विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 September 2021

जुन्नर परिसरातील " सातवाहन काळातील घराचे कौल "

 


जुन्नर परिसरातील " सातवाहन काळातील घराचे कौल "
-------------------------------------------------------------
जुन्नर परिसरातील सातवाहन कालीन घराची बांधनी पक्की होती. घर बाधकामातील विटा एकावर एक जोड येणार नाहीत अशा पध्दतीने ठेवलेल्या असत. बाधकामातील खालच्या विटा आडव्या तर वरच्या विटा उभ्या ह्या पध्दतीने असल्याने घरांची बांधनी भक्कम असायची.बाधकामातील विटा आकाराने खुप मोठ्या म्हणजे साधारणपणे २१ इंच लांब, ११ इंच रुंद ,३ इंच जाडीच्या होत्या.
जुन्नर परिसरातील गोळेगांव, उदापुर, कुसूर,पाडळी, जुन्नर ,सुसरबाग,डिगोंरे,निरगुडे येथील सातवाहन कालीन घरांची छप्परे भिंतीत आणि जमिनीत लाकडे वासे पुरुन त्यावर आडव्या लगी ( लाकडी वासे ) टाकून तयार केली जात. आणि त्यावर एका विशिष्ट प्रकारची भाजलेल्या मातीची कौले ठेवीत असत. ति कौले साधारणपणे आयत आकाराची असून त्यांना वरच्या भागास पन्हाळ्या केलेल्या दिसून येतात. सातवाहन काळात जुन्नर परिसरात भरपूर पाऊस पडत असावा .पावसाचे पाणी झटकन निघून जाता यावे म्हणून ही व्यवस्था कौलाना केलेली असायची.
जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील घराच्या कौलांना वरच्या अंगास दोन छिंद्रे असून त्यांतून ती झाडाच्या वेलानी किंव्हा खिळ्यांनी लगीवर ( लाकडी वासे ) बाधीत किव्हा ठोकून बसवीत .कौलांना दिलेला उतार तसेच त्यांवर काढलेल्या पन्हाळी यावरुन जुन्नर परिसरात सध्या पडत असलेल्या पावसाच्या मानापेक्षा जास्त पाऊस सातवाहन काळात पडत असावा असे सिध्द होते.
अशा विशिष्ट प्रकारची भाजलेल्या मातीची कौले नाशिक, कोल्हापूर, तेर, नालासोपारा, नेवासे, पैठण आदि ठिकाणी संशोधकांना - सातवाहन कालीन इतिहास अभ्यासकाना सातवाहन कालीन वस्तीस्थळाच्या भागात पाहायला मिळाली. लेण्याद्री जवळील गोळेगांव मध्ये सातवाहन कालीन लोकवस्ती चे अवशेष आजही दिसून येतात. जुन्नर परिसरातील असंख्य लेण्यांत जे शेकडो बुध्द भिक्षु निवास ( वर्षावास) करीत असतील ,त्याच्या भिक्षेसाठी, निर्वाहासाठी आश्रय देणाऱ्या लोकांच्या वस्त्या या प्राचीन जुन्नर परिसरात ठिकठिकाणी दिसून येतात.
---- बापुजी ताम्हाणे, गोळेगांव - लेण्याद्री ( जुन्नर)
( प्राचीन इतिहासाचे अभ्यासक )
मों. नं. 9730862068

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...