विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 6 November 2021

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग ७

 



#मराठा_साम्राज्यात_पवारांची
भाग ७
यापुढे 1710 पासुन 1717 पर्यंत उदाजीरावांच्या कामगिर्यांचा अद्याप पत्ता लागत नाही; तथापि इसवीसन 1708 पासून इसवीसन1717-18 पर्यंत ज्या कित्येक लढाया झाल्या त्यात उदाजीराव सातारकर यांच्या तर्फे काहीतरी कामगिरीत असलेच पाहिजेत , परंतु साधनांच्या अभावी अधिक माहिती लिहिता येत नाही.
इसवीसन1718 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सय्यदांचे मदतीस बाळाजी विश्वनाथ बरोबर चे मोठे सैन्य दिल्लीस पाठविले होते , त्या सैन्यात सर्व मुख्य सरदार म्हणजे खंडेराव दाभाडे ,भोसले व उदाजीराव पवार विश्वासराव हे होते.( रानडे म.उत्कर्ष पृष्ट 136) शाहू महाराजांनी या कामासाठी मुद्दाम ज्या सरदारांना बोलले होते त्यात उदाजीराव हे होते. (पे.श.पृ. 31) ही स्वारी नोव्हेंबर 1718 ते जुलै 1719 पर्यंत चालली होती.
इसवी सन 1719 च्या पूर्वी गुजरात मधील काही ठाणे उदाजीरावांनी सर केली होती, ती उदाजीरावां पासून घेण्याची खटपट यावेळी पिलाजी गायकवाड करीत होते; परंतु या कामात पिलाजी गायकवाड यांना यश आले नाही.(रूरल्स ऑफ बडोदा पेज 28) इसवीसन सतराशे वीस-एकवीस मधील बाजीरावांच्या हालचाली नीटशा कळल्या नाहीत, तथापि त्यांच्या दिमतीस यावेळी नारोशंकर राजेबहाद्दर असून त्यांच्याकडून उदाजीरावांनी माळव्याच्या वसुलीचे वगैरे काम चालविले होते.शिवाय या दोन्ही सालात बाळापुरची लढाई ,करीमबेगशी युद्ध ,भडभुंज्या मोगलांवरील स्वारी इत्यादी प्रकरणे चालली होती त्यात उदाजीरावांनी किंवा या पवार मंडळींनी कसा कसा सहभाग घेतला होता हे सांगण्यास अद्याप साधन उपलब्ध झाले नाही. इसवीसन 1721 मध्ये मराठ्यांची एक माळव्यावर स्वारी झाली होती , असे माल्कमने लिहिले आहे.तेव्हा त्यात उदाजीराव होते असा तर्क करणे चुकीचे होणार नाही.
इसवीसन 1722 च्या डिसेंबर महिन्यात बाजीरावांनी उदाजीरावांना माळवा व गुजरात प्रांताचा निमा मोकासा सरंजामी करून दिला ; तेव्हापासून तर ते या दोन्ही प्रांतात स्वार्यांवर दर वर्षी जाऊ लागले.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...