महाराष्ट्रात बौध्द विचार कधी आला?
माहिती स्रोत: प्रा.श्रीकांत गणवीर बौध्द अभ्यासक आणि पुरातत्वज्ञ
महाराष्ट्रात बाराशेच्या वर कोरीव लेणी आहेत आणि त्यात सर्वाधिक बुद्ध लेणी आहेत. अगदी विभागणी करायची झाली तर मराठवाडा येथील, अजिंठा, वेरूळ, औरंगाबाद, घटोत्कच, बनोटी, पितळखोरा हा एक विभाग तर मुंबई भागातील कार्ला, भाजे, बेडसे, कान्हेरी, कोडाणा, कोंडि़वटे, कुडा नाशिकमध्ये नाशिक, जुन्नर आणि कोकणातील अशी विभागणी होऊ शकते. याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लेणी कोरल्या गेल्या या अर्थी या भागात बुद्ध धर्म खूप लोकप्रिय असावा. या लेणीतील शिलालेखात दान देणाऱ्यांत सातवाहन राजे, क्षत्रप राजे, वाकाटक राजे आहेत. ज्याप्रमाणे राजे दानकर्ते आहेत तसेच कारागिर, व्यापारी व बुद्ध भिक्षुक- भिक्षुणीही आहे. ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे किंवा विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील देवटेक येथे सापडलेले मौर्य अशोकाचे शिलालेख हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन शिलालेख होत.
मग प्रश्र्न पडतो की हा विचार महाराष्ट्रात कधी आणि कुणी रूजवला? महाराष्ट्रात बौध्द धर्म कधी आला या प्रश्नाचा विचार केला तर तो बुध्दाच्या काळातच आलेला दिसतो. यात महत्वाचे योगदान बावरी या तपस्वी बद्दल उल्लेख येतो.
गोदावरी काठावर राहणाऱ्या बावरी या वैदिक आणि उपनिषदे शिकवणाऱ्या तपस्वीची कथा सुत्तनिपात मध्ये येते. शिवाय गांधारकलेतील काही पॅनेलवर आणि लेणीत बुध्द आणि बावरी यांच्या संवादाची शिल्पे कोरलेली आहेत. बदांनकुर्ती जे बावापुरकुर्डू जिल्ह्यातील आहे तिथे बावरी होता आणि आपल्या शिष्यांना खानापूर मंडल असा उल्लेख येतो. निर्मल जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावर जिथे गोदावरी दोन भागात विभागली गेली आहे तिथल्या एका बेटावर रहात होता. त्याने आपले सोळा शिष्य आणि आपले काही प्रश्न घेऊन श्रावस्तीला पाठवले. ते शिष्य ज्यामार्गे श्रावस्तीला गेले तो मार्ग प्राचीन काळातील मार्गावर उजेड पाडू शकतो. तो असा मेत्ररक आणि सोळाजण हे दक्षिणपथावरून राजगृहला कसे गेले? बावरी हा रहात असलेल्या भाग हा अर्धा अस्सक आणि अर्धा अलका यांच्यामध्ये येत होता. मार्ग अलका- पत्तीठाणा(पैठण)-महिस्सती (महेश्वर), उज्जैनी, गोनाध्व्या, विदिशा, वनसाव्य्ह, कोसंबी, साकेत, सावस्ती असा उल्लेख केला आहे.
बरोबर गेलेल्या शिष्यांची नावे धोटक, उपाशिव, नंद, हर्मिक, तोडेय्या, काप्पा, जातुकण्णी, भद्रवूध, उदय, पैशाल, मोगराज, अजित, तिस्ससामेत्तेया, पुण्णका, मेत्तगु आणि पिंगीया ही होय.
श्रावस्तीला पोचल्यावर त्यांना कळले की बुद्ध राजगृहला गेले आहे म्हणून मग ते राजगृहला गेले तो मार्गही दिलेला आहे सेतय्या, कपिलवस्तू, कुशिनार, पावा, भोगनगर आणि वैशाली असा प्रवास करत ते राजगृहला पोहोचले. तिथे बुध्दाला भेटून अजित याने बावरीने विचारलेल्या प्रश्न विचारले. बुध्दाने उत्तरे दिली मग प्रत्येकाने आपली प्रश्न विचारले. पंधराजण अरहंत झाले आणि पिंगीया परत फिरला सगळा वृत्तांत बावरीला देण्यासाठी. काहींच्या मते बावरी परत श्रावस्तीला येऊन बुध्दांबरोबर चर्चा केली तर काहींच्या मते तो १२० वर्षांचा असल्याने बुध्दांनी दर्शन दिले. बावरी राजगृहजवळ असलेल्या इंद्रलेणीत राहिला होता असे म्हटले जाते. तिथेच चर्चा झाली होती.
बुध्द आणि बावरी यांच्या भेटीबद्दल संदिग्धता असली तरी सोळा शिष्य दक्षिणेकडे परत येतांना त्यांनी सोळाशे की सोळा हजार? अरहंत बनवले. या चर्चेत काही अतिशयोक्ती आणि मिथक असली तरी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे बुध्दाच्या काळातच महाराष्ट्रात बौध्द विचारांचा प्रभाव जाणवायला लागला होता. या विचारांना धर्माचे स्वरूप प्राप्त व्हायला थोडा अवधी लागला असणारच.
महावंस या ग्रंथात सम्राट अशोक याने धर्मप्रसारक अधिकारी त्याच्या राज्यात चहुकडे पाठवले तिसरी संघ परिषद झाल्यानंतर असा उल्लेख आहे त्यात महादेव हा महिष्मतीमंडल, योन धर्मरक्षीत हा अपरांत आणि पश्र्चिम माळवा, रक्षित हा वनवासी, महाधर्मरक्षित हा महारठ्ठ म्हणजे महाराष्ट्र येथे पाठविण्यात आले. सम्राट अशोक याचा काळ इ.स.पूर्व २३२-२६८ हा आहे. अशोक विदिशा येथे असतांना देवी नामक व्यापारी माणसाच्या मुलीशी लग्न होते. तिथे बौध्द धर्म प्रस्थापित झालेला दिसून येतो. मौर्य साम्राज्य ज्या नंद साम्राज्याचा भाग झाले तिथले अधिकारी बरेच बौध्द झालेले दिसून येतात. म्हणजे अशोकाच्या पुर्वीच माळव्यातून बौध्द धर्माचा प्रभाव दक्षिणेकडे व्हायला सुरुवात झालेली असू शकेल.
दक्षिणेकडे नागार्जुन कोंडा मध्येही महायान संप्रदायाचा सुरवात दिसते. प्रसिद्ध बुद्ध तज्ञ नागार्जुन हा नागार्जुन कोंडा येथील होता. नागार्जुन जो बुध्द विचारांचा वाहक म्हणून ओळखला जातो तो गौतमीपुत्र सातकर्णी याचा मित्र होता. नागार्जुन कोंडा येथील स्तूप व विहार आहेत.
बावरी नंतर महाराष्ट्रात महत्वाच्या उल्लेख येतो तो म्हणजे सोपारा येथील स्तूप होय. नालासोपारा हे प्राचीन काळातील महत्वाचे बंदर होते जिथून परदेशी समुद्र मार्गे व्यापार चालत असे. सुपारक किंवा शुपारक असा उल्लेख येतो. बुध्द काळातच पुर्ण नावाचा व्यापारी होता. पुर्ण मैत्रायणी पुत्र असे नाव आहे. हा सुनापरांत येथील जे आजचे सोपारा आहे श्रीमंत आणि सफल व्यापारी होता.श्रावस्ती येथे बुद्धांची भेट झाली आणि प्रभावित होऊन सोपारा येथे येण्याचे आमंत्रण दिले. सोपारा येथे परत आल्यावर आठ बुद्ध विहार बांधले ज्यांची दरवाजे हे चंदनाच्या लाकडाची होती. या विहारांच्या उद्घाटनप्रसंगी बुध्दांस बोलवले ते पाचशे भिक्षूंसह आले होते आणि आठवडाभर राहिले. या प्रसंगी पुर्ण याने बुध्दांकडे भिक्षापात्र मागितले जे १८८२ मध्ये सोपारा येथील उत्खननात पंडीत भगवानदास इंद्रजी यांना ते भिक्षापात्र सापडले.
नंतरच्या काळात सम्राट अशोक यांनी येथे स्तूप बांधला. संघमित्रा आणि पुत्र महेंद्र दक्षिणेकडे जातांना येथे थांबले होते. अशोकाच्या चौदा शिलालेखात नऊ नंबरचा लेख येथे सापडला आहे.
डॉ. सुरज पंडीत (2017) यांच्या लेखात ते पुर्ण यांची कथा दिव्यावदान यात येते आणि बुद्ध सोपारा येथे येऊन गेले याचा उल्लेख केला आहे. यात सोपारा नगराचे वर्णन येते पुर्ण हा धनाढ्य व्यापारी व क्षूद्र दासीचा पुत्र होता.आधीच्या जन्मात आपल्या हक्कासाठी लढत होता पण अयशस्वी ठरला. बुध्दांना श्रावस्ती येथे भेटल्यावर बुद्ध विचारांचा सोपारा भागात प्रचार करण्यासाठी बुध्दांची परवानगी मागितली. दिव्यावदानात संपूर्ण जीवन आणि सोपारा भागात बुद्ध धर्म कसा प्रसार केला याची कथा येते.सोपारा फक्त व्यापारी बंदरच नाही तर तिर्थक्षेत्र म्हणून विकसीत करतो. यात इतर अनेक बुद्ध भिक्षुंची कथा येतात ज्यांनी बौध्द धर्म प्रसाराला मदत केली. तिसऱ्या धर्म परिषदेनंतर जी पाटलीपुत्र येथे झाली होती. धर्मरक्षित हे नाव येते. नावासमोर यवन शब्दावरून कळते की ते भारतीय नव्हते.
अजिंठा लेणी नंबर दोन मध्ये चित्रात पुर्णावदानाचे चित्र आहे. पुर्णा किंवा पन्ना बरोबर अजून दोन व्यापारी होते एक इशिदिना हा सुसुपारका येथील सेठ्ठी आणि वध्धा हा गहपतिका म्हणजे गृहपती गृहस्थ भरूच येथील होते तो आणि त्याची आई दोघांनी बुद्ध धर्म अंगिकारला. तसेच पुर्णा किंवा पन्ना याने पाचशे विहार बांधले. (B.G.Gokhale, 1972) दिव्यावदानात अजून एक भरूकच्छ म्हणजे भरूच कसे तयार झाले याची कथा आहे भिरूआ या थेरीचा संदर्भ दिला आहे.
महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार सर्वप्रथम पुण्णस्थवीर यांनी केला आहे. तसा उल्लेख बौद्ध साहित्यातील पाली त्रिपीटक ग्रंथातील ‘सुत्तपीटक’ या ग्रंथात ‘पुण्ण सुत्त’ यात आढळतो. या पुण्णसुत्तात महाराष्ट्राचे बुद्धकाळातील नाव ‘सुनापरांत’ असे आहे. पुण्ण भिक्खू हे तथागत बुद्धांना विनंती करतात की, मला माझ्या देशात जाऊन धम्माचा प्रसार करावयाचा आहे. मला परवानगी द्यावी. बुद्ध त्यांना परवानगी देतात. पुण्ण भिक्खू महाराष्ट्रातील ‘नालासोपारा’ पूर्वीचे सुप्पारक येथून संपूर्ण महाराष्ट्रभर बुद्ध विचारांचा प्रसार करतात. आजही नालासोपारा येथे पूज्य भिक्खुंच्या स्मरणार्थ निर्माण केलेला स्तूप अस्तित्वात आहे.
भोन हे शेगाव पासून तीस किलोमीटर अंतरावर आहे.बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आहे.पुर्णा नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे.तिथे विटांचा स्तूपाचे अवशेष मिळाले आहे.काही इतरही वस्तू ज्या सातवाहन पुर्व काळातील असाव्या सापडलेल्या आहे.
मूळ पाली त्रिपीटकात बुद्धकाळातील महाराष्ट्राची नाळ जोडणारा पतिठ्ठाण म्हणजे आजचे पैठण येथील गोदावरीच्या तीराजवळील बावरी ब्राह्मण यांचा संदर्भ आढळतो. बावरी ब्राह्मण यांना वार्ता समजते की, बुद्ध जन्माला आले आहेत. बावरी ३२ शुभलक्षणे व ८४ उपलक्षणांचे जाणकार असतात. ते त्यांच्या सात शिष्यांना बुद्धामध्ये ३२ शुभ लक्षण आणि ८४ उपलक्षणे आहेत का? हे जाणण्यासाठी बिहारच्या श्रावस्ती नगरीला पाठवतात. त्यांचे सातही शिष्य बुद्धांची सुमधुर धम्मवाणी श्रवण करून तिथेच बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन बौद्ध भिक्खू होतात ते काही परत येत नाहीत, यामुळे स्वत: बावरी श्रावस्तीला जातात. बुद्धांचे ३२ शुभ लक्षणे आणि ८४ उपलक्षणे ओळखतात. या शुभ लक्षणांनी व उपलक्षणांनी परिपूर्ण महापुरूषच बुद्ध आहेत. त्यांना पटते की जगात बुद्धांचा जन्म झाला आहे. ते बुद्ध वाणी श्रवण करतात आणि तथागत भगवान बुद्धांकडून प्रवज्जा ग्रहण करतात.
तिसरा संदर्भ येतो सुप्रसिद्ध व अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या तिसऱ्या धम्म संगतीमध्ये की, ज्यामुळे बौद्ध धर्म जगामध्ये प्रसार होण्यास मदत झाली होती व बौद्ध धर्म भारताचा राष्ट्रधर्म झाला होता. सम्राट अशोकने तिसऱ्या धम्म संगतीचे आयोजन केले होते. यामधील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, दहा देशामध्ये अर्हंत भिक्खुंना धम्मप्रचारार्थ पाठविले होते. महाराष्ट्रात महादेवस्थवीर व धम्मरक्षीत स्थवीर यांना पाठविले हेते. ८४ हजार धर्मस्कंदाला अनुसरून ८४ हजार स्तूप, चैत्य, विहार व लेण्यांची निर्मिती सम्राट अशोकने केली. जवळपास २ हजार लेण्या महाराष्ट्रात आहेत.
बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार बौद्ध भिक्खु संघाद्वारे केला जात असे आणि आजही केला जात आहे. वर्षावासाच्या काळात आणि अन्य काळात भिक्खुंच्या निवासासाठी अध्ययन व अध्यापनासाठी तसेच धम्मोपदेशासाठी पूर्वी पर्वतांच्या कडेकपारीचा उपयोग करीत होते. परंतु, जसजशी भिक्खु आणि उपासक यांची संख्या वाढली तसतशी ही निसर्गनिर्मित स्थाने कमी पडू लागली तेव्हा त्या कडेकपारी पोखरून त्यांचा विस्तार करण्यात आला. नंतर त्याचाच विकास करून सर्व सुखसोईंनी युक्त अशा लेण्यांमध्येच विहार, चैत्य, स्तूप, श्रृंगार, जातककथांची चित्रमालिका, बुद्ध जन्म व तत्त्वज्ञानाशी संबंधित चित्र, शिल्पपट कोरण्यात आले. चिनी प्रवाशांच्या वर्णनावरून भारतामध्ये पाच हजार लेण्या असल्याची माहिती मिळते.
औरंगाबाद जिल्ह्यातील पितळखोरा लेणी ही पैठणच्या एका उपासिकेने दान दिल्याचा शिलालेख ब्राह्मी भाषेत आहे. औरंगाबाद लेणीचा दान शिलालेख काण्हेरी लेणीत कोरून ठेवला आहे. महाराष्ट्रामध्ये नालासोपारा स्तूप, एलीफंटा लेणी, काण्हेरी-लेणी, पुण्याजवळील कार्लेभाजे व जुन्नर लेणी, नाशिकच्या त्रिरश्मी लेणी, इगतपुरीच्या लेणी, वेरूळ लेणी, औरंगाबाद लेणी, अजिंठा लेणी, घटोत्कच लेणी, पूर्वीच्या भोगवर्धन व आत्ताच्या भोकरदन येथील लेणी असा अनेक लेणी समूह पूर्वीच्या रेशीम राजमार्गावर (सिल्क रूटवर) कोरून ठेवण्यात आलेला आहे.
ह्युएनत्संग व फाहियान या चिनी बौद्ध भिक्खू महाराष्ट्रात येऊन गेलेले आहेत. त्यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात येथे बौद्ध धम्माच्या तत्कालीन स्थितीचे विस्ताराने वर्णन केले आहे. अनेक स्तूप, विहार, लेण्या, संघाराम यांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. पैठणला बुद्धांचे खूप विशाल स्तूप त्यांनी पाहिले होते. बौद्ध धम्माच्या पाऊलखुणा आजही लेणी, स्तूप, विहार, चैत्य, संघाराम याद्वारे दिसून येत आहेत. हजारो वर्षांपूर्वीच्या बुद्धांच्या पदकमलाचे दर्शन या पाऊलखुणांच्या माध्यमातून आपल्याला होत आहे. या पाऊलखुणा आणखी हजारो वर्षे टिकून राहतील या दृष्टीने त्यांचे संवर्धन करणे महत्त्वाचे ठरेल.
उज्जैन येथे जाण्यासाठी आधी बघितले आहे की दोन मार्ग प्रकाशे मार्गे तसेच बहाळ मार्गे बऱ्हाणपूर आणि मग महेश्वर अशी वहीवाट होती. तिथल्या उत्खननावरून तसे पुरावे मिळाले आहेत.
अशोक याने पाठवलेल्या प्रसारकांत योन धर्मरक्षित हा अपरांत मध्ये कारण स्पष्ट आहे तिथल्या बंदरांमधून परदेशी व्यापारी यायचे व संवाद साधला जाईल तर महाधर्मरक्षित यांना महाराष्ट्रात पाठवले होते.
अशोक पुर्व काळातील बुद्ध धर्मांचे पुरावे जसे साहित्यात मिळाले आहेत तसेच नागपूर जवळ पौनी येथील उत्खननात विटांनी बांधलेल्या स्तूप, विहार, लेख मिळाले आहेत. सोपारा येथील स्तूप, पौनी येथील स्तूप आणि अजिंठा येथील उत्खननात सापडलेल्या विटांचा स्तूप, ही काही पुरावे म्हणता येतील.(Wikipedia )
No comments:
Post a Comment