नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील डुबेरे या गावी मराठ्यांची विजयी पताका आपल्या शौर्याने अटकेपार पोहचवणार्या सेनापती थोरले बाजीराव यांचे आजोळ असलेल्या बर्वेंची गढी आहे. डुबेरे हे गाव पुणे-नाशिक महामार्गावरील सिन्नर गावापासून १० कि.मी अंतरावर आहे. डुबेरे या गावात एक किल्लासुद्धा आहे त्याबद्दल नंतर माहिती घेवू. डुबेरे गावात असलेला हा बर्वे वाडा वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून बघण्यासारखा आहे. ढोक नदीच्या काठावर उभारलेल्या या वाड्याचे बाहेरच्या बाजूला बुरूज, त्यावर तटबंदी, जुन्या धाटणीच्या विटांनी बांधलेल्या भिंती, आतील बाजूला असलेले लाकडी काम हे सर्व बघून आपण थक्क होतो. वाड्याच्या पाठीमागे कोरड्या नदीपात्रात एक मोठा गोलाकार तोफगोळाही पाहायला मिळतो. वाड्यात आजही बाजीरावांचा जन्म झालेली खोली, पलंग आणि काही शस्त्रास्त्रे पहायला मिळतात.
बाजीरावांच्या आजोळचं आडनाव बर्वे. डुबेरवाडीतल्या बर्वेंच्या कन्या राधाबाई यांचा बाळाजी विश्वनाथांबरोबर विवाह झाला. त्यांचं पहिलं बाळंतपण माहेरी झालं आणि त्यांनी तेजरत्न पहिल्या बाजीरावास जन्म दिला. आजही बर्वेचे वंशज त्यांच्या भुईकोट किल्ल्यासारख्या राहतात.
टीम - पुढची मोहीम
No comments:
Post a Comment