शिवकालीन इ.स. 1673 (शके 1595)
उंबराणीच्या लढाईबद्दल माहिती
पोस्तसांभार ::एकनाथ वाघ
उंबराणीच्या लढाई :
महादजी ठाकूर हा देखील सोमाजी मोहित्यांच्या सोबतीला लढत होता. विजापुरी सैन्याच्या वतीने भाईरखान नावाचा सेनापती आपल्या लढवय्या पठाण फौजेला घेऊन पुढे सरसावला. पठाणांचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध माजले. तिरंदाजांच्या कमानी स्थिरावल्या, समशेरी भिरभीरु लागल्या कित्येकांचे हात तुटले, कित्येकांचे पाय गेले, रक्ताचे पाठ वाहू लागले. कित्येंकांची शिरकमल भु-क्षेत्रावर रक्ताभिशेख घालत कोसळली. कित्येकांची रक्ताने आंघोळ झाली होती. युद्ध मग्न झालेल्या त्या दोन्हीही सैन्यांचे सुर्यास्ता पर्यंत युद्ध सुरू होते.
दिपाजी राऊत व कृष्णाजी भास्कर हे दोन्हीही रणधुरंदर हातात नंग्या समशेरी घेऊन घोड्यावर स्वार होत शत्रू सैन्याचा पाठलाग करु लागले. सापडेल त्याला आपल्या समशेरीचे पाणी पाजत यमसदनी पाठवत होते. मात्र क्षत्रिय धर्म सांडला न्हवता. कोणाच्याही पाठीवर वार झाला नाही. त्यांच्या या अतुलनिय पराक्रमाने रणांगण पटून उठले होते. मात्र याच बहलोलखानाचा सरदार सिद्धी महमद बर्क याने तिर-कमान रचली. सुटलेला तिर राऊतांच्या घोड्याचा वेध घेणारा निघाला. राऊतांचा घोडा रणांगणावर कामी आला. राऊतांनी रणभूमीचे भान राखत दुसऱ्या घोड्यावर ते अरुढ झाले. शत्रू सैन्याने या घोड्याच्या देखील कुशीत, पाठीवर व तोंडावर तलवारीने तीन वार केले. मात्र आता राऊतांचा क्रोध अनावर झाला. राऊतांची समशेर बर्कीचे रक्त प्राशन करण्यास तहानली होती. राऊतांनी घोडा बर्कीच्या जवळ घेतला व तलवारीने केलेल्या एका प्रहारातच बर्की संपविला.
कित्येक रणांगणावर समशेर गाजविणारा बाहलोल खानाचा आधारस्थंभ बर्की, रणांगणावर कोसळल्याची वार्ता रणभूमीवर वाऱ्यासारखी पसरली. शत्रू सैन्य धिर सोडून पळू लागले. बर्कीच्या मृत्युची वार्ता ऐकून बहलोल खान जाणून चुकला की, त्याचा काळ जवळ आला आहे. मृत्यूच्या भितीने बहलोल खान प्रतापरावांना शरण आला. प्रतापरावांनी त्याला माफी दिली. कृष्णाजी भास्कर यांनी शत्रूच्या सैन्याची लूट केली. कित्येक हत्ती, घोडे पाडाव झाले.
शरण आलेला बहलोलखान प्रतापरावांनी दाखविलेल्या मार्गाने मराठ्यांसमोर पराजीत होऊन मागे निघून गेला. (पर्णालपर्वतग्रहणाख्यान, अध्याय -५, ३८-१०५ सारांश)
No comments:
Post a Comment