मुंबईचे आद्यशिल्पकार.....दानवीर व समाजसुधारक....
नानाशंकर शेट !
१ जुलै जगन्नाथ शंकरशेट अर्थात नानाशंकर शेट यांची पुण्यतिथीनिमित्त लेख.......
सातबेटांचे "मुंबई " शहर अगदी कमी कालावधीत देशाची प्रमुख आर्थिक राजधानी बनली. जगातील प्रमुख शहरांमध्ये मुंबईचा अव्वल नंबर लागतो. या मुंबईच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांचा अग्रकम लागतो. नाना शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ मध्ये झाला. नानाची घरची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने त्यांचे बालपण समृद्धीत गेले. नानांनी त्यांच्या वडीलांप्रमाणे व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली. अनेक अरब, अफगाणी तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बॅंकांकडे न देता शंकरशेट यांच्या हवाली करीत. नाना बालपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते.
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील मुंबई इलाख्याच्या सार्वजनिक जीवनात त्यांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले या कार्यात त्यांना अनेक सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आपल्या संपत्तीची खरी गरज ही सामान्य माणसाच्या उद्धारासाठी व्हावी या हेतूने त्यांनी लोकसेवेचे व्रत घेऊन सामाजिक सुधारणेच्या पायाभरणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.
१८२२ मध्ये मुंबईमध्ये शाळा पुस्तक मंडळाची स्थापना त्यांनी केली. त्यावेळी मुंबई ईलाख्यात गव्हर्नर एल्फिन्स्टन यांचा अंमल होता. नाना शंकरशेट यांनी जवळजवळ अर्धशतकाच्या कालावधीत मुंबईच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळीचा आणि अनेकविध अशा लोककल्याणकारी सुधारणांचा पाया घातला
नानांनी मातृभाषेतून शिक्षण दिले जावे याबाबत आपले आग्रही मत गव्हर्नर साहेबांसमोर मांडले. गव्हर्नर एल्फिन्स्टन यांची मुंबईतून बदली झाली. त्यावेळी त्यांच्यासाठीच्या निधीतून अनेक शैक्षणिक संस्थांची पायाभरणी झाली. या शैक्षणिक कार्यक्रम नानांचा मोठा वाटा होता. गव्हर्नर बेंटिग यांनी सतीची चाल बंद केली. त्यावेळी , सामाजिक क्षेत्रात प्रचंड कार्य नानांनी केले. १८५२ मध्ये बॉम्बे असोशिएशनच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांतून हिंदुस्थानची पहिली राजकीय चळवळ सुरु झाली. त्यांतून दादाभाई नौरोजी , न्यायमूर्ती रानडे सारखे अनेक राजकीय नेते तयार झाले. मुंबईचे आद्य शिल्पकार म्हणून नाना शंकरशेठ यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. ३१ जुलै १८६५ मध्ये नानाशंकर शेट यांचा मृत्यू झाला.
प्रशांत कुलकर्णी मनमाड (नाशिक )
No comments:
Post a Comment