विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 September 2021

सरसेनापती प्रतापराव गुजर….. यांच्या आखणीतील एक सर्जिकल स्ट्राइक भाग ३

 


सरसेनापती प्रतापराव गुजर…..
यांच्या आखणीतील एक सर्जिकल स्ट्राइक
भाग ३
वेडात मराठे विर दौडले सात…
उमराणीच्या लढाईत बेलोलखानाने प्रतापराव व मराठा सैन्यासमोर शरणागती पत्करली. प्रतापरावांनी त्यास माफी दिली. प्रतापराव माघारी फीरले. येताना वाटेत मोघलाईत असलेले भागानगर, देवगड, रामगीरी ह्या प्रदेशांची लूट करुन प्रतापराव स्वराज्यात परतले.
शके १५९५, प्रमादी संवत्सरे, श्रावण वद्य नवमी सातारा घेतला. कार्तिक मासी सर्जा खानासी व विठोजी सीदे (शिंदे) यांसी झगडा जाला विठोजी पडला. (जेधे शकावली) विठोजी शिंदे हे उमराणीच्या लढाईत प्रतापराव गुजरांसामावेत होते. सर्जा खानाशी लढताना त्यांचा मृत्यू झाला.
प्रतापराव गुजरांनी बहलोल खानास माफ केले हे शिवाजी महाराजांस रुचले नाही. उमराणीच्या लढाईत प्रतापरावांनी केलेल्या उपकारांची जाण न ठेवता, बहलोलखान पन्हाळा किल्ल्यावर चाल करुन आला. महाराज प्रतापरावांवर नाराज झाले. याच गोष्टीचा योग्य तो समाचार घेण्यासाठी महाराजांनी प्रतापरावांस सांगितले , “बहलोल खान येतो यासी गाठ घालून बुडवून फते करणे नाहीतर तोंड न दाखविणे.” अशा कठोर शब्दात महाराजांनी प्रतापरावांस सुनावले. (सभासद बखर) (अशा अशयाचे पत्र देखिल महाराजांनी प्रतापरावांस पाठविले होते, ते पत्र किंवा पत्राचे स्वरूप मला अभ्यासण्यास सापडले नाही.) बहलोल खानाने केलेल्या विश्वास घाताने प्रतापरावांच्या मनातील क्रोधाग्निने वणव्याचे रुप धारण केले. याच वणव्यात बहलोल खानास दहन करण्याचा निश्चय झाला.
राजियास कळले की, बेलोलखान मागती आला आहे. मग राजे म्हणू लागले कीं,” हा घडोघडी येत.” या करिता मागती प्रतापराव यास पाठविले की, ” तुम्ही लश्कर घेऊन जाऊन बेलोलखान येतो. यांसी गाठी घालून, बुडवून फते करणे. नाहीतर तोंड न दाखविणे.” ऐसे प्रतापराव यास निक्षुन सांगून पाठविले. त्यावरि प्रतापराव जाऊन बेलोलखानासी गाठीले. जेसरीवरी (नेसरीवरी) नवाब आला. त्यांनी गाठिले. मोंठे युद्ध जाले. अवकाश होऊन प्रतापराव सरनोबत तलवारीचे वाराने ठार जाले. रण बहुत पडिले. रक्ताच्या नद्या चालिल्या. त्याजवरी बेलोलखान विजापूरास गेला. (सभासद बखर)
शके १५९५ , माघ वद्य १४, सिवरात्रीस बहलोलखानात व प्रतापराव सरनोबत यांचा झगडा निवटियास जाला. प्रतापराव पडिले. (जेधे शकावली)
प्रतापराव रणांगणात पडले त्या दिवशी महाशिवरात्री होती.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...