विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 September 2021

शिवकालीन इ.स. 1673 (शके 1595) उंबराणीच्या लढाईबद्दल माहिती भाग २

 

शिवकालीन इ.स. 1673 (शके 1595)
उंबराणीच्या लढाईबद्दल माहिती
पोस्तसांभार ::एकनाथ वाघ

भाग २
उंबराणीच्या लढाई :
रातोरात सर्वजण शत्रूच्या जलाशया (तलाव) जवळ आले. नंतर योग्य संधी पाहून शत्रूच्या चहू बाजूंस पसरले. दुरून चहू दिशांस खूप सैन्य दिसू लागले. मग सर्वांनी जलाशयास वेढा घातला. सिद्धी हिलाल हे तेथे अघाडीवर होते. तेथून जवळपास एक कोसावर विठोजी शिंदे होते. कृष्णाजी भास्कर आणि विठ्ठल पिलदेव हे शत्रूच्या दोन्हीही बाजूला नजर रोखून होते. विसो बल्लाळ मात्र घिरट्या घालत होते. आत्ता पर्यंत आपण मराठ्यांच्या चक्रव्यूहात आडकल्याची शंका देखिल बेलोलखानाच्या फौजेस आलेली न्हवती.
रात्रीच्या वेळी हत्तींना पाणी पिण्यासाठी माहूत व इतर सैन्य जलाशया जवळ जावयास निघाले तेव्हा त्यांना कळून चुकले की आपण पुर्णपणे अडकले गेलो आहोत. याच वेळी धुळीचा लोट आसमंतात उधळीत प्रतापराव आपल्या हजार घोडेस्वारांनीशी शत्रूवर तुटून पडले. ह्या अकस्मात झालेल्या हल्याने बहलोल खानाचा सैन्य धांदळून गेले. मात्र काहीच वेळात बेहलोल खान व त्याचे सैन्य देखील युद्धास सज्ज झाले. तुंबळ युद्ध सुरु झाले. चार घटका युद्धाचा खणखणाट चालू राहिला.
मराठ्यांचा आवेश पाहून शत्रू सैन्य आता माघार घेऊ लागले. पराक्रमाची नशा चढलेल्या आनंदरावांनी काही विरांच्या मदतीने शत्रू वर परत हाल्ला चढविला. मात्र यात आनंदराव जखमी झाले परंतु मागे हाटले नाहीत. तब्बल तिन घटीकापर्यंत(अंदाजे एक ते दिड तास) आनंदरावांनी शत्रू सैन्याची धुळधाण उडाविली.
याच वेळी एक भला मोठा, उन्मत्त हत्ती पिसळला. त्या हत्तीने घट्ट बांधलेली साखळी स्वतः तोडून ती सोंडेत पकडली व रणांगणावर बेफान पणे सैरावैरा धावत सुटला. आपल्याच सैन्यात हत्तीने दाणादाण उडवून दिली. कित्येक जण जखमी तर काही मारले देखिल गेले. काही काळानंतर माहूतांनी बहूत प्रयत्नांनी हत्तीला वश केले. मात्र याच संधीचा फायदा घेत सिद्धी हिलाल याने आपले पाच पुत्र व सैन्याच्या मदतीने शत्रू वर पुन्हा हाल्ला चढविला. रुपाजी भोसले, सोमाजी मोहिते व सिदोजी निंबाळकर हे देखील शत्रू वर तुटून पडले. विठोजी शिंदे व विठ्ठल पिलदेव हे एका बाजूने मोठ्या सैन्यासोबत शत्रू सैन्यावर धावून गेले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...