विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 7 September 2021

विदर्भातील दुर्लक्षित "ताजमहाल"

 







विदर्भातील दुर्लक्षित "ताजमहाल"
चंद्रपूर येथील गोंडराजे 'राजा बिरशहा' यांचे निधना नंतर त्यांचे आठवणीखातीर 'राणी हिराई' ने बांधलेली सुंदर वास्तू खऱ्या अर्थाने 'प्रेमाचे प्रतीक' आहे।
"एखाद्या राणीने राजाच्या आठवणीखातीर बांधलेली एकमेव वास्तू असावी...."
राजा बिरशाह यांची समाधी (सुंदर वास्तू) राणी हिराई ने बांधून त्यांच्या प्रति असलेले प्रेम आपल्या कार्यातून अजरामर केले. या निरागस प्रेमाचा इतिहास बघितला पाहिजे, युवकांनी क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, आपल्या विविध नात्यातील प्रेम व्यक्त करण्याकरिता 'विशिष्ट' दिवसाची गरज नसून ते आपल्या वागणुकीतून नि कार्यातून व्यक्त व्हायला पाहिजे, याकरिता प्रेमदिनाचे पाश्चिमात्य प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने एक छोटासा प्रयत्न म्हणून दरवर्षी 'इको-प्रो संस्था, चंद्रपूर व एफ ई एस महिला महाविद्यालय, चंद्रपूर यांचे वतीने 'राजा बिरशाह' यांच्या समाधीवर पुष्पअर्पण करून इतिहासाच उजाळा दिला जातो
विदर्भाची ओळख जगाच्या नकाशावर Tiger capital of india अशीच आहे त्यात ताडोबा हे वाघ बघायचे असल्यास हक्कांची जागा..या करता पण बरेच पर्यटक चंद्रपुर ला भेटी देतात पण शहरातील या हाकेच्या अंतरावर असलेल्या या वारसास्थळाला भेट देण्यास मुकतात...
त्या करता हा छोटेखानी प्रयत्न...
- विशाल देवकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...