विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 6 November 2021

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग ६

 


#मराठा_साम्राज्यात_पवारांची
भाग ६
बुबाजींचे धाकटे पुत्र संभाजी पवार हे ही जिंजीच्या वेढ्यापासून कामगिर्या बजावीत असून छत्रपती शाहू महाराजांच्या वेळी लष्कर बाळगून मोहिमांवर जात असत. ही गोष्ट शाहू महाराजांची रोजनिशी लेखांक एक तारीख 20 मे 1714 वरून स्पष्ट आहे.संभाजी पवार हे मोठे कर्ते पुरुष असून दीर्घायू होते. त्यांनी प्रथम मलठणास नवीन घर बांधले व आपल्या मुलांना व नातवांना आणखी काही पाटीलक्या व वतने खरेदी करून देऊन नगर जिल्ह्यात निरनिराळ्या ठिकाणी वसविले.
संभाजी पवार यांना तीन पुत्र होते .उदाजीराव ,आनंदराव व जगदेवराव. यापैकी उदाजीरावांची मराठा साम्राज्याच्या इतिहासात फार प्रसिद्धि आहे .उदाजीरावांनी इसवीसन सतराशे नऊपासून माळव्यात व गुजरातवर मोहिमांवर महिमा करून ठाणी बसवून साम्राज्याचे हक्क स्थापित करण्याचा सपाटा चालविला होता. हल्लीच्या उपलब्ध साधनांवरून कोणकोणत्या मुख्य मोहिमात उदाजीराव पवार होते हे थोडक्यात सांगितले म्हणजे त्यांच्या कामगिरीची आपणास कल्पना होईल.
उदाजीराव आरंभी पासून कोणत्या सालापासून मोहिमांवर जाऊ लागले हे निश्चित करण्यास अद्यापि काही साधन उपलब्ध नसले तरी ; सतराशे नऊ मध्ये उदाजीरावांनी माळव्यात येऊन मांडवगडवर आपले ठाणे बसविल्याचा उल्लेख माल्कमच्या रीपोर्टात आहे.यावरून उदाजीराव या सालच्या सुमारास किंवा दोन चार वर्ष पूर्वी मोहिमांवर जाऊ लागले असे अनुमान होते. इसवीसन 1709 मधील या माळव्याच्या स्वारीत कित्येक शतके मालव राजधानीचा मान पावलेल्या या अभेद्य स्थलावर मराठ्यांचा विजय झेंडा प्रथमतः उदाजीरावांनी फडकविला ही गोष्ट मराठी साम्राज्यासाठी, पवारांसाठी त्याचप्रमाणे माळव्याच्या इतिहासात विशेष संस्मरणीय समजली पाहिजे.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...