#मराठा_साम्राज्यात_पवारांची
भाग १६
आता उदाजीरावांचे धाकटे बंधू आनंदराव यांच्या कामगारांविषयी माहिती बघू .
आनंदराव व उदाजीराव त्यांच्या वयात फार अंतर नव्हते .ते वयाने साधारणता बरोबरीचे होते व ते स्वारी शिकारीवरही उभयंता बरोबरच जात असत; यामुळे उभयंतांनी चालवलेल्या मोहिमांमधून आनंदराव पवार यांचे वेगळे व स्वतंत्र पराक्रम निदर्शनास येऊ शकत नाही ; तथापि आनंदराव पराक्रमात कमी होते असे म्हणणे उचित होणार नाही .उदाजीरावांच्या तापट स्वभावामुळे कुठे काम बिघडण्याचा प्रसन्न झाल्यास आनंदरावांच्या शांत स्वभावाछा उपयोग त्याप्रसंगी होत असे व तोच शांत स्वभाव पुढे आनंदरावांच्या उत्कर्षास कारण झाला .ग्रंन्ट डफ साहेबांनी आनंदरावांच्या आंगच्या ह्या गुणाची तारीफ केली आहे .
गुजरातेत असताना पिलाजी गायकवाडांशी उदाजीरावांच्या ज्या झटापटी होत होत्या,त्यात यांचे बंधू आनंदराव पवार आपले पुत्र यशवंतराव पवार यांच्यासह असल्याचे लिहिले आहे. त्यावरून गुजरात व माळव्याच्या उद्योगात उदाजीरावांना आनंदरावांचे आरंभापासून साह्य असावे असे अनुमान होते.
1728 च्या जानेवारीत उदाजीरावां प्रमाणे आनंदरावांनाही आपल्या लष्करात सत्त्वर येण्याविषयी बाजीरावांकडून पत्र लिहिले गेले होते. (धार दरबाराचे दप्तरातील एक अप्रकाशित
पत्र)
यावेळी आनंदराव आपल्या पथकानीशी गुजरातेत कामगिरीवर होते. यावेळी निजामाविरुद्ध जी लढाई चालली होती त्यात बाजीरावांनी निजामास हुलकावणी देण्यासाठी बर्हाणपुर कडे काही सैन्य पाठवून स्वतः गुजरात मध्ये शिरले होते.
तेथून लष्करातूनच त्यांनी आनंदरावांस सत्वर येण्याविषयी जे पत्र लिहिले आहे ते पत्र खुद्द बाजीरावांच्या हातचे आहे. त्यात त्यांनी आनंदरावांना ' साखेडीयावरून सोनगडावरुन डबईतून लष्करात ' येण्यास लिहिले आहे.
इसवीसन 1729-30 सालातली बाजीरावांनी देशमुख व देशपांडे यांना जारी केलेली दहा-बारा ताकित पत्रे उपलब्ध झाली आहेत.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)
No comments:
Post a Comment