विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 August 2021

कान्होजीराजे जेधे

 


कान्होजीराजे जेधे

एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशीपञ ठेवलेली जी माणसे महारांजाच्या भोवती होती त्यात प्रामुख्याने आणि अगदिच सुरूवातीपासून जे होते त्यांपैकी विषेष उल्लेख हा सरदार कान्होजीराजे जेधे यांचा करावा लागतो... सरदार कान्होजी जेधे हे इतर सरदारच्या वतनवाडी पेक्षा ते स्वामिनीष्ट कार्यतर जीवन जगले. अशा महापुरषावर महाकाव्यच होवे !
कान्होजी जेधे यांचा जन्म कारीगावी झाला. त्यांच्या जन्म्यापुर्वी त्यांच्या वडिलांची हत्या नंतर मात्रोश्रीची, अगदी काही दिवसाच्या लहान मुलांला पोरका होण्याचा महाशाप मिळाला. यावेळी कान्होजी जेध्याचा जीवावर भेटलेल्या प्रसंगात; जेध्याचे इमानी स्वामीनिष्ठ चाकरीत असलेले देवजी महाल्याच्या साह्याने तान्ह्या कान्होजीचे प्राण बचावले. रानावनांत फिरत तेंही कान्होजीचा सांभाळ केला. पुढे पासलकर देशमुखांनी त्यांची दिखभाल करून योग्य मुत्सद्दी, राजकारणी योद्धा, युद्धतंत्राचेही परिपूर्ण शिक्षण दिले. कान्होजी जेधे कारी गावी येऊन आपल्या मातापितरे बलिदानाचा सुढ मिळवून कारी-अंबवडे गावासह रोहिड खोऱ्याची देशमुखी चालवली...
संपूर्ण बारा मावळामध्ये कान्होजींनी आपल्या पराक्रमाने व सचोटीच्या वर्तनाने आपला दरारा बसविला होता. कितीही अवघड किल्ला असला तरी कान्होजीचे किल्ले सर करण्याचे खास तंत्र होते. ते म्हणजे शिडया व माळा लाऊन सैनिक गडावर चढविणे व गड सर करणे. तसेच मलिक अंबर या निजामशहाच्या वजीराशी त्यांचा संबंध आला होतो. त्यांच्या समवेत कान्होजीने अनेक लढायात आपली मर्दुमकी दाखून निजामशाही पासून कान्होजी नांवारुपास आले होते... सन इ.इ. १६१९ रोजी काही ऐतिहासिक निजामशहाच्या कागदपत्रा मध्ये ‘कान्होजी राजे जेधे’ असा उल्लेख दिसून येतो.
आदिलशाहचा सेनापती रणदुल्लाखाननी शहाजीराजांना कान्होजीचा परिचय करून दिला होतो. ही घटना साधारण इ.स. १६३५ च्या दरम्यानची आहे. नंतर इ.स. १६३६ च्या सुमारास अहमदनगरची निजामशाही नष्ट झाली त्यानंतर शहाजीराजे पूर्णपणे आदिलशाहीकडे चाकरीस राहिले, तेव्हा रणदुल्लाखानाकडून शहाजीराजांनी कान्होजीस आपणांकडे मागून घेतले. सन १६४८ साली शहाजीराजांसोबत कान्होजीना देखील नजर कैदेत जिंजीत राहिले...
कान्होजी जेधे हे शहाजीराजांचे समकालीन असल्यामुळे विश्वासू मित्र बनले होते. “कान्होजी ! तुम्ही आता माझ्या शिवबाची चाकरी करावी. स्वराज्याला तुमची गरज आहे. आपण शूर लढवय्ये आहात. अनुभवी आहत. बाजी पासालकारांच्या निधनाने बारा मावळ खोऱ्यात आता तुम्हीच वडीलधारे आपल्या मायेचे छत्र शिवबावर धरा.” असे म्हणत, शहाजीराजांनी कान्होजी जेधे यांना शेवटचा निरोप घेताना अश्रुपूर्ण नयनांनी मिठी मारली. शहाजीराजांचे बोल ऐकून कान्होजी जेधे शिवाजीराजांचेकडे येवून त्यांना म्हणाले, “महाराजांनी
(शहाजी) शपथ घेऊन साहेबाचे सेवेशी पाठविले तो इमान आपला खरा आहे. खास व पाचजण लेक व आपला जमाव देखील साहेबापुढे खस्त होऊ” असे म्हणून स्वराज्याच्या कार्यात सामील झाले.
शिवाजी महारांजानी इ.स. १६५५ ते ५६ च्या दरम्यान जावळीचा मोर्यांना शासन करून जावळीचा सर्व मुलुख स्वराज्यात दाखल केला. कान्होजी जेधे व त्याचे समर्थक बांदल, शिळीमकर, मारणे वगैरे देशमुखानी या कामी छत्रपतींना सहाय्य केले. शिवाजीराजांनी रायगड या किल्याच कब्जा कान्होजी जेधे यांच्यामार्फत घेतला. जरी कान्होजी जेधे असे स्वराज्याच्या कामी छत्रपती शिवाजी महाराजांना सहाय्य करीत होते. तरीही ते आदिलशाहीच्या सेवेत होते. वतनवाडीचे देखील आदिलशहाने त्यांना अधिकार बहाल केलेले होते. वतनवाडीची कोणतीही लालसा ना ठेवता कान्होजी स्वराज्याच्या कार्यात मोठे सहाय्य इमानी करत होते..

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...