यांच्या आखणीतील एक सर्जिकल स्ट्राइक
भाग ४
प्रतापराव व बहलोलखान यांच्यात झालेल्या युद्धाचे वर्णन नारायण शेणवी (इंग्रजांचा दुभाशी) हा डेप्युटी गव्हर्नर, मुंबई यांना ४ एप्रिल १६७४ रोजी लिहीलेल्या पत्रात लिहीतात.
The Rajah Sevajee intended to proceed to currall to give a new orders to his army and to creat a New generall of his horse in the rooms of pertab roy (Pratap ray) Who fell in the encounter of Sevajees army with Bullool Ckaun in a narrow passage betwixt two hills who with six horse man more were slaine, being not succored by the rest of the army, so that Bullool ckaun remains victorius. (factory records of surat)
राजे शिवाजी यांनी आपल्या फौजेला आज्ञा देण्यासाठी व नविन सरनोबत नियुक्त करण्यासाठी कुडाळ येथे जाण्याचा निर्णय घेतला त्याचे कारण असे की, सरनोबत प्रतापराव हे बहलोलखानाशी झालेल्या चकमकीत मारले गेले. ही चकमक दोन टेकड्यांच्या मधे असलेल्या अरुंद ठिकाणी (खिंडीत – नेसरीची खिंड) झाली. प्रतापरावांसोबत आणखी सहा घोडेस्वार मारले गेले. प्रतापरावांना वेळेवर सैन्याची मदत न पोहोचू शकल्याने ह्या सर्वांची कत्तल झाली. लढाईमद्धे बहेलोल खान विजयी ठरला.
याच पत्राचे भाषांतर शिवकालीन पत्र सार संग्रह खंड २ मद्ये पत्र क्र. १६२५ मद्ये देखिल पहायला मिळते.
प्रतापराव बहलोलखानाशी फक्त ६ घोडेस्वारांनिशी लढताना बाकीच्या सैन्याचे अभावी मारला गेला. त्याचे जागी नविन सेनापती नेमून, सैन्याला नवे हुकूम देण्यासाठी शिवाजी कुडाळला जाणार होता. परंतु प्रतापरावाचा दुय्यम आनंदराव याने धीराचे पत्र लिहिल्यामुळे शिवाजीने त्याला सेनापती पद देऊन ” शत्रूचा मोड केल्याशिवाय तोंड दाखवू नये.” असा हुकूम केला.
वरील इंग्रजी पत्र व त्याचे मराठी भाषांतर पाहून लक्षात येते की, प्रतापरावां सामवेत आणखी सहा योद्धे नेसरीच्या खिंडीत मारले गेले. मात्र त्या सहा जणांची नावे कोणत्याही समकालीन कागदात माझ्यातरी माहितीनूसार उल्लेखीत नाहीत. तसेच केवळ सहा योद्धे मारले गेले हे इंग्रजी पत्राखेरीज कोणालाच माहित नाही. या वेळी प्रतापरावांसोबत नक्की किती सैन्य असावे याचा उलगडा होत नाही. उमराणीच्या लढाईत लढताना प्रतापरावांसोबत असलेले सरदार सर्व तेच नेसरीच्या लढाईत उपस्थित न्हवते. कारण विठोजी शिंदे जे उमराणीच्या लढाईत लढले होते ते नेसरीच्या खिंडीतील युद्धाच्या सहा महिने आधीच श्रावण महिन्यात मारले गेले आहेत. (जेधे शकावली) त्यामुळे विठोजी शिंदे नेसरीच्या लढाईत उपस्थित नसावेत. तसेच जेधे शकावलीतील उल्लेखानुसार फाल्गुन वद्य ११, १५९५, संपगावीची पेठ लुटली आनंदराव येता खिदरखानासी लढाई जाली दोन हत्ती पाडाव झाले. म्हणजेच उमराणीच्या लढाईत लढलेले प्रतापरावांचे दुय्यम आनंदराव हे नेसरीची लढाई झाल्यानंतर ही जिवंत आहेत. याचाच अर्थ एकतर ते नेसरीच्या लढाईत नसावेत कींवा ते नेसरीच्या खिंडीत मारले गेले नसावेत.
प्रतापराव गुजर हे मारले गेल्यावर सरनोबात पद भुषविण्यासाठी महाराजांनी आनंदराव यांस तात्काळ सरनोबत पदाची सुत्रे सोपविली. म्हणजे प्रतापरावांनंतर काही मोजका काळ का होईना आनंदराव हे सरनोबत पदावर होते. त्या नंतर सरनोबत पदाची सुत्रे हंसाजी उर्फ हंबिरराव मोहिते यांच्या हाती सोपविण्यात आली. (F.R.Surat) स्वराज्याच्या सरसेनातींमद्धे प्रतापराव गुजरांनंतर आनंदराव हे नाव देखील सामाविष्ट होते.
इंग्रजी पत्रातील शब्द पहाता, Pertab roy (Pratap ray) Who fell in the encounter of Sevajees army with Bullool Ckaun. येथे Battle किंवा War हे शब्द न वापरता Encounter शब्द वापरला आहे. या वाक्यातील ENCOUNTER या शब्दाचा शब्दशः अर्थ पहाता. घडलेली घटला ही समोरासमोर घडलेली चकमक असावी. (कदाचित बहेलोलखानाच्या फौजेशी प्रतापरावांच्या सैन्याची अकस्मात भेट झाली असावी. त्यात प्रतापरावांचा लढण्याचा निर्णय हा मरणानंतर देखील मराठ्यांनाच विजयश्री देऊन गेला.) प्रतापरावांच्या कार्यकाळातील रणनीति व पराक्रम पाहूनच छत्रपतींनी त्यांना सरनौबती दिली असावी. असे शुर प्रतापराव केवळ सहा साथीदार घेऊन बहलोल खानाच्या छावणीवर छापा घालण्याचा जिवघेणा खेळ खेळणार नाहीत. अखेर ते स्वराज्याचे सरनोबत होते. इंग्रजी पत्रातील उल्लेख सांगतो की, वेळेवर सैन्याची कूमक पोहोचू न शकल्याने प्रतापराव व साथीदारांना मरणाला सामोरे जावे लागले. याचाच अर्थ हा छापा मराठा फौजेत माहित असावा पण फौज तेथे पोहोचण्यात दिरंगाई झाली व ७ मराठे मारले गेले. (कदाचित मराठ्यांची फौज वेळेवर पोहोचली असती तर रणांगणावर काही वेगळे चित्र दिसले असते.)
अवकाश होऊन प्रतापराव सरनोबत तलवारीचे वाराने ठार जाले. रण बहुत पडिले. रक्ताच्या नद्या चालिल्या. त्याजवरी बेलोलखान विजापूरास गेला. (सभासद बखर) अवकाश होऊन प्रतापराव पडले म्हणजे प्रतापरावांनी व सहा जणांनी बहूत काळ रणांगण गाजविले नक्कीच तसेच त्यांचे शौर्य व बलिदान अनन्यसाधारण होते यात शंका नाही. रक्ताच्या नद्या वाहिल्या. पण मारले गेलेल्या मावळ्यांची संख्या केवळ सात सांगितली आहे. म्हणजेच मराठ्यांनी शत्रूची कत्तल चालविली असणार यात शंका नाही. या लढाई नंतर बलोलखान विजापूरास गेला. सरनोबत मारले गेले. पण बहलोलखानाने माघार पत्करली.
महाशिवरात्रीच्या रात्री प्रतापराव व इतर सहा शिवगणांनी बहलोलखानाच्या फौजेस शिवतांडव काय असते दाखवून दिले. अखेर मावळ्यांच्या पवित्र शरीरातुन भु-लिंगावर रूधिराभिषेक झाला. मावळ्यांच्या श्वासाचे बिल्वपत्र समर्पित झाले. शिवतांडव थांबले. काळाने देखील विजयाची माळ त्या सात शिवगणांच्या गळ्यात घातली. व इतिहासाच्या सुवर्ण पानात अजरामर केले..
धन्यवाद…
आपलाच,
अनिकेत अशोक पाटील
मुरूड जंजिरा, रायगड
९२२६३६०७३३
No comments:
Post a Comment