मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुध्दातील....सरसेनापती धनाजी जाधव-
२६ जुलै धनाजी जाधव यांचा स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन !💐💐💐
सरसेनापती धनाजी जाधव
हे मराठा साम्राज्याचे इसवी सन १६९७ ते १७०८ या काळात सरसेनापती होते.
मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामात धनाजी जाधव हे अतिशय पराक्रमी सेनापती होते. रायगड मुघलांच्या ताब्यात गेल्यानंतर पन्हाळा हेच मराठ्यांचे महाराष्ट्रातील मुख्य केंद्र बनले. मुघलांनी पन्हाळ्याच्या किल्ल्याला वेढा दिला. त्यावेळी धनाजी जाधव यांनी पन्हाळ्यावर कुमक पाठविण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. अखेर कंटाळून मुघलांना पन्हाळ्याचा वेढा काढून घ्यावा लागला. झुल्फिकारखानाने कर्नाटकातील वेलोरला वेढा दिला. [ वेलोर त्याकाळात कर्नाटकात होते. आता तामिळनाडूत आहे. ] त्यावेळी धनाजी जाधव त्या दिशेने येत आहे. हे समजल्यावर झुल्फिकारखानाने आपला वेढा उठवला. हा धाक धनाजी जाधवांबाबत होता. मराठ्यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यानंतर धनाजींनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली.
धनाजी जाधवराव , संताजी घोरपडे हे दोघे सेनापती विलक्षण पराक्रमी होते. गनिमी काव्यात धनाजी जाधव हे चांगलेच पारंगत होते. औरंगजेबाच्या लाखौ सेन्याशी लढताना कधी कच न खाता अहोरात्र लढाणारा हा वीर होता . राजाराम महाराजांच्या काळात धनाजी जाधवराव यांनी फलटण च्या मैदानात बादशहाच्या फौजेशी ह लढाई देवून शास्तेखान व रणमस्तखान यांचा पाडाव केला या पराक्रमावर खुश होवून छत्रपती राजाराम महाराजांनी धनाजी जाधवराव यांचा सन्मान केला. त्याची एक नोंद मिळते ती अशी
" .......वर्तमान छत्रपतीस कळलेवर जाधवराव यांस भेटून बहुमान वस्रे ,भूषणे देवून 'जयसिंगराव' हा किताब दिल्हा " इ.स १७०६ मध्ये सरसेनापती धनाजी जाधवराव आपल्या १५००० खड्या फौजेस घेऊन गुजरातेत गेले होते व त्यांनि बादशहाच्या हंगामी सुभेदारास (अब्दुल हमीद) कैद करून मोगली सैन्याची दाणादाण उडवुन प्रंचड लुट घेऊन ते स्वराज्यात परत आले होते .
मोगलांपासून सुटका झाल्यावर शाहूराजे सैन्य गोळा करीत खानदेश मार्गे सातार्यास पोहचले. राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाईने शाहूराजांचा गादीवरील हक्क अमान्य केला; तथापि शाहू महाराजांनी स्वत:स सातार्यास राज्याभिषेक करविला (१२ जानेवारी १७०८) .शाहू महाराज हेच खरे वारस आहेत म्हणून श्रीवर्धन निवासी बाळाजी विश्वनाथाबरोबरच धनाजी जाधवराव यांनी शाहू महाराजांचा पक्ष स्वीकारला होता. त्यामुळे शाहू महाराजांच्या सातारा गादीचे महत्त्व वाढले. अशा या महान सरसेनापतीचा मृत्यू २६ जुलै १७०८ मध्ये झाला.
--- प्रशांत कुलकर्णी मनमाड
संदर्भ
- मराठ्याचा इतिहास खंड -१
No comments:
Post a Comment