विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 10 September 2021

फुलगाव_कमानी घाट






 फुलगाव_कमानी घाट

दुसरे बाजीराव पेशवे यांनी सुमारे १८०० व्या शतकात या गावची पुणे शहराजवळ एक विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून विकास केला. भीमा नदीचा मोठा पाण्याचा डोह, तर दुसºया बाजूला डोंगर असल्याने मध्य नैसर्गिक सुंदर वनश्री होती. पूर्व-पश्चिम बाजारपेठ वसवली. फुलशहर असे नाव दिले. सुमारे १०० सरदारांना वाडे बांधून दिले. त्यांच्या सोईसाठी बारा बलुतेदारांना गावात आश्रय दिला. येथील बाजारपेठ प्रसिद्ध होती. बाजीराव पेशवे यांनी मुख्य सरदार त्रिंबक डेंगळे पाटील यांची येथे नेमणूक केली होती. त्यांना ब्रिटिशांनी पकडले. ठाणे तुरुंगात ठेवले, नंतर बापू गोखले यांनी जबाबदारी स्वीकारली. येथील जमिनीचे हत्तीखाना, बाग, पागा अशी नावे इतिहासाची जाणीव करून देताना, श्री छत्रपती संभाजीमहाराजांच्या अंत्यविधीस फुले उधळली म्हणून फुलगाव असेही काही लोक सांगतात.
- नितीन केमसे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...