विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 7 August 2021

मराठेशाहीतील सरदार जळगावचे राणोजी भोईटे


 मराठेशाहीतील सरदार जळगावचे राणोजी भोईटे

हे मराठी सरदार होते. राणोजी शिंदे आणि दत्ताजी शिंदे यांना समकालीन होते. उत्तरेकडील मोहिमांमध्ये भाग घेणारे महत्त्वाचे सरदार होते. पानीपतच्या लढाईत जिवंत राहिलेल्या मराठी सरदारांनी स्वतंत्र राज्य निर्माण केले पण भोईटे हे शाहू सातारा येथील महाराजांच्या सेवेतच शेवटपर्यंत राहिले.
पहिल्या बाजीराव यांच्या काळात अनेक लढायांत भाग घेतला. त्यांच्या कार्याची ओळख करून घेण्यासाठी त्यांनी लढलेल्या प्रमुख लढायांचा लेखाजोखा मांडला आहे. त्यातील प्रमुख माळवा इ.स. १७२३, धार इ.स. १७२४, औरंगाबाद इ.स.१७२४, पालखेडच्या लढाईत इ. स. १७१८, अहमदाबाद इ. स. १७३१, उदयपूर इ. स. १७३६, फिरोजाबाद इ. स. १७३७, दिल्ली इ. स. १७३७, भोपाळ इ.स.१७३८, वसईची लढाई इ.स. १७३९ या होय.
निजामाच्या विरोधात राणोजी भोईटे आणि सरदार कान्होजी भोसले हे बरोबर वऱ्हाडातील मुलुखगिरीवर होते. राणोजी भोईटे यांनी पाच हजार सैन्यासह १७२८ मधील लढाईत नेतृत्व केले होते. सरदार भोईटे यांनी बंडखोर सरदार उदोजी चव्हाण याचा बंदोबस्त करण्यासाठी सरदार पिलाजीराव जाधव आणि अंबाजीपंत यांची पुसेसावलीच्या लढाईत मदत केली होती.
१७५० मध्ये संभाजी शिंदे पाटील यांच्या सोबत त्यांनी सहा हजार फौज घेऊन राजपूत रामसिंग आणि भक्तसिंग यांचा अजमेर येथील लढाईत नेतृत्व केले होते. पुढे दहा ऑक्टोबर १७५५ मध्ये अजून एक मोहिमेत भोईटे सरदारांनी चांडोल येथे मराठी सैन्याने राजपूतांना हरवले. सोळा ऑक्टोबरला सहा हजार फौज घेऊन राजपूतांच्या पंचवीस हजार फौजेशी मुकाबला केला. धेकला या किल्ल्यावर झालेल्या युध्दातील मराठी विजयानंतर स्थानिक राजपुत राजाने "शिवपूरचा राजा" हा किताब दिला जो उदयपूर येथील राजा या सन्मानाएवढा होता. वीस लाख रूपये आणि किल्ल्याचा ताबाही मिळवला. आणि पुढे हा किताब राणोजींच्या वंशजांना सुरू राहिला. मराठी सरदारांमध्ये भोईटे सरंजाम म्हणून ओळखले जाते. भोईटे यांचे वंशज त्यांनी जिंकलेल्या भागात राहतात. त्यापैकी बरेच सैन्यातच होते.
भोईटे हे आडनाव बहुतेक महाराष्ट्रातील सीमेवरील प्रांतात राहणाऱ्या लोकांचे आहे.
भोईटे हे भाटी राजपूत आहेत. यदुवंश तसेच ब्रम्हवंश राजघराण्यातील आहेत. पुढे सुर्य वंशज आणि तर चौथ्या पिढीत सिध्द झाले की ते सुर्यवंशी मराठे आहेत. काही भाटी राजपूत हे सुर्यवंशी राजपूत आहेत. ज्यांचे सहारण गोत्र आहे तर भाटी हे लाहोर, पंजाब भागातील रघुवंशी राजा लव यांचे वंशज म्हणून सुर्यवंशी म्हणतात. हे जरी प्रचलीत असले तरी खानदेशातील लेवा पाटीदार समाज यांच्या बद्दलही अशीच मान्यता आहे. सखोल अभ्यास करून काही सांगता येईल.
"भोईटे सरंजाम" हा शब्दप्रयोग ब्रिटीश राजवटीतील आहे. जो बॉम्बे प्रेसिडेन्सी अंतर्गत येत असे. आणि राजधानी जळगाव ही होती. ही मराठ्यांची जहागिरी भोईटे सरदारांना दिली होती असे म्हणता येईल.
मुळ जहागिरी ही ताथवडे, वाघोली, हिंगणगाव आणि अरडगाव ही होती.
सरदार तुळाजीराव भोईटे यांनी जळगाव येथे राजधानी केली आणि गढी उभारली जी भोईटे गढी म्हणून ओळखली जाते. त्र्यंबकराव बापुराव भोईटे, इनामदार, सरंजाम, जळगावचे राजे १९३९ यांची ही तस्वीर आहे. भोईटे सरंजामांच्या भोईटे सरनौबत आणि सेनाकर्ता सातारा या दोन मुख्य शाखा आहेत. हा सरंजाम किताब १९५२ मध्ये खारीज करण्यात आला. १७६२ च्या पानीपतच्या पराभवानंतर भोईटे जळगावात स्थायिक झाले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...