विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 November 2021

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग १७


 #मराठा_साम्राज्यात_पवारांची

भाग १७
इसवीसन 1729-30 सालातली बाजीरावांनी देशमुख व देशपांडे यांना जारी केलेली दहा-बारा ताकित पत्रे उपलब्ध झाली आहेत.
( मलठण दप्तर अप्रकाशित) त्यात उदाजी व आनंदराव यांच्या नावाने सामलाती आहेत .त्यात माळवा वगैरे प्रांतांत या उभयतांकडे मोकासा आहे त्याप्रमाणे साल मजकूरींही करार आहे, असे म्हटले आहे. यावरून उदाजीराव व आनंदराव हे उभयंता कामगिर्यांवर बरोबर जात असत हे लक्षात येते. इसवी सन 1729 च्या पूर्वीही आनंदराव माळवा वगैरे प्रांतातून मोकास बाबींच्या वसुलीचे काम करीत होती ही गोष्ट स्पष्ट होते .
इसवीसन 1731 मध्ये उदाजीरावांप्रमाणेच आनंदरावही दाभाड्यांच्या पक्षास मिळाले होते, तथापि त्यांनी उदाजीरावां प्रमाणे बाजीरावाशी तेढ ठेवली नाही. यामुळे या प्रसंगानंतर उदाजीरावांवर नाराजी राहून पेशव्यांच्या कृपेचा ओघ सहजच आनंदरावांकडे वळला .(ग्रॅंट डफ) मोकास बाबींच्या वसुलाबद्दलची पंचवीस-तीस ताकीद पत्रे ई.स. 1732-33 या सालात स्वतंत्र आनंदरावांच्या नावाने देशमुख व देशपांडे यावर जारी झालेली उपलब्ध आहेत. या ताकीदपत्रात माळवा ,गुजरात ,नेमाड, खानदेश, सोंदवाडा,बागड वगैरे प्रांतातून मोकासबाबीचा वसूल करण्याचा अधिकार स्वतंत्रपणे आनंदरावांना दिलेला आहे. या ताकीदपत्रांवरुन या सालात आनंदरावांनी वर लिहिलेल्या प्रांतातून मोहिमा करून स्वराज्याच्या हक्काच्या वसुलीचे काम केले होते हे स्पष्ट आहे. याशिवाय या पुढील दोन-तीन सालात झालेल्या उत्तरे कडील स्वारयातही ते हजर असल्याचे दाखले मिळतात .(अप्रकाशित) आनंदरावांकडे पंधरा हजार स्वार सरंजाम होते.(का.सं. पत्रे या.ले. 497)
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...