशय बांधले. कालवे काढले आणि शेतीसाठी चार्या खोदल्या. सरदार विंचूरकरांनी आयुष्यात कधीही जातीभेद केला नाही. मुख्य म्हणजे प्रत्येक विहीर आणि जलाशय सर्व जातींना खुले असावेत हा पायंडा पडला. रयतेला संरक्षणासाठी जागोजागी चौक्या बांधल्या आणि चोख बंदोबस्त ठेवला. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था सुरू केल्या.
असे महापराक्रमी आणि कर्तबगार मराठा सेनानी सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर हे 20 ऑगस्ट 1767 या दिवशी काळाचे पडद्याआड गेले.
कर्नल वालेस साहेबाबरोबर पेढार्यांच्या बंदोबस्ताकरितां हे गेले होते. या नंतर रघुनाथराव विंचूरकर हे गादीवर आले. यांचे कारकीर्दीनंतर विंचूरकराकडे दरसाल साठ हजारांची जहागिरी राहिली व बाकीची खालसा झाली.
स्रोत :
विंचूरकर घराण्याचा इतिहास; गाडगील-विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांचें चरित्र; धनूर्धारी.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...