विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 11 September 2021

"शिवाजीराजाचा मावळा मी, तुझा कौल हवाय कुणाला?!: दिलेरखानाला धूळ चारणाऱ्या योद्ध्याची शौर्यकथा भाग १

 



"शिवाजीराजाचा मावळा मी, तुझा कौल हवाय कुणाला?!: दिलेरखानाला धूळ चारणाऱ्या योद्ध्याची शौर्यकथा
भाग १
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि सगळीकडे जणू स्वराज्याचे नवचैतन्य सळसळू लागले.पण म्हणतात ना चांगल्या गोष्टीला देखील विरोधक असतात त्याप्रमाणे अनेक वतनदारांचा शिवरायांच्या स्वराज्याला विरोध होता.
या साऱ्या मंडळीनां शिवरायांनी स्वराज्याचे महत्व सांगितले. अनेक जण स्वराज्यात सामील झाले. तर अनेक जणांनी आपला विरोध कायम ठेवला. त्यापैकी एक होते जावळीचे मोरे घराणे जे आदिलशाही दरबारी सरदार होते.
''तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, जर उदईक येत असाल तर आजच या!'' जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी शिवाजी महाराजांना डिवचले.
हा मग्रुरीचा जबाब ऐकून महाराज संतापले. मोर्यांना अखेरची संधी मिळावी म्हणून महाराजांनी एक पत्र मोर्यांना धाडलं 'जावळी खाली करुन, हात रुमालांनी बांधून भेटीस येणे!' पण चंद्रराव व हणमंतराव गुर्मीला आलेले, कारणच तसे होते.
कारण त्यांच्या ताब्यात होते जावळीचे खोरे! जावळी म्हणजे वाघाची जाळी. जावळीचे खोरे म्हणजे महाबिकट मुलुख. जावळीच्या खोर्यात उतरणे म्हणजे मृत्यूच्या खाईत उतरण्यासारखे होते.
महाराजांचे कान्होजी जेधे, हैबतराव शिळीमकर, संभाजी कावजी कोंढाळकर, नांदलनाईक यांना तातडीचे हुकूम सुटले. निवडक धारकरी जावळीच्या कीर्र जंगलात घुसले. एकदम भयंकर कालवा उठला.
चर्तुबेट, जोर, शिवथर आणि खुद्द जावळीवर एकाचवेळी मराठ्यांचा छापा पडला. चंद्रराव, प्रतापराव, हणमंतराव आणि सगळी मोरे मंडळी धावली.
दोन्ही बाजूंकडून मराठेच आपापसात लढू लागले, पण स्वराज्यासाठी त्यांचा नाइलाज होता. संभाजी कावजी कोंढाळकरांनी हणमंतराव मोरे ठार केला. प्रतापराव मोर्यांनी लपत छपत विजापूरचा रस्ता धरला.
खास चंद्रराव जावळी हातची जातेय हे पाहून रायरीकडे पळाले. पण जावळीच्या पूर्व बाजूने हत्यारांचा खनखणाट आणि आरोळ्याचा आवाज अजूनही येत होता.
राजेंनी विचारले काय आहे हा प्रकार..
”राजे चन्द्ररावांच्या एक सरदार आपल्या कोणालाच ऐकना झालाय, गेली ६ तास अखंड पट्टा फिरवतोय.. कोणालाच जवळ येऊ देइना. आत्तापर्यंत याने ५०-६० मावळे मारले आपले, आणि कित्येक जायबंद केले. एक एक दर्दी धारकरी कार्दळीसारखा कापून काढतोय तो..मुरारपंत नाव त्याचे..”
राजे घोड्यावर स्वार होऊन घटनास्थळी दाखल झाले. मावळ्यांना थांबायचे आदेश दिले. मावळे थांबले पण मुरारपंत एवढे बेहोषीने लढत होते. पट्ट्यांची सुदर्शन चक्रासारखे वलये दिसत होती.
राजानी कणखर व तितक्याच ताकतीच्या आवाजाने आज्ञा केली…
“मुरारपंत थांबावे….”

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...