विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

नाना फडणीस-

 नाना फडणीस-

माधवरावांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ  बंधू नारायणराव पेशवे पदावर आरुढ झाले. मात्र रघुनाथरावांच्या  सत्ता लोभापायी नारायणरावांचा खून करण्यात आला. काही काळ रघुनाथराव  पेशवे पदावर विराजमान ही झाले. मात्र रघुनाथरावांचे सत्तेसाठी केलेल्या या हीन कृत्यांचा विरोध दरबारातील अनेक  मुत्सद्यांनी केला त्यांतील प्रमुख  म्हणजे  नाना  फडणीस होय. रघुनाथरावाला पेशवे पदापासून दूर करुन    १२ मातब्बर  सरदारांचे मंडळ तयार करण्यात आले. या नव्या योजने अंतर्गत  रघुनाथरावांना पेशवे पदापासून दूर ठेवणे, तसेच नारायणरावांची विधवा पत्नी  गंगाबाई ही गरोदर होती तिला सुरक्षित  ठेवून तिच्या वंशजाच्या नावाने या बारा लोकांनी  कारभार सांभाळणे.  तसेच जर गंगाबाईंना कन्या जन्माला आली तर समशेरबद्दादर  [थोरले बाजीराव पुत्र]  यांचे पुत्र अलीबद्दाहर यांना पेशवेपदावर बसवायचे ठरले. या योजनेचे प्रमुख  नाना फडवणीस होते. त्यांच्या बरोबर सखारामबापू बोकील , महादजी शिंदे , तुकोजी होळकर , हरिपंत फडके ,त्रिंबकराव पेठे ,बाबूजी नाईक , भवानराव प्रतिनिधी , मोरोबा फडवणीस  , मालोजी घोरपडे ,मल्हारराव रास्ते आणि  पटवर्धन  असे एकूण बारा मुत्सद्दांची योजना असून त्याला बारभाईचे कारस्थान  म्हणून  इतिहासात  रुढ झाले. नाना फडणीसांनी मराठेशाहीसाठी केलेली कामगिरी  इतिहासात  संस्मरणीय ठरलेली आहे. नारायणरावांच्या मृत्यूनंतर  मराठेशाहीत कमालीची अस्थिरता निर्माण  झालेली होती. ती सावरणे रघुनाथरावांच्या  कारवा-यांना तोंड देणे संधिसाधू इंग्रजांशी झालेल्या पाहिल्या युध्दात बारा मुत्सद्यांना एकत्र करुन तोंड देणे.  इंग्रजावर मात करणे. इंग्रजांचे डावपेच  ओळखून  निजाम व हैदर यांच्याशी संधान बांधणे हे राजकारणाच्या पटलावरील अवघड खेळी होत्या. मुधोजी भोसल्यांनी नानांचा गौरव करताना  दोन दशके मराठा मंडळाचा कारभार यशस्वीपणे  सांभाळणारा कर्तबगार  कारभारी असे म्हटलेले आढळते. नारायणरावांची पत्नीला पुत्ररत्न होऊन त्यांचे नाव "सवाई माधवराव " असे ठेवण्यात आले. त्यांना वयाच्या ४० व्या दिवशी पेशवाई वस्त्रे देऊन सर्व कारभार नाना फडवणीस पाहू लागले. त्या दरम्यान सर्व  मराठा मंडळाला एकसूत्रात बांधणे, निजाम ,हैदर व पुढे टिपूच्या कारवा-यावर लक्ष ठेवणे. ब्रिटिशांच्या डावपेच ओळखून राजकारण करणे त्यामुळे मराठेशाही  दोन तपे सुरक्षित   राहिली.


-- प्रशांत कुलकर्णी मनमाड


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...