विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

श्रीमंत पेशवा || बाजीराव बल्लाळ भट ||

 दि. १८ ऑगस्ट, १७००


श्रीमंत पेशवा
|| बाजीराव बल्लाळ भट ||
जयंती
"....रायांचीही बुध ( बुद्धी ) रयेत परिपाळणांस पूर्ण. देवाब्राह्मणांची स्थापना करून काश्यादिक माहास्थली विश्वेश्वराचा जीर्णोद्धार करावयास निरंत(र) होऊन त्याच मार्गेकरून रयेत नांदविली..."
महादेवभट हिंगणे, दिल्लीतील मराठ्यांचे वकील बाजीरावांबद्दल म्हणतात,
" तीर्थरूप कैलासवासी नाना ( बाळाजी विश्वनाथ ) याची नजर रयेत पाळावी अशी व जनाची दुवा घ्यावी हेच त्याचे चित्तात कायावाङ्मन्सा ( तनामनात ) होते. तद्नुरूपच, अरण्यवत मुलूक जाहला होता त्यास कौल देऊन, कंटकाचा उच्छेद करून रयेत नांदविली. रयेतीचा आसीर्वाद घेतला. तन्मुळे नानाची कीर्ती लोकोत्तर प्रकाशमान जाहली. नानाचा काळ जाहला. तीर्थरूप राव ( बाजीराव ) प्रधानपदास आठई जाहले. राजश्री ( स्वामींनी शाहू महाराज ) कृपा करून गौरव केले. नानांच्या पदरी रयेतीची दुवा व देव ब्राह्मणाची स्थापना केली त्यांचा आसीर्वाद, पदरी विपुल ते पुण्य नानांनी रायाचे पदरी बांधले व रायांचीही बुध ( बुद्धी ) रयेत परिपाळणांस पूर्ण . देवाब्राह्मणांची स्थापना करून काश्यादिक माहास्थली विश्वेश्वराचा जीर्णोद्धार करावयास निरंत(र) होऊन त्याच मार्गेकरून रयेत नांदविली. रेवादक्षणतीरी देवाब्राह्मणांची स्थापना करून महास्थलाचा जीर्णोद्धार केला. पुढे उत्तरप्रांती कीर्तिलता प्रफुल्लित केली. विश्वेश्वराची स्थापना करावी हे आर्त होतीच. नानानी कीर्ती संपादिली, त्यापेक्षा दशगुणीत कीर्ती जगत्यात रायाची प्रकाशमान जाहली. राव पूर्ण प्रतापी प्रतिश्रीष्टकर्ते होते. सर्वा हिंदूंस महादाश्रये रावच होते. रायासारिखा सामानपूर सर्व गोष्टीने संपूर्ण दक्षणेस या हिंदुस्थानात दुसरा कोणी नव्हता. असो, राव काये घेऊन गेले ? रायांनी सर्व ठेविले आहे. पहिल्यापासून आम्ही व वरकड रायांच्या पदरी होतो, ते ( तसेच ) आहो. रायानी येश कीर्ती जोडीली तिची अभिवृद्धी करावी हेच मानस आहे. श्रीकृपे सर्वही रायाच्या तपोबळपण्येकरून घडेल. "
संदर्भ :
हिंगणे दफ्तर १, ले. १५
शहामतपनाह बाजीराव - कौस्तुभ कस्तुरे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...