विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 8 July 2021

दुष्मनाने केलेलं कोडकौतुक....!!

 


दुष्मनाने केलेलं कोडकौतुक....!!

मराटे चपल मादवॉं पो सवार
पर्या ज्युं कि जिन्ना के राना तल्हार
दिसेना वो जल्दी के वक्त अपने आप
बिरादर है सावां के चोरो के बाप
हर एक मादवॉं उनकी गोया परी
दिखावे चंदर को अपस दिलवरी
करे फिर जो काव्यां कि खूबी अयां
पडे पेच में देख आबे -रवा
करे दौड में आ को बारे में सूं बात
मुंडासा ले उस का उडे हात हात
हर यक नेजाबाजी मे रावुत बडा
खुलेगा चंदर हत ते काडे कडा
जो धन फौज के नाज में मूय निपट
तो नेज्यां की उंगली सू खोले घुंगट
अलीनामा अध्याय २६
याचा अर्थ मराठे अत्यंत चपळ घोड्यांवर स्वार होतात. या घोड्या पिशाच याच्या मांडी खालील परी अप्सरा होत. मराठी इतकेच चपळ असतात की त्वरेच्या वेळी ते आपले आपणालाही दिसत नाही. ते साधूंचे सज्जनांचे बंधू व चोरांचे बाप असतात. त्याची प्रत्येक घोडी जणू काय परी असते व ती चंद्राला आपला चष्का लावते .ते आपल्या गनिमी काव्याची वैशिष्ट्य व श्रेष्ठत्व दाखवते तेव्हा वाहत्या पाण्याचा प्रवाह ही पेचात पडतो. प्रत्येक मराठा शिलेदार भालाफेकीत शूर व पटाईत असतो. हा मराठा खुलून जातो तेव्हा तो चंद्राच्या हातातील कडे काढतो .हा आपल्या फौजेच्या गर्व आणि अभिमानात असतो. त्याची प्रेयसी विरहाने अर्धमेली होते .तेव्हा तो आपल्या भाल्याच्या बोटाने आपल्या प्रेयसीच्या मुखावरील घुंगट बाजूस सारतो.
मराठ्यांचं हे वर्णन केले मराठ्यांच्या दरबारचा कवी वगैरे करत नाही तो करतोय आदिलशाही दरबारचा कवी मुल्ला नुस्रती. शिवछत्रपतींच्या स्वराज्याने ज्या राजसत्तेशी पहिल्यांदा वैर धरले आणि ती राजसत्ता कायमची धुळीस मिळाली त्या राजसत्तेचा म्हणजे आदिलशाही दरबाराचा तो कवी हा मुल्ला नुस्रती. आदिलशाही वातावरणात विजापूरचा त्याचा बाप छोटासा सरदार असून त्याने बाणेदारपणा जीवन जगले. असं हा नुस्रती म्हणतो. त्याच्या शिक्षणाची त्याच्या वडीलांनी चांगली सोय केली होती. त्यांच्या काव्यातून शिवछत्रपतींच्या मावळ्यांचा करता येईल तेवढा अपमान तो करत होता. मुल्ला नुस्रती चे तीन ग्रंथ व काही स्फुट काव्य उपलब्ध आहेत. त्याचा पहिला ग्रंथ गुल्शन ए इष्क असून तो त्याने हीजरी सण १०६५ ला मध्ये लिहिला. प्राचीन उर्दू काव्यात नुस्रती चे फारच महत्व आहे. उर्दू लप्फेदार भाषा म्हणून ओळखली जाते. आणि या भाषेचे जाणकार या नुस्रती ला आद्यकवी संबोधतात. खरंच महाराजांच्या विरोधकांमध्ये महाराजांची करता येईल एवढी विटंबना त्यांनी त्यांच्या साहित्यात करण्याचा प्रयत्न केला. पण वर उल्लेख केलेल्या काव्यामध्ये तो एका ठिकाणी म्हणतो की हे मराठे साधुसंतांचे बंधू आणि चोरांचे बाप आहेत मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या वृत्तीचे आणि त्यांच्यात चोखंदळपणा चे वर्णन तो करतो.
हे वर्णन यासाठी महत्त्वाचे की मराठी लष्कराचं हे कोडकौतुक हा त्यांच्या विरोधी असलेल्या राजसत्तेच्या दरबारात ला कवी करतोय . आणि हे सुद्धा अधोरेखित करतो कि तत्कालीन शत्रू प्रदेशात मराठ्यांची दहशत फक्त त्यांच्या आक्रमक शैलीमुळे नव्हती तर त्यांच्या सुसंस्कृतपणा मुळे होती त्याचं हे विशेष.
-सचिन शिवाजीराव खोपडे देशमुख.
बारा मावळ परिवार.
संदर्भ-अलिनामा.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...