विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 7 August 2021

मराठेशाहीतील धाडशी मराठी वीरांगना लाडकुबाई देशपांडे भडगाव

 


मराठेशाहीतील धाडशी मराठी वीरांगना लाडकुबाई देशपांडे भडगाव

सोळाव्या शतकात जेव्हा मुगलांनी आशिरगड ताब्यात घेण्यासाठी वेढा दिला तेव्हा या लढाईत भडगावच्या रामजीपंत देशपांडे यांनी बरीच मदत केली. तेव्हा जहागीरी म्हणून त्यांना नशिराबाद, एरंडोल, जामनेर, बहाळ, आणि भडगाव हे परगणे देण्यात आले. भडगाव या मूळ गावी रहात त्यांनी बरीच विकास घडवून आणला. या काळात पांढऱ्यांचा बराच त्रास शेतकरी आणि गावातील समृद्ध लोकांना होत असे. रामजीपंत देशपांडे यांच्या मृत्यूनंतर लाडकुबाईने कारभार नीट सांभाळला. आणि नदीच्या पात्रात तीनशे भिल्लांना कंठस्नान घातले. आणि त्यांच्या उपद्रवाचा बिमोड केला. चार मजली प्रचंड मोठा बुरुज तसेच वाडा, तटबंदी या वैभवाची साक्ष देत उभी आहे. लाडकुबाईच्या शौर्याच्या कहाण्या आणि वैभवाच्या दंतकथा आजही भडगावला सांगितल्या जातात.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...