सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेले कोळगिरी आणि सनमडी रस्त्यावरील प्राचीन भैरवनाथ मंदिर.
सनमडी व कोळगीरी दरम्यान पसरलेल्या डोंगररांगातील हे एक अतिप्राचीन अकराव्या शतकातील मंदिर आहे.
अति प्राचीन मंदिर स्वच्छ व सुंदर परिसर शांत वातावरण मनाला चेतना देऊन जाते. मंदिर प्रशासन आणि कोलगिरी ग्रामस्थांनी येथे सुधारणा करून हा मंदिर परिसर सुशोभित केलेला आहे.
असे ऐतिहासिक मंदिराला बदामीचे चालुक्य, मंगळवेढ्याचे कलचुरी घराणे,देवगीरी चे यादव यांचा वारसा लाभला.
या मंदिराबद्दल इतिहासात जास्त नोंद मिळत असल्याने बऱ्याच अंधश्रद्धा ऐकायला मिळतात ऐकीव माहितीनुसार हे मंदिर एका रात्रीत राक्षस लोकांनी बांधलं असं सांगितलं जात असलं तरी यात तथ्य नाही याबाबत मिळेल तेव्हा इतिहास मी आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
याबद्दल आपल्याकडे काही ऐतिहासिक नोंद किंवा माहिती मिळाल्यास नक्कीच कमेंट करा आणि शेअर करा.
अकराव्या शतकातील एक प्राचीन मंदिर पूर्ण दगडी बांधकाम केलेले असून इंटर lock पद्धतीने याचे बांधकाम केले असुन दगडी खांबावर छत उभारले असून मंदिरा कळस अलीकडच्या काळात बांधला आहे.
हे पुर्वीचे शिव मंदीर असुन आज आपण भैरवनाथ मंदिर म्हणून ओळखतो.मंदिरात तिन गर्भग्रह असून एका गर्भग्रह मध्यें श्री भैरवनाथ यांचीं मूर्ती असून इतर दोन गर्भग्रह मध्यें शिवलिंग पाहायला मिळते तसेच मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला एक भग्न अवस्थेत असलेली शिवलिंग पाहायला मिळते.
मंदिर हे पूर्वाभिमुख असून प्रवेशद्वारावर शरभ
पाहायला मिळतो मंदिराची रचना गर्भगृह सभामंडप अशी आहे.तसेच दोन्ही बाजूला भिंतीवर यक्ष कोरलेले आहेत. या पश्चिम बाजूला ही एक प्रवेशद्वार पाहायला मिळतं मंदिराच्या सभागृहात एक साधारणतः पाच फूट उंच असा एक शिलालेख भिंतीत बसवले असून त्यावर शंभर ओळीचा लेख कोरला आहे तो हालेकन्नड भाषेत पाहायला मिळतो हा शिलालेख राजा बिज्ज्ल् ने देवालय साठीचा दिलेले दान त्याचा उल्लेख मिळतो.
शिवाय मंदिर परिसरात पुष्करणी म्हणजेच पायऱ्या ची विहिर पाहायला मिळते पण आज ती पुर्ण दुर्लक्षीत आहे.
मंदिरासमोर तसेच मंदिराच्या उजव्या बाजूला मोठ्या प्रमाणात वीरगळी असून या परिसरात झालेल्या ही त्याची साक्ष देतात.
शिवाय त्यामध्ये वाघाची शिकार करताना वीरमरण आलेल्या आहेत याची वीरगळ येथे दिसून ओळखतो.
याशिवाय मंदिरातही एक स्मृतीशिला येते यामध्ये वीराच्या हातात तलवार आणि ढ़ाल असल्याचं दिसून येतं
संरक्षण करताना वीरगती प्राप्त झालेल्या वीरांची ही स्मृती शिळा आपल्याला पाहायला मिळते..
कलचुरी घरान्यतिल आमुगी/आमेश्वरा...यानेही या प्रदेशावर शासन केलं.
बिज्ज्ल पहिला हा इ.स 1057 मध्ये चालुक्य सोमेश्वर याचा पहिला सामंत होता तो या भागात कार्यरत होतात त्याच्या आधिपत्याखाली हा भाग होता बिज्ज्लचा मुलगा कन्नम्मा दुसरा हादेखील इ.स्.1067 मध्ये चालुक्यांचा सामंत होता. डॉक्टर देसाई यांना असं सुचवलं आहे की जोगमा इ.स. 1080 मध्ये सत्तेवर आला त्याच्याशी संबंधित असणारा सर्वात पहिली नोंद ही जत तालुक्यातील कोळीगिरी च्या शिलालेखात मिळते ते वर्ष म्हणजे 1087-88 त्यांच्या अधिपत्याखाली विक्रमादित्य VI राज्य करत होता त्यावेळी जोगम्मा हा कराड प्रन्तातील 4000 गावाचा गव्हर्नर होता.अशीही नोंद आढळते.
माडग्याळ शिलालेखामध्ये शेजारील गावांची नाव वर्णिले आहेत त्यामध्ये सणबंडे, कोळनुर, वसुबीगे, डोंगरगाव, लोणार,मलिगे,चामुंडी टेकडी अशी नावे असुन त्यात सनबन्दे चा अर्थ सनमडी, कोलनुर चा कोळगिरी,तर वासुबीगें चा अर्थ वळसंग असा लावायला हरकत नाही. साम्य पडताळून पाहतां निष्कर्ष लावायला हरकत नाही.
याशिवाय मंदिरासमोर अनेक तुटलेल्या मुर्त्या पूर्वी पाहायला मिळत होत्या पण आज काही नाहीसे झालेत हा ऐतिहासिक ठेवा जतन करणे गरजेचे आहे मंदिराचे इन्फ्रास्ट्रक्चर पाहता येथे भव्य मंदिर बांधण्याची योजना असावी पण सततच्या युद्धांमुळे आणि बदलत्या राजसत्तेमुळे त्यामुळे कदाचित ते अपूर्ण राहिले असावेत मंदिरासमोर असलेला एक मोठा अखंड दगडी खांब पाहता मोठ्या मंदिराच्या निर्मितीचे काम हाती घेतल्याचे दिसून येतं.
मंदिर परिसरात आणि गावाच्या जवळच आपल्या दोन पावत का दिसतात त्या पूर्वीच्या टॅक्स कलेक्शन सेंटर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवाय मंदिर परिसरात समाधी स्थळे असून ती अज्ञात आहे त्याविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही.
इथला घाटमाता खळखळणारे पाणी, वाहता धबधबा, निसर्गरम्य परिसर हा तालुक्यातील एकमेव ठिकाण आहे.
निसर्ग, अतिप्राचीन मंदिर ,धबधबा, तलाव पाहायचं असेल तर आपण नक्कीच पावसाळ्यात भेट देऊ शकता.दोन्ही बाजूंनी डोंगर कडा असल्यामुळे मंदिराच्या वैभवात आणखी भर पडते तरुणांनाही हा परिसर पाडतो. सेल्फी पॉइंटसाठी हा परिसर तरुणांना आकर्षित करत आहे
या परिसरात मोठं उद्यान निर्मिती, मंगल कार्यालय बनण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून ते पूर्णत्वास येत आहे.
वीज निर्मिती प्रकल्पामुळे आणि इथे उभारलेला पवनचक्क्यांमुळे हा परिसर अजून सुंदर दिसतो. या भागात वनीकरण होणे गरजेच आहे.
प्रतिवर्षी श्रावण महिन्यात येथे उत्सव साजरा केला जातो. उत्सवाच्या दरम्यान होणाऱया कुस्तीत भाग घेण्यासाठी जिल्यातील कुस्तीपटू आपलें कौशल्यं दाखविण्यासाठी येथे येतात.. कुस्ती ची परंपरा जपनारे तालुक्यातील एकमेव गाव आहे.
आपल्याला लेख कसा वाटला नक्की कळवा .
लेखन: दिनकर लवटे
मोबाईल: 9561051308
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (दिनकर लवटे )©कॉपीराईट आहे.
अधिक माहित साठी login करा
YouTube :
No comments:
Post a Comment