विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 3 November 2021

आरमार = आंग्रे

 


आरमार = आंग्रे
छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीने आरमाराचा पाया रचला गेला, आणि शिवरायांच्याचं नजरेतून समुद्रावर पालाण घालत छत्रपतींचा आदर्श आंग्रे घराण्यांच्या साऱ्याच कर्तुत्ववान पुरुषांनी केला. आंग्रे घराण्यानं स्वराज्याची चौथी बाजू असलेल्या दर्याला आपल्या ताब्यात ठेवले., आणि एकप्रकारे हिंदुस्थानच्या रखवालदारीचे काम करत या देशावर अनंत उपकारच करून ठेवले, म्हणायला हरकत नाही.
यदुनाथ सरकार म्हणतात - Nothing proves Shivaji's genius as a born statesman more clearly than his creatuon of a navy & naval bases
विजराई कौंट द साव्हीन्सेती लिहितो - शिवाजीचे नौदलही मला भीतीदायक वाटते; कारण त्याच्या विरुद्ध आम्ही सुरवातीसच कारवाई न केल्यामुळे त्याने किनार्यावर किल्ले बांधले आणि आज त्या जवळ पुष्कळ तारवे आहेत.
आंग्रे घराण्याचा मूळ पुरुष सेखोजी त्यांचा मुलगा तुकोजी. १६४० मध्ये शहाजीराजांनी चौल जवळ जी मोहीम लढली त्यात पहिल्याने ते प्रसिद्धीस आले.
कान्होजी आंग्रे - आंग्र्या हा केवळ दर्यावरील क्रूर वाटमाऱ्याच नव्हता, (असे आपणाला कळून चुकले) जमीन सोडून शिवाजी दर्यात आला किंवा उलट दर्या सोडून आंग्र्या जमिनीवर चालून गेला की दोघांनाही आपपल्या जन्मजात स्वभावाची विसरी ओळख होई. आंग्रे यांची सत्त्ताभूमी म्हणजे चाच्यांचा किनारा. या किनाऱ्यावरील प्रत्येक इसमाला शिकवणच की दलदलीच्या जागेत वाढणाऱ्या गवताच्या नकली होड्या त्याला पाण्यावर तरंगविता येऊ लागल्या; तसेच त्याच्या जन्मगावाच्या खाडीत स्वतःचे होडके वल्हविता येऊ लागले की, त्याने दर्यात फुटून वाहत जाणाऱ्या तरांडीवर घारीसारखी नजर घालावी.
त्याची (आंग्रेंची) समुद्रातील प्रत्येक वस्तू हीच कपाशी व खडकाळ किनाऱ्यावर वाहत येणारी चीजवस्तू हेच धान्य असे त्याचे उत्पन्न असून सुद्धा समुद्रातले जहाज जसे तो (लिलने) पकडी; त्याचप्रमाणे जमीन भागावरही फार दूरवर त्याची गती असे व तेथील किल्लेही तो सहज काबीज करी. तो म्हणजे समुद्रातील मगरच किंवा भुईवरचा ससाणाच समजला जाई. केवळ करमणूक व्हावी म्हणून तो जमीन भागावरही लांब पल्ल्याच्या मोहिमा करी व अशा वेळी त्याला जे जे काही हिरवागार (अर्थात तयार झालेले) धान्य मिले ते ते त्याचेच ठरत असे.
सेखोजी आंग्रे - बाजीराव पेशवे यांची जंजिरा किल्ल्यावरील मोहीम म्हणजे सेखोजी आंग्रे यांच्या कर्तुत्वाचा कळस, जंजिरा मोहिमेच्या अतिश्रमामुळेचं सेखोजींना अकाली मृत्यू आला.
संभाजी आंग्रे - लिस्बनच्या आर्किंदू इस्तेरिकू उस्त्रामारीनुमध्ये संभाजी आंग्रे यांच्या मृत्युबद्द्लचे वृत्तांत आढळतात यावरून आपण यांचं कर्तुत्व जोखू शकतो.
मानाजी आंग्रे - १७ फेब्रुवारी १७३९ मध्ये चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांकडून वसई मोठ्या शर्थीने जिंकून घेतली तेव्हा, मानाजी आंग्रे यांनी समुद्रात शत्रूची नाकेबंदी करून त्याला जेरीस आणले आणि त्याला कुठूनही मदत मिळू दिली नाही.
तुळाजी आंग्रे - १३ फेब्रुवारी १७४७ रोजी गोव्याच्या विजरईने जुआव द सौज फेर्राज यास लिहिलेल्या पत्रात असे लिहिले आहे
जर इंग्रज, डच व आम्ही एकत्र झालो, तर आन्ग्र्यांवर त्याच्या बंदरात किंवा इतर ठिकाणी हल्ला करू. कारण तो इतका उद्धट (Insolent) झाला आहे की त्याच्यापुढे कन्याकुमारीपर्यंत कोणीच (उभे) राहत नाही ! तुम्ही हा विषय गुप्त रीतीने मुंबई बेटाच्या जनरलच्या कानी घाला. तो ह्या बाबतीत हालचाल करण्यास तयार असला, तर यंदाच्या पावसाळ्यात आम्ही पुढील बेत ठरवू म्हणजे उन्हाळाच्या सुरवातीला सर्व तयारी होईल
सर्वत्र आपल्या कर्तुत्वाचा डंका असणाऱ्या आंग्रे घराण्याला शह देण्यासाठी पेशव्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी करून या देशावर खरी नामुष्की ओढवली, प्लासीच्या लढाईत हिंदुस्थानचे भवितव्य ठरले असे म्हणतात; परंतु वस्तुतः ते इ. स. १७५६ सालीच - की जेव्हा आंग्र्यांचा दारुण पराभव करण्यात आला; तेव्हाच ठरून गेला.....
आन्ग्र्यांच्या शत्रूंनी केलेले त्यांच्या दुरवस्थेचे वर्णन वाचून मनात कालवाकालाव झाल्याशिवाय राहत नाही. 'आर्म्स'च्या ओरिएन्टल मेमोयार्स या ग्रंथातील या आशयाचा मजकूर पुढील प्रमाणे
सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सागरगड, सिंधूदुर्ग वगैरे आंग्रे यांचे स्वामित्वाचे दुर्गा अद्यापही तिथेचं आहेत; परंतु सुवर्णदुर्गच्या मनोहर किल्ल्यातल्या तटांवर हल्ली वडाचे झाड फोफावले असून त्यात समुद्र - ससाणा या पक्षाने आपले घरटे तयार केले आहे; घेरिया उर्फ विजयदुर्ग याचे सत्तावीस बुरुज, परन्तु हल्ली ते सर्वही झाडे आणि झुडुपे यांच्या विस्तारामुळेनष्ट झाले आहेत. सन १७५६ मध्ये जी तोफ आमच्या आरमाराने जिंकली, ती अद्यापही तिथेच पडून आहे; परंतु कशा स्थितीत??? गंजून भंगलेल्या व म्हणून निकामी झालेल्या अशा अडीचशे तोफा, आज तिथे पडून आहेत... आन्ग्र्यांची गोदी आता धुळीने भरून गेली आहे. अत्युच्च वैभव उपभोगणारे हे घराणे अवघ्या साठसत्तर वर्षात पराक्रमाच्या दृष्टीने कायमचे अस्तंगत झाले. मोडेन, पण वाकणार नाही' असे हे घराणे !

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...