विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 20 August 2021

संतशिरोमणी..... संत सावता माळी.....

 


संतशिरोमणी.....

संत सावता माळी.....


१२ जुलै संत सावता माळी यांची पुण्यतिथीनिमित्त लेख!


   "कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी’'

’'लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि  !

असे  अभंग रचणारे ज्ञानदेव व नामदेवांच्या प्रभावळीत ज्येष्ठ संत म्हणजे  संत सावता माळी होय. सावता माळी यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील  माढा येथे इ.स.१२५० मध्ये झाला. त्यांच्या घराण्यात वारीची परंपरा  होती.  सावता माळी हे पंढरपूरच्या विठ्ठलांचे परमभक्त होते. विशेष  म्हणजे  ते कधीही पंढरपूरच्या वारीला गेले नाही.  त्यावर सावता माळीचा अभंग खूप काही सांगून जातो. अभंगात ते म्हणतात .......

‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग

मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’

म्हणजेच  "कामातच राम शोधावा." "Work  is workship"  हा विचार सावता माळी यांनी  आपल्या कृतीतून लोकांना  दिला. पंढरपूरला जाणाऱ्या  लोकांना  ते आपल्या  शेतीतील पिकवलेली भाजी देत असे. ती पंढरपूरच्या विठ्ठलासाठी माझी भेट असे ते म्हणत असे.

संत सावता माळी यांच्या बद्दल संत नामदेव मोठ्या  सुंदर  शब्दांत वर्णन करतात त्यांत ते म्हणतात ,

धन्य ते अरण, रत्नांचीच खाण।जन्मला निधान सावता तो।।

सावता सागर, प्रेमाचा आगर!  

सावता माळी शेतात कष्ट करत असताना विठ्ठलाचे नाव घेत असे. त्यांनी  अनेक  अभंग रचले मात्र सध्या त्यापैकी फक्त ३७ अभंग  आज उपलब्ध  आहे.ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा अनुभव होता. ईश्वर भक्ती करताना अंधश्रध्दा , कर्मटपणा व अवडंबर  याला त्यांनी  कधीही थारा दिला नाही. ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्र्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन हवे ,असे निर्भिडपणे अभंग सावता माळी मध्ययुगाच्या सुरुवातीला मांडतात हे खरोखरच  विलक्षण  आहे. आपल्या ४५ वर्षाच्या आयुष्यात  त्यांनी विठ्ठलाच्या भक्तीचा अनोखा मार्ग दाखविला.आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्त विनम्र  अभिवादन!

---- प्रशांत  कुलकर्णी  मनमाड

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...