भाग २
पंत थांबले …
राजे म्हणाले …”पंत ज्यांच्यासाठी लढत आहात ते गुप्त वाटेने पळून गेले. जावळीवर आता आमची हुकुमत आहे.”
पंत म्हणाले –
“असे तुम्ही समाजात असाल, पण हा मुरार अजून जिवंत आहे..स्वामिनिष्ठ मेलेली नाही.”
राजे उद्गारले–
“पण हीच निष्ठा सत्कारणी लावा, पिढीजात जहागीराचे आम्ही पुत्र, बसून खाल्ले तरी ७ पिढ्या पुरून उरेल. पण आम्ही हा स्वराज्याचा डाव मांडलाय तो आमच्या रयतेसाठी..
३५० वर्षे गुलामगिरीत पिचत पडलेला हा महाराष्ट्र स्वतंत्र करून देव धर्माचे राज आणण्यासाठी आमचा हा खटाटोप आहे. यासाठी आमचा जीव गेला तरी आम्ही ते नशीब समजू. तुमच्यासारखे निष्ठावंत धारकरी स्वराज्यात सामील झाले तर आई जगदंबेची कृपा समजू आम्ही…बघा विचार करून.
नाहीतर आम्ही तुमच्यावर जबरदस्ती नाही करणार. आपली योग्यता आम्ही ओळखतो. तुम्हास आम्ही उपद्रव करणार नाही. तुम्ही खुशाल इथून सहीसलामत जावू शकता.”
अश्याप्रकारे शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोर्यांच्या तुर्यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते ‘मुरारपंत’.
मुरारबाजींची इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध घटना म्हणजे दिलेरखानाशी अखेरच्या श्वासापर्यंत दिलेला लढा. स्वराज्यावर औरंगजेबाचे सरदार मिर्झराजे जयसिंह ह्यांच्या रूपात नवीन संकट घोंगावत होते.
मिर्झाराजांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले, त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते. या नामुष्कीची चाहूल लागताच महाराजांनी मिर्झाराजांसोबत बोलणी सुरू केली पण मिर्झाराजांनी महाराजांना दाद दिली नाही.
त्यानंतर मोगल सरदार दिलेरखानाने इ. स.१६६५ च्या आषाढात पुरंदरला वेढा घातला. दिलेरसारखा संतप्त सेनानी पुरंदर घेण्याची प्रतिज्ञा करून अक्षरश: अहोरात्र पुरंदरला धडका देत होता.
जेव्हा दिलेरखानाने पुरंदराला वेढा दिला तेव्हा त्याला पुरंदराचे अभेद्यपण लक्षात आले असावे आणि पुरंदर घ्यायचा असेल तर आधी वज्रगड ताब्यात येणे अतिशय आवश्यक आहे हे त्या मुत्सद्दी सेनानीने ओळखले नसेल तरच नवल.
दिलेरखानाने कपिलधारेच्या बाजुने वज्रगडावर तीन तोफा चढवण्यास सुरुवात केली.
वज्रगडाचे तत्कालिन किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभू आणि त्यांचे बंधू बाबाजी बुवाजी प्रभू यांनी अवघ्या तीनशे मावळ्यांच्या मदतीने दिलेरखानाला निकराची लढत दिली.
No comments:
Post a Comment