संभाजी कावजी कोंढाळकर...
संभाजी कावजी हा जेध्यांचा हशम ज्याला नंतर महाराजांनी जेधे कडून मागून घेतले आणि हजारी मनसबदार केले असा उलेख जेधे शकावली मध्ये मिळतो.
अफझलखानचे मुंडके कोणी उडविले, या बद्दल थोडा गोंधळच आहे. वेगवेगळ्या बखरीत किंवा शाकाव्लीत दिलेले उलेख बघुया.
सभासद लिहितो कि वाघनखे आणि कट्यारीचा उपयोग करून खानाला घायाळ केले आणि खानाचे मुंडके संभाजी कावजी ने उडविले.
शिव-दिग्विजय मध्ये वाघनखे आणि तलवार अश्या हत्यारांचा उलेख आहे पण खानाचे मुंडके कापणारा मात्र येसाजी कंक असा उलेख आहे.
चिटणीस भखरीत येसाजी कंक आणि तानाजी मालुसरे यांनी खानाचे मुंडके उडविल्याचा उलेख आहे.
९१ कलमी आणि तारीख-इ-शिवाजी मध्ये मात्र शिवाजी महाराजांनीच खानाचे मुंडके उडविल्याचा उलेख आहे.
संभाजी कावजी नंतर शास्ताखानाला मिळाल्याचा उलेख सुद्धा आहे आणि काहींच्या मते संभाजी कावजीला प्रतापराव गुजरांनी मारिले.
संभाजी कावजी भाग -१
प्रतापगड चे युद्ध हे शिवाजी राजांच्या जीवनातला पहिले मोठा युद्ध . पहिला मोठा विजय नव्हे तो तर दिग्विजय एवेध्या मोठ्या सेनापतीला मारणे आणि त्याच्या सैन्याची लांडगेतोड करणे हे तर खरा कौशल्याचे काम . पण माझ्या मते इतिहास करांनी याच्या युद्ध्या विषयक बाजू तेवढ्या तपासल्या नाहीत . ह्या सगळ्या प्रकरणाचा फार बारकाई ने अभ्यास करण्याची गरज आहे. त्या statergy चा अभ्यास करैइला
हवा .
प्रताप गड च्या युद्धाकर्ता खालील साधने वापरावी लागतात
१== > शिव भारत , सभासद बखर ,जेधे शकावली आणि जेधे करीना हि सर्व विश्वसनीय साधने आहेत .
२==> आणि चिटणीस , शिवदिग्विजय , ९१ कलमी बखर हि काहीशी अविश्वसनीय साधने आहेत . ह्या साधनांचा वापर दुय्यम किवा तिय्यम साधने म्हणून करतात (कृपा करून विजय राव यांनी याची नोंद घ्यावी )
३==> तसेच इंग्लिश, डच कागद पत्र पण आहेत पण ती विश्वसनीय नाहीत . ती तिय्यम साधने आहेत .
संभाजी कावजी भाग - २
आता विषय प्रताप गडच्या युद्धाचा -
शिवाजी राजांनी अफझलखानाला मारले हे सगळ्यांनाच माहित आहे . पण त्याचे १००% खरा वर्णन मिळणे मुश्कील आहे. पण त्या मध्ये सगळ्यात विश्वसनीय
१ >शिवभारत - शिवभारत सांगते कि शिवाजी राजांनी अफझल खानाला मारले . आणि कावूक (संभाजी कावजी ), जीवा महाला ऐतर लोकांनी अफझलखानाच्या लोकांवर हल्ला चढवला (आध्याय २१ , श्लोक ७०-८० ).
२> जेधे शकावली - शिवाजी राजांनी अफझल खानाला मारले . आणि संभाजी कावजी , जीवा महाला ऐतर लोकांनी अफझलखानाच्या लोकांवर हल्ला चढवला .(पृष्ठ -३३ )
३ > सभासद बखर -
शिवाजी राजांनी अफझल खानाला घ्यायाल केले आणि मग संभाजी कावजी महालदार याने भोयांच्या पाय कापले आणि खानाचे डोके कापले . (पृष्ठ - २२ )
४>जेधे करीना - शिवाजी राजांनी अफझल खानाला घ्यायाल केले आणि मग जीव महाला आणि सर्जाराव आणि ऐतर लोक येऊन पाय कापले आणि अफझल खानाचे डोके कापले .
पण या सगळ्या प्रथम दर्जाच्या पुराव्या मध्ये एक वाक्यात्या नाही . त्या मुले काही सांगणे शक्य नाही आहे .
संभाजी कावजी भाग - ३
संभाजी कावजी हा शिवाजी राजांचा अंगरक्षक आणि भालदार होता . हनमंत राव मोरे कडे राजांनी त्याला पाठवला आणि संभाजी नि हनमंत राव ला मारला (सन १५५६ ). पुढे अफझलखानाच्या वेळेस तो अंगरक्षक होता .त्याचा उल्लेख वर आलाच आहे .संभाजी चा मित्र बाबाजी राम शायीस्तेखानाला मिल्यावर(साधारण १६६०-61) शिवाजी राजांनी त्याला बोल लावले ,म्हणून तो चिडून शायीश्तेखानास मिळाला त्याचे शौर्य पाहून खानांनी त्याला सालाबत खान दखनी याकडे ५०० स्वरान सहा ठेवले . पुढे शिवाजी राजांनी प्रताप राव गुजर यांना पाठून १६६१ मध्ये संभाजी कावजी ला मारले .
इतिहासिक पुरावा
संभाजी कावजी हा शिवाजी राजांचा अंगरक्षक आणि भालदार होता . हनमंत राव मोरे कडे राजांनी त्याला पाठवला आणि संभाजी नि हनमंत राव ला मारला (सन १५५६ ). पुढे अफझलखानाच्या वेळेस तो अंगरक्षक होता .त्याचा उल्लेख वर आलाच आहे .संभाजी चा मित्र बाबाजी राम शायीस्तेखानाला मिल्यावर(साधारण १६६०-61) शिवाजी राजांनी त्याला बोल लावले ,म्हणून तो चिडून शायीश्तेखानास मिळाला त्याचे शौर्य पाहून खानांनी त्याला सालाबत खान दखनी याकडे ५०० स्वरान सहा ठेवले . पुढे शिवाजी राजांनी प्रताप राव गुजर यांना पाठून १६६१ मध्ये संभाजी कावजी ला मारले .
संधर्भ :-
<p>१> ९१ कलमी बखर , कलम ४३ , पृष्ठ ३१-३२ .</p>२> सभासद बखर , र .वि . हेर्वाद्कर . टीप पृष्ठ ९ .
No comments:
Post a Comment