दिल्लीवर पहिल्यांदा.....भगवा फडकवला!
२ आॕगस्ट १७६० रोजी सदाशिवभाऊ पेशव्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ६०० वर्षांनी प्रथमच दिल्लीवर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकवला ! आज त्यांचे स्मरण !
याआधि आपण याचा मागोवा पाहू या.....
दिल्लीवर राज्य करणारा शेवटचा हिंदू राजा पृथ्वीराज चव्हाण होय. इ.स.११९१ मध्ये तराईच्या पहिले युद्ध पृथ्वीराज चव्हाण व महमंद घोरी यांच्यात झाले. त्यांत पृथ्वीराज चव्हाणचा विजय झाला. मात्र वर्षभरात पुन्हा तयारीनिशी महंमद घोरीने पुन्हा आक्रमण केले. त्यांत पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झाला. त्यानंतर काही दिवसात महंमद घोरीने आपला सरदार कुतुबुद्दीन ऐबकला दिल्लीचा प्रमुख बनवले. इ.स. १२०६ ला दिल्लीवर मुस्लीम सत्ता निर्माण झाली. पुढे गुलाम , खिलजी , तुघलक , सय्यद हे राजघराणे दिल्लीवर होते. त्यानंतर काही काळ अफगाण सत्ता दिल्लीत होती. त्यानंतर १५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या युद्धात अफगाण सुलतान इब्राहिम लोदी व फरगाण्या प्रांताचा बाबर यांच्यात झाले. त्यांत बाबराचा विजय होऊन दिल्लीवर मुघलसत्ता निर्माण झाली. बाबरचा सहावा वंशज औरंगजेबाच्या काळात महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ मध्ये रायगडावर राज्याभिषेक करुन "मराठा वंशाची स्थापना केली. शिवरायानंतर छत्रपती शंभूमहाराज व राजाराम महाराज यांनी मुघलसत्तेशी निकराचे युध्द सुरु केले. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुध्दात मुघलांची सत्ता खिळखिळी केली.तरीही दिल्लीवर मुघल सत्ता होती. पुढे छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्रात आले. बाळाजी विश्वनाथ व अनेक मातब्बर मराठे सरदार शाहू महाराजांच्या पक्षात आले. दिल्लीला जाऊन पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी स्वराज्याच्या सनदा व चौथाई ,सरदेशमुखीचे आधिकार संपादन केले. या स्वराज्याच्या सनदा , चौथाई व सरदेशमुखीचा वापर मोठ्या खुबीने करुन श्रीमंत थोरले बाजीरावांनी मराठ्याचे साम्राज्याची सीमा दिल्लीपर्यत पसरवली. बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांचे थोरले पुत्र नानासाहेब पेशवे पदावर विराजमान झाल्यानंतर नर्मदानदी ओलांडून जाणे चौथाई - सरदेशमुखी वसूल करणे मराठ्यासाठी नित्यांची बाब झाली होती. मात्र त्यानंतर अफगाणिस्थानचा बादशहा अहमदशहा अब्दाली याने १७४८ मध्ये पहिली स्वारी केली. नंतर उत्तरभारतात येऊन लूट व कत्तली त्याने तीनवेळा केल्या. त्यामुळे मुघलबादशहाने १७५२ मध्ये मराठ्यांनी करार केला .त्या करारानूसार विशिष्ट रक्कम , पंजाबपर्यत चौथाई-सरदेशमुखीचा अधिकार मराठ्यांना देण्यात आला. त्या मोबदल्यात मराठ्यांनी मुघलांचे अब्दालीपासून रक्षण करण्याचे वचन दिले. त्यामुळे बाजीरावांचे कनिष्ठ पुत्र रघुनाथरावांनी अब्दालीने जे भारतातील प्रांत बळकावले होते. ते परत मिळवण्यासाठी उत्तरेत मोहिम काढली. आणि थेट अटकेपार भगवा झेंडा लावला. तेव्हापासून अटक ही मराठ्यांची सीमा झाली. अब्दालीचा मुलगा तैमूरशहाला मराठ्यांनी हुसकावून दिले. या बातम्यांनी अब्दाली संतापला. त्यात पानिपत युध्दाचा कळीचा नारद नजीबखानाने अब्दालीला निमंत्रण दिले. १० जानेवारी १७६० रोजी बराई घाटाजवळ अब्दालीचे सैन्य यमुना ओलांडत असताना दत्ताजी शिंदे त्यांच्याशी तुंबळ युद्ध झाले. त्यांत दत्ताजी शिंदेचा मृत्यू झाला. ही बातमी पुण्याला येऊन धडकली. त्यावेळी अब्दालीचे पारिपत्य करण्यासाठी कोणाला पाठवावे हा प्रश्न श्रीमंत नानासाहेबांसमोर होता. त्यावेळी नुकताच उदगीरची मोहिमेत मोठा विजय मिळवलेल्या सदाशिवभाऊचे सर्वत्र गाजत होते. सदाशिवभाऊ हे बाजीराव पेशव्यांचा भाऊ चिमाजी अप्पा यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म ४ आॕगस्ट १७३० मध्ये झाला. चिमाजी अप्पाचा मृत्यू झाला .तेव्हा सदाशिवभाऊ फक्त दहा वर्षाचे होते. पुढे त्यांनी युध्दशास्त्र व इतर शिक्षण घेतले. सदाशिवभाऊ आपल्या पित्यासारखे शूर होते. त्यावेळी मोठा तोफखाना , बंदुकांच्या जोरावर निजाम मराठ्यांना त्रस्त करत होता. त्यावेळी गनिमी काव्याच्या अदभुत कौशल्याने सदाशिवभाऊंनी निजामाचा बंदोबस्त केला. निजामाचा अजस्त्र तोफखाना मराठ्यांच्या ताब्यात आला. या पार्श्वभूमीवर अब्दालीचा बंदोबस्त करण्याची मोहिम सदाशिवभाऊ पेशव्यांकडे आले. त्याप्रमाणे १६ मार्च १७६० रोजी सदाशिवभाऊ प्रचंड फौज घेऊन उत्तरेकडे निघाले.१ आॕगस्ट १७६० मध्ये सदाशिवभाऊंनी दिल्ली सर केली. आणि ६०० वर्षापासून दिल्लीवरील मुस्लीमसत्ता विराजमान होती. ती नष्ट करण्याचे अनोखे कार्य सदाशिवराव पेशव्यांनी केले. २ आॕगस्ट १७६० रोजी दिल्लीवर मराठ्यांचा भगवा फडकला.तब्बल ६०० वर्षांनी दिल्लीवर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकवला.
--- प्रशांत कुलकर्णी मनमाड (नाशिक)
No comments:
Post a Comment