विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 16 September 2021

रणभैरव मराठा

 


रणभैरव मराठा*_
_महाराष्ट्राचा इतिहास हा एवढा मोठा आहे की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे अथांग आहे !! ज्याची तुम्ही सिमा सांगू शकता....पण त्याची व्याप्ती नाही !!_
_महाराष्ट्राचा इतिहास हा मुळातच पराक्रम पुर्ण आहे !! वाकाटक, सातवाहन, देवगिरीचे यादव असो वा मालोजीराजेंच्या कुळातील आणि चित्तोडच्या स्वाभिमानी जोहर चे धग रक्तात घेऊन आपल्या हातावर आपले मस्तक घेऊन महाराष्ट्र पराक्रम गाथा रचणारे भोसले कुलत्पन्न !! मावळखोर्यातील देशपांडे, गुजर, जाधव, काकडे, मालुसरे, कंक आणि किती तरी अश्या पराक्रमी घराण्यांनी महाराष्ट्रगाथा शौर्यवंत केली... !! असेच एक आणखी घराणे होते जे खुद्द भोसल्यांच्या रक्ताशी जुळून होते ते म्हणजे "धोरपडे "_
_फर्जंद शहाजी राजे यांच्या सोबतीला आणि शिवछत्रपतींच्या स्वराज्याला ही घोरपडे अगदी इमानी राहिली...!! छत्रपती संभाजी महाराज यांच्या साठी आपल्या छातीचा परकोट बनुन उभे राहिले ते म्हालोजी घोरपडे तर सर्वज्ञात आहेतच...आणि अश्याच विरपुरुषाच्या पोटी जन्माला आलेले संताजी घोरपडे म्हणजे तर रणभैरव च !!_
_छत्रपती संभाजी महाराज यांच्या अमानुष हत्या नंतर स्वराज्य हाती येईल या न पुर्ण होणाऱ्या स्वप्नांना बघून बसलेल्या औरंगजेब ला मराठ्यांनी अगदी जेरीस आणले... त्यातल्या त्यात संताजी म्हणजे मुघल सरदार तर सरदाच पण मुघलांचा घोड्यांना सुद्धा त्यांची भिती वाटायची !_
_" गनिमी कावा आणि आपल्या बुद्धिमत्ता चा वापर करून संताजींनी आपल्या तलवारी ची एक वेगळीच जरब बसवली होती ; उत्तर कर्नाटकात रायचूर जवळ हिंमतखान सोबत निर्णायक युद्ध करुन संताजींनी आपली धाव जेव्हा औरंगाबाद कडे घेतली तेव्हा औरंगाबाद ला मुघलांचे लचके तोडायला संताजींनी सुरुवात केली, हे मुघली ठाणे लुटुण जानेवारी १६९५ मध्ये संताजी धरणगाव कडे वळले आणि त्यांनी नजर टाकली ती खुद्द बादशहा च्या जवळचे , आवडीचे, प्रेमाचे ठिकाण म्हणजे च सुंदरीच्या गालावर तीळ शोभावा तश्या बुरहाणपुर वर!!"_
_आणि " हर हर महादेव " म्हणत मराठ्यांनी आपलो घोडदौड बुरहाणपुर कडे वळवली...!! या पुर्वी बुरहाणपुर लुटला होता तो खुद्द ज्वलंतज्वलंतेजस छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी... आणि याच बुरहाणपुर च्या लुटीने घायाळ झालेला औरंगजेब महाराष्ट्र मध्ये उतरला होता !! , आता संताजी बुरहाणपुर च्या अंतर्गत प्रदेशापर्यंत पोहोचले होते !! " संताजी आया !!" एवढे ऐकुनच मुघल सरदारांची , अमलदारांची घाबरगुंडी उडाली...!! संताजींनी बुरहाणपुर च्या सुभेदार कडून चौथाई ची मागणी केली, पण आपल्या खूद्दार आणि लढाऊ बाण्याच्या सुभेदार ने लढणे पसंत केले..., " नारे तकरीर.." म्हणत मुघल फौज संतांजींशी भिडली, मराठ्यांचा तलवारी खाली मुघल फौजेचा टिकाव लागेना...खासे संताजी नावाचा भुत्या शौर्याचा गोंधळ तलवारी चा पोत सळसळत करत होता...बुरहाणपुर च्या सुभेदार कडे मराठ्यांच्या पेक्षा दिडपट जास्त फौज होती तरीही ते फोल पडत होते कारण मराठ्यांनी आता आपला लढा हा स्वाभगमानाचा केलेला होता !! मराठे आपले शिश हातावर घेऊन लढायला लागले होते...., हर हर महादेव म्हणत संताजींच्या तलवारी यवनांचे रक्तघोट घेत होते... जिकडे तिकडे हाडा मासाचे रक्तबंबाळ गोळे पडले होते...." ये संताजी इन्सान नही सैतान !! " म्हणत... मराठ्यांच्या भितीने सुभेदार आणि फौज पळत सुटली..!! आणि अवघे बुरहाणपुर मराठ्यांच्या हातात आले....अगदी बुरहाणपुर पुर्ण खणत्या लाऊन लुटुण काढून मराठे जसे आले तसे निघून गेले !!!_
_बुरहाणपुर लुटण्याची खबर तिकडे बादशहा च्या खेम्यात आली...!! बादशहा या अपमानाने आणि लुटीने लाही लाही झाला !! आपल्या फौजेच्या मेलेल्या लोकांचे सांत्वन करणे तर दुर त्याने त्यांनाच खडे बोल सुनावले.._
_संताजी से डर से भाग गये ,नामर्दो...!! उससे अच्छा लढकर गाझी बनना जरुरी नही लगा ?? बस्स शराब और शबाब पर मश्गुल रहने वाले तुम लोक इन मरहट्टो से कभी जीत ही नही पाओगे , वो संताजी हमारे गले तक पहोच जाता है पर तुम निकम्मे उसके पैर तक भी नही... !!_
_आणि औरंगजेब ने या सर्व मुघल फौजेसाठी एक मोठी भेटवस्तू पाठवली..' जेव्हा सुभेदार नी ती उघडली त्याचा तर पुरुषार्थ च गळून पडला... कारण औरंगजेब ने यांच्या साठी "बांगड्या. " पाठवल्या होत्या...._
एवढी जरब आणि भिती फक्त एकट्या संताजी घोरपडेंची होती तर मराठ्यांची किती असावी ??
✍🏻अक्षय चंदेल ©

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...