विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 20 August 2021

महाकाव्य रचेता.... महाकवी कालिदास !

 

महाकाव्य रचेता.... महाकवी कालिदास !

एकदा काही विद्वान लोकांनी  ठरविले की , जगाच्या  पाठीवरील प्रतिभासंपन्न अशा कवींची नावे शोधू या. अर्थात पहिले नाव महाकवी कालिदासचे नाव घेण्यात आले.

            संस्कृत भाषेतील महानकवी कालिदासाच्या साहित्यांची मोहिनी भारतीयच नव्हे तर पाश्चात्त्य  लेखकांना भुरुळ पडली होती. पाश्चात्त्य इतिहासकार विल्यम जोन्स याने शांकुतलचे इंग्रजीत अनुवाद केल्यावर  पाश्चात्त्य  लेखक  गटे " शांकुतल " डोक्यावर  घेऊन अक्षरशः  नाचला होता.  त्याने कालिदासाला " भारतीय शेक्सपिअर म्हणून  संबोधले.  प्राचीन भारतातील समुद्रगृप्तचा पुत्र दुसऱ्या  चंद्रगृप्त अर्थात विक्रामादित्यांच्या दरबारात  कालिदास   राजकवी होता. त्याने मालविका- अग्नीमित्र , विक्रम- उर्वशी, कुमारसंभव , रघुवंश सारखे अनन्यसाधारण  साहित्य  तयार केले. आता आपण कालिदासाच्या साहित्यांची थोडक्यात माहिती मिळवू या !

१. मालविकाअग्नीमित्र - हे नाटक प्रसिद्ध  शुंगराजा पुष्यमित्राचा पुत्र अग्निमित्र व त्यांची दासी मालविका यांच्या प्रणयकथेवर आधारित आहे. 

२.विक्रम -उर्वशी - हे नाटक प्रसिद्ध  राजा पुरुरवा व सौदर्यांची  खाण स्वर्गातील उर्वशी यांच्या प्रेमावर आधारित आहे.यात पृथ्वी  व स्वर्गाचे मिलनाचे सुंदर वर्णन केले.

३.अविज्ञान -शाकुंतल - कालिदासांचे सर्वात प्रसिद्ध नाटक म्हणजे  अविज्ञान -शाकुंतल होय.ही कथा मूळची महाभारतातील दुःश्यंत व शंकुतला यांचा गांधर्व विवाह व पुढे त्यांची ताटातूट होते. अंगठी सापडल्यावर त्यांचे पुन्हा होणारे मिलन अशी ही कथा आहे. महाभारतातील मूळ सांगाड्याला आपल्या  प्रतिभेचा मुलामा देऊन अनमोल कलाकृती कालिदासाने निर्माण  केली. 

४.कुमारसंभव -हे कालिदासाचे खंडकाव्य  असून यांचा मूळ स्त्रोत हा पुराणातून घेतला आहे. असुरराज तारकासूर त्रास त्यांतून सर्वाना  बाहेर काढण्याचे काम शिव -पार्वतीचा ज्येष्ठ  पुत्र कार्तिके त्याचा वध करतो.  अशी ही कथा आहे.

५.रघुवंश -यात रघुकुलातील सत्यवचनी राजांच्या कीर्तीची मागोवा घेतला आहे. मनुपासून श्रीरामाची श्रेष्ठ राजांचे वर्णन यात केले आहे.

६.मेघदूत - हा ग्रंथ हिमालयातील अलकानगरीतील कुबेरांच्या सेवेत असलेला यक्ष व त्यांची  पत्नी यांच्या विरहावर आधारित ही कथा आहे. पुढे यक्षाला राज्यातून हद्दपार केले जाते.  व  तो त्यांची पत्नीच्या विरहाने व्याकूळ होऊन  वर्षाऋतुतील मेघाला दूत बनवून अलकानगरीत संदेश देतो. त्यामुळे त्याला मेघदूत हे शिर्षक 

आहे.

७.ऋतुसंहार -कालिदासाचे एकमेव काव्य म्हणजे  ऋतूसंहार होय.  हे निर्सगावर आधारित असून ग्रीष्म ,हेंमत ,शरद ,शिशीर ,वर्षा व वसंत  या ऋतूतील बदलाचे काव्यात्मक वर्णन केले आहे.

अशा त-हेने इंद्रधनुष्यातील सप्तरंगाप्रमाणे प्रज्वलित असे महाकवी कालिदासाचे साहित्य आहे.

 कालिदासाच्या साहित्यातून आपणास त्यांची अलौकिकता ,रसिकता , श्रेष्ठ  नाटककार , मोठा विद्वान  अशा अष्टपैलू कलेची ओळख होते. "मेघदूत" हे काव्य त्याने महाराष्ट्रातील वाकाटक राज्यात पूर्ण  केले. तसेच "ऋतूसंहार " या साहित्यांत निसर्गात सहा ऋतूमधील होणाऱ्या  बदलांचे छान दर्शन  आपल्याला घडते. असा हा प्राचीन भारतातील महाकवी कालिदासाच्या साहित्यांतून अनेक  रसिकेतेचे दालन खूलतात.

---- प्रशांत  कुलकर्णी  मनमाड


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...