विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 31 October 2021

चक्रवर्ती हरपालदेव महाराज यांचा संपूर्ण इतिहास.

 


चक्रवर्ती हरपालदेव महाराज यांचा संपूर्ण इतिहास.

पोस्त्साम्भर :शंतनू जाधव

 हरपालदेव महाराज यांचा ११ फेब्रुवारी १२७६ मध्ये जन्म झाला, चक्रवर्ती हरपालदेव महाराज यांच्या आईसाहेबांचे नाव उमाबाईं होते, आणि त्यांच्या वडिलांचे नाव येसाजीराव होते, त्यांचे वडील निर्गुंडाचे सुभेदार होते. वयाच्या १८व्या वर्षी चक्रवर्ती हरपालदेव महाराज यांचा विवाह चक्रवर्ती रामदेव महाराज यांची मुलगी जठ्याबाई यांच्या सोबत झाला. सुभेदार येसाजीराव यांच्या मृत्यू नंतर हरपालराव हे निर्गुंडाचे सुभेदार झाले. तेव्हा ते २० वर्षांचे होते. १२९६ मध्ये देवगिरिचे युद्ध झाले होते. या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला होता, चक्रवर्ती रामदेव महाराज हे तुर्कांचे मांडलीक झाले होते, चक्रवर्ती रामदेव महाराज हे १३०४ पर्यंत तुर्कांना खंडणी देत होते, त्यानंतर त्यांनी तुर्कांना खंडणी देणे बंद केले. म्हणून १३०८ मध्ये देवगिरिचे दुसरे युद्ध झाले, या युद्धा मध्ये हरपालदेव महाराज हे ही सहभागी होते, खुप मोठे युद्ध पेटले होते, हरपालदेव या युद्धामध्ये यवनांशी ध्यैर्याने लढत होते, या युद्धामध्ये त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी जठ्याबाई ह्या सुध्दा सहभागी होत्या, या युद्धा मध्ये त्या यवनांशी ध्यैर्याने लढत होत्या, या युद्धाचे नेतृत्व युवराज शंकरदेव करत होते. सरदार कान्होजी, तुकोजीराव, जगदेव, राणोजी आणि उमाजी हे कर्तबगार योद्धे सुध्दा या युद्धात सहभागी होते. हे युद्ध सकाळपर्यंत ते संध्याकाळ पर्यंत चालले, या युद्धात..., मराठ्यांचा पराभव झाला, या युद्धामध्ये शंकरदेव हे पराभूत हून किल्ल्यावर परतत होते, आणि.., हरपालदेव सुध्दा तेही सैन्याच्या रक्ताने लाल झालेलं रणांगण पहात आणि सैनिकांचे मृतदेह पहात, या युद्धात त्यांच्या पत्नी जठ्याबाई ह्या विरगतित मरणं पावल्या, सरदार कान्होजी, तुकोजीराव, जगदेव, राणोजी आणि उमाजी हे सर्व या युद्धात विरगतित मरणं पाठवले. १३११ मध्ये चक्रवर्ती रामदेव महाराज यांचा मृत्यू झाला, चक्रवर्ती रामदेव महाराजांच्या मृत्यू नंतर चक्रवर्ती शंकरदेव महाराज हे राजे झाले, त्यांनी अलाउद्दीन खिलजी विरुद्ध बंड करून महाराष्ट्राला स्वतंत्र केले परंतु १३१३ मध्ये अलाउद्दीने मलिक काफुर याच्या नेतृत्वात महाराष्ट्रावर आक्रमकण केले तुर्की सैन्य आणि मराठी सैन्य समोरासमोर आले. खुप मोठे युद्ध पेटले. परंतु या युद्धा मध्ये दुर्दैवाने मराठ्यांचा पराभव झाला. या युद्धात चक्रवर्ती शंकरदेव महाराज हे लढता लढता विरगतित मरणं पाठवले. महाराष्ट्र हे राज्य आता तुर्की साम्राज्याच्या अधिपत्याखाली आले होते. चक्रवर्ती शंकरदेव महाराज यांच्या मृत्यू नंतर चक्रवर्ती हरपालदेव महाराज हे राजे झाले. रामदेवराय यांच्या शुरविर जावई वीर मराठा हरपालदेव यांनी हातात शस्त्र उचलले... मोडकळीस पडलेल्या सुवर्णगरुडध्वजास पुन्हा हातात धारण केले... अत्याचार ने दबलेल्या रयतेच्या स्वाभिमान ला पुन्हा ज्वलंत केले.... सोबतीला राघव प्रधान म्हणून आले.... आणि सुसाट विजयाचा अश्व धावला... ज्या यवनांनी देवगिरी च्या वेशीवर आमच्या माऊलींच्या अब्रू चे धिंडवडे उडवले होते आज त्याच वेशीवर या यवनांचे मस्तक यवनदंडणायक बनून हरपालदेव कापत होते ,ज्या यवनांनी आमच्या मंदिराच्या हेळसांड केल्या, मुर्त्या खंडित केल्या त्या यवनांचे शरीर खंडित करून हरपालदेव हिंदुतेजसुर्या भोवतीचे काळोख हटवत होते.... राघव प्रधान आपल्या बुद्धिमत्ता आणि पराक्रमाने रयतेत नवचैतन्य भरत होते... हरपालदेव यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा देवगिरी उभी राहत होती.. देवगिरी चे साम्राज्य पुन्हा सुवर्णगरुडध्वजाखाली व्याप्त झाले होते... पण तेवढ्यातच नव्याने बादशाहत हाती आलेल्या मुबारकशहा खिल्जी च्या नजरेत हे हिंदू साम्राज्य खुपले... पुन्हा विंध्य पर्वत रांग शहारली , सातपुड्याची कळी किंकाळली ,वर्हाडातील भुमी हलकल्लोळ करु लागली.. आणि आला आपल्या काळोख मनसुबे घेऊन मुबारकशहा आला १३१८ मध्ये हरपालदेव , राघव यांच्या नेतृत्वाखाली देवगिरी आणि दिल्ली चे हे युद्ध पेटले , तलवारी उसळल्या , रक्तांतबर उडाले , भयाण युद्ध जुंपले... पण मुबारकशहा ची फौज मोठी... देवगिरी ची फौज मरत मरत संपायला लागली... खासे हरपालदेव मुबारकशहा च्या हाती लागले... देवगिरी च्या या विर योद्धा ला फरफटत देवगिरी च्या द्वारा पुढे आणले , अवघ्या हिंदुजनांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले , हुंदके यायला लागले पण भितीने तेही देता येईना... पण हरपालदेव झुके ना , स्वाभिमान विकेना... शेवटी मुबारकशहा ने हरपालदेव ची चामडी चरचर करत सोलली... तडफडत हरपालदेव देवगिरीचा ध्वज बघत बघत संपले....आणि सोबतच संपले देवगिरीचे स्वातंत्र्य सुद्धा.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...