एक अजोड व्यक्तीमत्व....
माधवराव पेशवे
२७ जुलै माधवराव पेशवे यांना पेशवेपद मिळाले......
पानिपतच्या पराभव नानासाहेब पेशव्यांना अपेक्षित नव्हता त्यामुळे या धक्काने ते सावरु शकले नाही. २३ जून १७६१ मध्ये त्यांचे निधन झाले. नानासाहेब पेशव्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र माधवराव यांना पेशवाईची वस्त्रे २७ जुलै १७६१ मध्ये देण्यात आली. वयाच्या १६ व्यावर्षी ही मोठी जबाबदारी पार पाडणे सोपे नव्हते. कारण पानिपतच्या -३ मध्ये मराठ्यांची एक पिढी गारद झाली. मराठी सत्तेचा दबदबा पुन्हा निर्माण करण्यासाठी माधवरावरावांनी अपार कष्ट घेतले. माधवरावांचे मनोधैर्य मोठे होते.केवळ ११ वर्षाच्या छोट्या कारकीर्दीत माधवरावांनी पानिपतच्या युद्धामुळे झालेली हानी तर भरुन काढलीच पण त्याचबरोबर निजाम , हैदरअली यासारख्या शत्रूंचा निःपात करुन मराठी सत्तेची प्रतिष्ठा वाढविली. उत्तरेत मराठ्यांचा पुन्हा दबदबा निर्माण करण्यात माधवरावांना" महादजी शिंदे"यांची खूप मदत झाली.माधवरावांना अकरा वर्षाच्या कारकीर्दीत अनंत अडचणी आल्यात ; मात्र त्या अडचणीवर मात करत माधवरावांनी मराठी सत्तेला बळकटी निर्माण केली. माधवरावांचे प्रशासन कसे होते ? या संदर्भात अनेक दाखले देता येतील. एकदा माधवराव अन्य मोहिमेवर गेले असताना निजामाने पुणे लुटले. माधवराव पुण्यास आल्यावर झाल्या प्रकाराची चौकशी त्यांनी सुरु केली. त्यावेळी माधवरावांचे सख्खे मामा मल्हारराव रास्ते यांनी निजामाला पुण्यातील श्रीमंत लोकांची घरे दाखवल्याचे समजले. मामा मोठ्या ऐटीत होता. मला काय शासन होणार ? मात्र माधवरावांनी मल्हारराव रास्तेची सर्व मालमत्ता जप्त करुन ज्याचे नुकसान झाले ते भरुन देण्याचा आदेश दिला. त्यावेळी मातोश्री गोपिकाबाईनी हट्ट धरला जर रास्तेना शासन झाले तर मी शनिवारवाडा सोडून जाईल. माधवराव न्यायनिष्ठूर होते. त्यांनी आपला निर्णय कायम ठेवला. अखेर गोपिकाबाईंनी शनिवारवाडा सोडला व ते नाशिक येथील गंगापूर भागात निघून गेल्या.माधवरावांनी अशाप्रकारे आपले प्रशासन काटेकोर व निःपक्षपाती बनविले.
-- प्रशांत कुलकर्णी मनमाड
संदर्भ - मराठ्यांचा इतिहास खंड -२
स्वामी - रणजित देसाई
No comments:
Post a Comment