विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 20 August 2021

थोर क्रांतिकारक !

 

थोर क्रांतिकारक !

वासुदेव बळवंत फडके यांची १७ फेब्रुवारी पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

      १८५७ च्या पहिल्या  स्वातंत्र्यसमरानंतर भारतीयां' ध्ये एक प्रकारचे नैराश्य निर्माण  झाले  होते, ब्रिटिशांविरोधात शस्त्राला शस्त्रानेच उत्तर  देणे शहाणपणाचे नाही ; असे विचार  नवाशिक्षितांचे होते. अशा मरगळलेल्या काळात ब्रिटिशांविरोधात सशस्त्र  क्रांतीचे रणशिंग आद्यकांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी फुंकले.  जाज्वल्य देशभक्तीचे स्फुल्लिंग प्रज्वलित करणारे वासुदेव फडकेंचा जन्म  महाराष्ट्रातील  अमरावती जिल्ह्यात  शिरढोण  या गावी ४ नोव्हेंबर  १८४५  मध्ये झाला. रेल्वे  खात्यात नोकरीला असल्यामुळे  त्यांचा ब्रिटिश  नोकरशाहीशी जवळून संबंध  आला होता. ब्रिटिश  अधिकारी उर्मट व अपमानास्पद वागणुकीमुळे फडकेंनी नोकरीचे त्यागपत्र दिले.  सर्वप्रथम  प्रचार , सभामार्फंत लोक जागृतीचे कार्य  त्यांनी सुरु केले.परंतु त्यांना अपेक्षित  असा प्रतिसाद मिळाला नाही .  या मार्गाने यश मिळत नाही असे दिसताच. फडकेंनी पश्चिम  महाराष्ट्राचा दौरा करुन , तेथील रामोशांना संघटित करण्याचे कार्य  केले. ब्रिटिश  सामाज्यांबरोबर टक्कर  देण्यासाठी  शस्त्र  आवश्यक  होती. आणि  त्यासाठी  पैसा हवा होता. म्हणून  फडकेंनी प्रसंगी  रामोशांच्या मदतीने धनिकांवर दरोडे टाकले. मात्र  ते दरोडे पोटासाठी  नसून देशासाठी होते. हे विसरता  कामा नये. तारायंत्रे उदध्वस्त करणे . तुरुंगावर हल्ले  करुन कैद्यांना  मुक्त करणे. त्यांना आपल्या कार्यात सामिल करुन घेणे. दळणवळण  यंत्रणा निकामी बनवणे. ब्रिटिश  सरकारच्या मार्गात अडथळे निर्माण  करणे  हा यामागील हेतू होता. ब्रिटिशांच्या  मनात फडकेंबाबत दहशत निर्माण  झाली. फडकेंना पकडण्यासाठी  बक्षीस लावले गेले. त्याला प्रत्युत्तर म्हणून  फडकेंनी ही मुंबईचे गव्हर्नर  रिचर्ड टेंपल यांचे शीर कापून आणणाऱ्यास  अधिक  मोठे बक्षीस  जाहीर केले. अनेक  दिवस प्रयत्न  करुनही सरकारला फडके सापडले नाही. शेवटी २७ जुलै  १८७९ रोजी डॉनियल नावाच्या ब्रिटिश  अधिकाऱ्यांने त्यांना पकडण्यात यश मिळवले . त्यावेळी ते आजारी  असल्याने   कर्नाटकातील  गाणगापुरच्या मंदिरात असाहाय्य अवस्थेत  होते. पुण्याच्या न्यायालयात त्यांच्यांवर खटला भरण्यात आला.  त्यावेळी फार मोठा जनसमुदाय तेथे उपस्थित  होता.  जनतेने स्वयंस्फूर्तीने फडकेंच्या सुटकेसाठी पैसा गोळा केला.फडकेंना फाशीची शिक्षा  व्हावी असे ब्रिटिशांना वाटत होते. माञ न्यायमूर्ती  महादेव गोंविद रानडे यांनी   गणेश वासुदेव जोशी म्हणजे  सार्वजनिक  काका यांना त्यांचीबाजू मांडण्यास सांगितले  . त्यामुळे त्यांना फाशी न होता. जन्मठेपेची शिक्षा  ठोठावण्यात आली. फडकेंना भारतापासून दुर एडनच्या तुरुंगात  ठेवले. त्याठिकाणी  त्यांचे अतोनात  हाल करण्यात आल्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि  १७ फेब्रुवारी  १८८३ मध्ये या महान देशभक्तीची प्राणज्योत मालवली. फडकेंच्या या बलिदानामुळे फक्त  महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण  भारतात पुन्हा क्रांतिकारी  चळवळी सक्रिय झाल्या. 

- प्रशांत  कुलकर्णी  मनमाड  .


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...